Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > बहिरेपणा येईल, डोळे चुरचुरतील-आग होईल, फटाके उडवताना ‘असा’ त्रास होण्याचा धोका, डॉक्टर सांगतात..

बहिरेपणा येईल, डोळे चुरचुरतील-आग होईल, फटाके उडवताना ‘असा’ त्रास होण्याचा धोका, डॉक्टर सांगतात..

How To take care of health from Fire Crackers in Diwali : काही क्षणांची मज्जा बनेल आयुष्यभराची सजा, म्हणून....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2023 02:55 PM2023-11-02T14:55:49+5:302023-11-02T15:03:32+5:30

How To take care of health from Fire Crackers in Diwali : काही क्षणांची मज्जा बनेल आयुष्यभराची सजा, म्हणून....

How To take care of health from Fire Crackers in Diwali : Deafness will occur, eyes will crumble, there is a risk of getting trouble while bursting firecrackers, doctors say.. | बहिरेपणा येईल, डोळे चुरचुरतील-आग होईल, फटाके उडवताना ‘असा’ त्रास होण्याचा धोका, डॉक्टर सांगतात..

बहिरेपणा येईल, डोळे चुरचुरतील-आग होईल, फटाके उडवताना ‘असा’ त्रास होण्याचा धोका, डॉक्टर सांगतात..

डॉ.प्रज्ञावंत देवळेकर

दिवाळी हा ‘दिपोत्सव’अर्थात अंधारातून प्रकाशाकडे नेणारा उत्सव त्यामुळंच कदाचित फटाके फोडून उत्सव साजरा करण्याची परंपरा वेगानं भारतात दृढ झाली. फटाके आले की आवाज आला आणि प्रदूषणही आलं मागोमाग त्यामुळं होणारा त्रासही आला. फटाके आरोग्यासाठी चांगले नाहीत हे माहित असूनही अनेकदा लहान मुलं थ्रिलिंग म्हणून तर मोठ्या व्यक्तीही मज्जा म्हणून फटाके फोडताना दिसतात. त्यामुळेच दिवाळीच्या दिवसांत आणि त्यानंतरही कानाच्या समस्या, श्वसनाच्या समस्या किंवा भाजल्याच्या केसेस डॉक्टरांकडे येतात. ताप-सर्दीसारखा संसर्ग हा विषाणुंमुळे होणारा आजार आहे असे म्हणत असताना आरोग्याच्या या समस्या आपण स्वत:हून ओढवून घेतलेल्या असतात हे नक्की. फटाक्यांचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिक-लहान मुलं-गरोदर महिलांना सहन करावा लागतोच परंतु त्याच्या कैकपट अधिक धोका पाळीव प्राणी-पक्षी आणि वन्यप्राण्यांनाही सहन करावा लागतो.

फटाक्यांमुळे सर्वात मोठा धोका श्रवणयंत्रणेला, कारण...

फटाक्यांमुळे प्रदुषण, मानसिक त्रास, कचरा ते कर्करोग असे एक ना एक दुष्परिणाम असले तरी श्रवणशक्तीवर परिणाम होणं, श्रवणक्षमता कमी होणं, प्रसंगी श्रवणक्षमता गमावणं अशा समस्या निर्माण होतात. फटाक्यांचा अतिरिक्त मोठ्या आवाजामुळे तात्पुरते किंवा कायमचे बहिरेपण येऊ शकते.या बहिरेपणाला शास्त्रीय भाषेत 'Acoustic Trauma' असं म्हटलं जातं. तर फटाक्यांच्या आवाजामुळं कानात आभासी आवाज येण्यासारख्या गोष्टी निर्माण होऊ शकतात त्याला वैद्यकीय परिभाषेत 'Tinnitus किंवा Ringing of the Ears' असं म्हटलं जातं. कानाच्या आतील नलिका Stereocilia, Cochlea, कानातील पेशींना सूज येणं, Autolysis होणं यासारख्या विकारांना सामोरे जावं लागू शकतं. याशिवाय कानाचा पडदा फाटणं, पडद्याला छिद्र पडणं यासारख्या गंभीर स्वरुपाच्या इजाही या आवाजाने होऊ शकतात. 

फटाक्यांनी अपाय होऊ नये यासाठी उपाय काय? 

- प्रतिबंध हाच सर्वात  उत्तम उपाय असून आपण फटाके उडवणार नाही ज्यामुळे आपल्याला आणि इतरांना त्रास होईल हे प्रत्येकाने ठरवायला हवं. 

-आवाजापासून सुरक्षित अंतर राखणं.

-तुलनेत कमी आवाजांचे-आवाजविरहित-धुरविरहित फटाके वाजवणं.

-अतिरिक्त फटाक्यांच्या आवाजात कानात इअरमफ्स-इअरप्लग्स-काहीच उपलब्ध नसेल तर कापसाचे स्वच्छ बोळे वापरणं

-फटाक्यांमध्ये मिसळलेल्या गन पावडरमधील रसायनांमुळं डोळ्यांना दुखापती होतात. धूरामुळं डोळे चुरचुरतात तसंच घसादुखीचा प्रादुर्भावही संभवतो.

(Image : Google )
(Image : Google )

-फटाके नेहमी मोकळ्या जागेत फोडायला हवेत, फटाके फोडताना सेफ्टी गिअर्स म्हणून डोळ्यांवर गॉगल्स-हातात ग्लोव्ज घालायला हवे, फटाके फोडून झाल्यानंतर हात स्वच्छ पाण्याने धुतले पाहिजे. 

-आग लागण्याच्या शक्यतांमुळं पाण्याने भरलेली बादली आणि वाळू लगेच सापडेल अशा ठिकाणी सज्ज ठेवली पाहिजे.

-लहान मुलं फटाक्यांशी खेळत असताना मोठ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि कोणतीही दुखापत सहजपणे न घेता प्रसंगी वैद्यकिय मदत घेतली पाहिजे.

(लेखक जनरल फिजिशियन आहेत)


 

Web Title: How To take care of health from Fire Crackers in Diwali : Deafness will occur, eyes will crumble, there is a risk of getting trouble while bursting firecrackers, doctors say..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.