'जांभई येणे' ही एक अतिशय सामान्य गोष्ट आहे. दिवसभरात आपण अनेकदा जांभई देतो. अनेकदा खूप थकल्यावर किंवा झोप आल्यावर आपण जांभई (yawning) देतो. प्रत्येक व्यक्ती दिवसातून ५ ते १९ वेळा जांभई देतो. मात्र, असे बरेच लोक आहेत जे दिवसातून १० पेक्षा जास्त वेळा जांभई देतात. साऊथ कॅरोलिना मेडिकल युनिव्हर्सिटीतील संशोधकांच्या मते, शरीरातील काही हार्मोन्समुळे जांभई येते ज्यामुळे आपले हार्टबीट्स वाढतात. यासाठीच जेव्हा आपण थकलेले असतो तेव्हा आपले शरीर आपल्याला सावध करण्यासाठी जांभई देते(How to Stop Yawning).
जर एखाद्याला जास्त जांभई आली तर झोपेची कमतरता हे त्यामागील सर्वात सामान्य कारण असू शकते. सहसा पुरेशी झोप न झाल्याने थकवा येतो, अशावेळी मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊन आपल्याला जांभया (How to stop yawning immediately) यायला लागतात. काहीवेळेस एकापाठोपाठ एक जांभया येत असतील तर काय करावे हे पण पटकन सुचत नाही. अर्थात जांभई हा काही आजार नाही त्यामुळे त्यावर एक ठोस गोळी किंवा औषध नाही पण आपण काही सोप्या उपायांनी जांभईवर नियंत्रण मिळवू शकतो(Excessive Yawning What Does It Mean and How to Treat It).
पाच मिनिटांत तीनपेक्षा जास्त जांभई येणे असामान्य आहे...
आरोग्य तज्ञ म्हणतात की जर एखाद्याला दिवसातून तीन ते चार वेळा जांभई येत असेल तर ती सामान्य असू शकते. पण, जर तुम्ही पाच मिनिटांत तीनपेक्षा जास्त वेळा जांभई देत असाल तर ही एक असामान्य प्रक्रिया आहे. यामागचे पहिले लक्षण म्हणजे तुमच्या शरीराला खूप झोपेची गरज असते. झोप पूर्ण न झाल्यामुळे वारंवार जांभई येते. हे स्लीप एपनियाचे लक्षण असू शकते. अनेक वेळा कामाचा ताण, निद्रानाश, घोरणे किंवा थकवा यांमुळे लोकांना पूर्ण आणि चांगली झोप येत नाही आणि त्यांना झोपेचा विकार होतो. अशा परिस्थितीत जांभई वारंवार येते.
विचारांचं काहूर - झोपेचं खोबरं , तुम्हांलाही आहे का 'नाईट एन्झायटी'? ५ सोपे उपाय, झोप लागेल शांत...
सकाळी उठल्याउठल्या पांघरुणावर बसूनच करा ५ स्ट्रेचिंग- दिवसभर कितीही काम करा-एनर्जी जबरदस्त...
जांभई थांबविण्याचे उपाय...
१. काहीतरी थंड प्या :- आपल्या शरीरातील पाण्याची कमी होऊन डिहायड्रेशनमुळे थकवा येऊ शकतो, ज्यामुळे जांभई येऊ शकते. जर तुम्हाला रात्री नीट झोप येत नसेल, तर दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी किंवा फळांचा ज्यूस प्यावा. थंड काहीतरी खाणे किंवा पिणे देखील आपल्या शरीराचे तापमान कमी करण्यास आणि जांभई कमी करण्यास मदत करेल.
२. कोल्ड कॉम्प्रेस :- थंड काहीतरी खाण्या-पिण्याव्यतिरिक्त, कोल्ड कॉम्प्रेस पद्धतीचा वापर केल्याने तुम्हाला जांभई येण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. तुम्ही बर्फाचे पॅक तुमच्या गालावर किंवा डोक्यावर २ मिनिटे धरुन ठेवा. यामुळे जांभई येण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
३. नाकाने श्वास घ्या :- जांभई घेताना आपण अनेकदा तोंड उघडतो. तुम्हाला जांभई कमी करायची असल्यास, तोंड उघडण्याऐवजी नाकातून श्वास घेण्याचा प्रयत्न करा. जांभई येण्यासाठी दीर्घ श्वास घ्यावा लागतो आणि थोडा वेळ तोंड उघडावे लागते. आपण आपले ओठ बंद केल्यास, आपण जांभईची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करू शकत नाही. यामुळे वारंवार जांभई येण्यापासून बचाव होतो.