Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दहीहंडी पाहायला जाणार असाल तर लक्षात ठेवा ३ गोष्टी; उत्साहाच्या नादात तब्येत बिघडली तर…

दहीहंडी पाहायला जाणार असाल तर लक्षात ठेवा ३ गोष्टी; उत्साहाच्या नादात तब्येत बिघडली तर…

How To Take Care of Your Health while attending Dahihandi Utshav : आनंद आणि उत्साहाच्या भरात तब्येत बिघडायला नको हेही तितकेच खरे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2023 04:24 PM2023-09-07T16:24:33+5:302023-09-07T16:34:24+5:30

How To Take Care of Your Health while attending Dahihandi Utshav : आनंद आणि उत्साहाच्या भरात तब्येत बिघडायला नको हेही तितकेच खरे...

How To Take Care of Your Health while attending Dahihandi Utshav : If you are going to see Dahihandi, remember 3 things; If health deteriorates in the midst of excitement... | दहीहंडी पाहायला जाणार असाल तर लक्षात ठेवा ३ गोष्टी; उत्साहाच्या नादात तब्येत बिघडली तर…

दहीहंडी पाहायला जाणार असाल तर लक्षात ठेवा ३ गोष्टी; उत्साहाच्या नादात तब्येत बिघडली तर…

दहीहंडीचा सण राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जन्माष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माचा उत्सव मंदिरात आणि घराघरांत साजरा झाला की या कन्हैय्याची दहीहंडी फोडण्याची लगबग सुरू होते. मुंबई-पुण्यात तर या दहीहंडीनिमित्त सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. स्पिकरवर मोठ्या आवाजात लावली जाणारी गाणी, त्यावर करण्यात येणारा डान्स आणि सेलिब्रिटींची उपस्थिती असे या दिवसभराच्या कार्यक्रमांचे स्वरुप असते. इतकेच नाही तर संध्याकाळच्या वेळी उंचच्या उंच बांधलेल्या दही हंडी फोडण्याचे आणि त्यासाठी मोठमोठी बक्षिसे देण्याचे कार्यक्रम अगदी चौकाचौकात होताना दिसतात (How To Take Care of Your Health while attending Dahihandi Utshav). 

या हंड्या फोडण्यासाठी एका शहरातून गोविंदा पथकं एका शहरातून दुसऱ्या शहरांत प्रवास करतात. हा सगळा थरार आणि जल्लोष अनुभवण्यासाठी आपणही अनेकदा घराबाहेर पडतो. पण सध्याचे वातावरण आणि एकूणच अस्वच्छता यांचा शरीराला त्रास होऊ नये यासाठी आरोग्याच्या बाबतीत काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला हवी. किमान गोष्टी पाळल्यास त्याचा आरोग्य चांगले राहण्यासाठी फायदा होतो आणि येणारा गणेशोत्सवही अतिशय आनंदात आणि जल्लोषात साजरा करता येतो. पाहूयात यासाठी कोणत्या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यावे. 

(Image : Google)
(Image : Google)

१. कोरोनाचा संसर्ग संपला असला तरी सध्या व्हायरल ताप, सर्दी, खोकला, घसादुखी यांची मोठ्या प्रमाणात साथ आहे, तसेच डोळ्यांची साथही आहे. गर्दीत गेल्यावर या सगळ्या साथी पसरण्याचीच शक्यता जास्त असते. त्यामुळे शक्यतो चेहरा झाकला जाईल याची काळजी घ्या. जास्त गर्दीच्या ठिकाणी तोंड उघडले जाणार नाही याकडे लक्ष द्या. कारण सणवार हे उत्साह आणि आनंद देणारे असले तरी त्यानंतर साथीच्या आजारांचे प्रमाणही वाढल्याचे दिसते. 

२. ठराविक काळाने पाणी पिणे किंवा एनर्जी मिळेल असे काहीतरी घेत राहणे आवश्यक असते. अनेकदा आवाजाच्या नादात किंवा उत्साहात आपले याकडे लक्ष जात नाही. मात्र दर काही वेळाने पाणी, सरबत पिणे, गोळी किंवा चॉकलेट खाणे अतिशय आवश्यक असते. त्यामुळे एनर्जी टिकून राहण्यास मदत होते. 

(Image : Google)
(Image : Google)

३. उत्सवाला बाहेर पडताना आपण संध्याकाळी बाहेर पडलो की घरी येईपर्यंत रात्र उलटून जाते. अशावेळी आपल्या पोटात कावळे कोकलतात. मग साहजिकच आपण गाडीवरचे वडापाव, भजी, सामोसे असे काही ना काही खातो. पण असे खाणे आरोग्यासाठी चांगले नसते. गर्दीच्या वेळी या पदार्थांची गुणवत्ता नेहमीपेक्षा जास्त खराब असू शकते. त्यामुळे शक्यतो बाहेरचे खाणे टाळा. शक्य असल्यास खाऊन घरातून बाहेर पडा आणि सोबतही खाण्यासाठी काहीतरी ठेवा. अगदीच खायचे झाले तर माहितीच्या, स्वच्छता असलेल्या ठिकाणी सँडविच, इडली, ढोकळा अशाप्रकारचे कमीत कमी त्रास होईल असे पदार्थ खा. यामुळे बाहेरच्या अन्न पाण्यातून होणाऱ्या इन्फेक्शनपासून आपण काही प्रमाणात तरी दूर राहू शकतो. 

Web Title: How To Take Care of Your Health while attending Dahihandi Utshav : If you are going to see Dahihandi, remember 3 things; If health deteriorates in the midst of excitement...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.