Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > किडनीसाठी सर्वात घातक ठरतात १० सवयी, किडनीचे आजार पडतात महागात, वेळीच लक्ष द्या..

किडनीसाठी सर्वात घातक ठरतात १० सवयी, किडनीचे आजार पडतात महागात, वेळीच लक्ष द्या..

How To Take Care of Kidney 10 unhealthy habits : किडणीही शरीरात या फिल्टरप्रमाणेच काम करत असते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2023 01:45 PM2023-08-31T13:45:41+5:302023-08-31T15:01:18+5:30

How To Take Care of Kidney 10 unhealthy habits : किडणीही शरीरात या फिल्टरप्रमाणेच काम करत असते.

How To Take Care of Kidney 10 unhealthy habits : These 10 habits are the most dangerous for Kidney; Pay attention in time or else... | किडनीसाठी सर्वात घातक ठरतात १० सवयी, किडनीचे आजार पडतात महागात, वेळीच लक्ष द्या..

किडनीसाठी सर्वात घातक ठरतात १० सवयी, किडनीचे आजार पडतात महागात, वेळीच लक्ष द्या..

आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा त्याचे काम अतिशय चोखपणे पार पाडत असतो. हृदय, फुफ्फुसे, यकृत, हात, पाय, नाक, कान यांप्रमाणेच आपल्या किडन्याही शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे आणि अनावश्यक घटक शरीराबाहेर टाकण्याचे जबाबदारी पार पाडत असतात. घरात आपण पाणी शुद्ध करण्यासाठी फिल्टर बसवतो. यामुळे पाण्यातील दूषित आणि विषारी पदार्थ गाळले जाते आणि आपल्यापर्यंत शुद्ध पाणी येण्यास मदत होते. दूषित पाणी शरीरासाठी अजिबात चांगले नसते आणि त्यामुळे पोट खराब होण्याचीही शक्यता असते. किडनीही शरीरात या फिल्टरप्रमाणेच काम करत असते. विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकून रक्त शुद्ध करण्याचे काम किडण्या आपल्या जन्मापासून करत असतात. आपल्यी काही सवयी किडनीला दिवस-रात्र काम करण्यास भाग पाडतात, ज्यामुळे किडनीचे आरोग्य खराब होण्याची शक्यता असते. म्हणूनच काही गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करायला हवा (How To Take Care of Kidney 10 unhealthy habits). 

१. ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशरकडे दुर्लक्ष करणे 

ठराविक वयानंतर आपल्याला मधुमेह, बीपी यांसारख्या समस्या भेडसावतात. किडनीसाठी रक्तातील साखर आणि ब्लड प्रेशर वाढणे चांगले नाही. त्यामुळे या दोन्ही गोष्टींकडे आपले लक्ष असायला हवे. डायबिटीस असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, हे दोन्ही योग्य प्रमाणात नसेल तर नसा कमजोर होतात आणि किडनीवरील प्रेशर वाढते. 

(Image : Google)
(Image : Google)

२. पेनकिलर किंवा अँटीबायोटीक्स जास्त प्रमाणात घेणे

बऱ्याचशा औषधांचा किडनीवर थेट परीणाम होतो. यामध्ये पेनकिलर आणि अँटीबायोटीक्स सर्वात महत्त्वाच्या असतात. कालांतराने ही औषधे किडनीवर विपरीत परीणाम करु लागतात त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त ही औषधे घेणे योग्य नाही. 

उन्हाळ्याच्या दिवसांत किडनीची जास्त काळजी घ्यायला हवी.           

१. पुन्हा पुन्हा युरीन इन्फेक्शन होणे

किडनीच्या कार्यात अडथळा निर्माण झाला की शरीरातील अनावश्यक पदार्थ बाहेर टाकण्याच्या क्रियेत अडचणी येतात. यामुळे युरीनरी ट्रॅक इन्फेक्शन किंवा किडनी स्टोनचा त्रास होण्याची शक्यता असते. किंवा या समस्या झाल्यानेही किडनीचे आजार उद्भवू शकतात. 

२. धूम्रपान आणि दारु पिणे 

धूम्रपान केल्याने उच्च रक्तदाब आणि रक्तातील वाढलेली साखर या समस्या निर्माण होतात. हे दोन्ही किडनीच्या आजारांचे मुख्य कारण असते. दारु प्यायल्याने किडनीवर एक प्रकारचे प्रेशर येते ज्यामुळे किडनी लवकर खराब होतात. 

(Image : Google)
(Image : Google)

३. डीहायड्रेशन आणि जास्तीचा व्यायाम

योग्य पद्धतीने काम करण्यासाठी किडनीला पाण्याची आवश्यकता असते. कमी प्रमाणात पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन होते आणि किडनी खराब होण्याची शक्यता असते. तसेच प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम केल्यास स्नायूंमधील टिश्यू तुटतात आणि रक्तात मिसळतात. यामुळे किडनीवर प्रेशर येते.      

४. आहार

आहारात मीठाचे प्रमाण नियमित ठेवणे गरजेचे आहे. आहार संतुलित असायला हवा. यासाठी आहारात प्रोटीन, कार्बोहायड्रेटस, अँटीइन्फ्लमेटरी घटक योग्य प्रमाणात असायला हवेत.                     

Web Title: How To Take Care of Kidney 10 unhealthy habits : These 10 habits are the most dangerous for Kidney; Pay attention in time or else...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.