Join us   

पावसाळ्यात हॉटेलातले-गाड्यांवरचे पदार्थ खात असाल तर लक्षात ठेवा ५ गोष्टी, चमचमीत खाण्याच्या नादात पडाल आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2023 11:55 AM

How To Take Care In Monsoon If you are Eating Outside Food : पावसाळ्याच्या दिवसांत आपली पचनशक्ती क्षीण झालेली असल्याने आहार-विहाराबाबत विशेष काळजी घ्यायला हवी.

पावसाळा म्हटलं की धबधबे, निसर्गाचे खुललेले रुप आणि मग त्यात होणारी वर्षासहल. या निमित्ताने किंवा आणखी काही कारणाने आपण पावसाळ्यात बाहेर जातो. बाहेर गेलो म्हटल्यावर नकळतच बाहेरचे खाणेही होतेच. केवळ फिरायला गेलो म्हणूनच नाही तर मित्रमैत्रीणींना भेटण्याच्या निमित्ताने, घरचं खाण्याचा कंटाळा आल्याने आपण बरेचदा बाहेर खातो. पावसाळ्याच्या दिवसांत आपली पचनशक्ती क्षीण झालेली असते. त्यात बाहेरचे पदार्थ खाऊन पोटावर ताण आला तर पचनक्रियेत आणखी अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात साथीचे आजार, पोटाचे विकार होण्याची शक्यता जास्त असल्याने शक्यतो बाहेरचे खाणे टाळावे. पण तरीही बाहेर खायचेच असेल तर काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला हवी. जेणेकरुन आजारांपासून आपले संरक्षण होऊ शकेल (How To Take Care In Monsoon If you are Eating Outside Food). 

१. चांगले हॉटेल निवडा

आपल्याला माहित असलेले, स्वच्छतेचे किमान नियम पाळणारे अशा हॉटेलची शक्यतो निवड करावी. ज्याठिकाणी आजुबाजूला खूपच अस्वच्छता असेल, स्वयंपाक करणारे किंवा तो सर्व्ह करणारे तितकेसे स्वच्छ नसतील तर अशा ठिकाणी एरवी आणि विशेषत: पावसाळ्याच्या काळात तरी अजिबात जाऊ नये. कारण अस्वच्छतेमुळे माश्या, चिलटं घोंगावण्याची आणि त्यामुळे आजारपणे येण्याची शक्यता जास्त असते. 

(Image : Google)

२. रस्त्यावरचे खाऊ नये

अनेकदा आपण रस्त्यावर पाणीपुरी, भेळ, वडापाव किंवा भजी यांसारख्या गोष्टी खातो. मात्र याठिकाणी वापरण्यात येणारे पाणी, वापरत असलेली भांडी कितपत स्वच्छ आहेत हे आपल्याला माहित नसते. पुरेशी साधने उपलब्ध नसल्याने आहे त्यातच हे लोक ठराविक पदार्थ करत असतात. पण अशाप्रकारे केलेल्या अन्नातून आपल्याला इन्फेक्शन्स होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात शक्यतो स्ट्रीट फूड खाणे टाळावे. 

३. पाण्याची बाटली सोबत ठेवावी

बहुतांश आजार हे पाण्याच्या माध्यमातून पसरत असतात. साधारणपणे पावसाळ्यात अतिसार, उलट्या, जुलाब होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो आपल्याकडे घरातले उकळून गार केलेल्या पाण्याची बाटली ठेवावी. लहान मुलांना किंवा प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्यांना पाणी बाधण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो बाहेरचे पाणी या काळात पिणे टाळावे. 

(Image : Google)

४. स्वच्छतेच्या बाबतीत काळजी

आपण बाहेर खात असलो तरी स्वच्छतेबाबत विशेष काळजी घ्यायला हवी. खाण्याच्या आधी हात पाण्याने आणि साबणाने स्वच्छ धुवावेत. किमान सॅनिटायझरचा तरी आवर्जून वापर करावा. आपण खात असलेली प्लेट, चमचा स्वच्छ आहे की नाही हे तपासावे. शक्यतो माश्या, डास नसतील अशा ठिकाणी बसून खावे.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजनामोसमी पाऊस