Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पाठीचा कणा ठेवा कायम ताठ, मजबूत आणि सांभाळा आरोग्य! कसे? तज्ज्ञ सांगतात...

पाठीचा कणा ठेवा कायम ताठ, मजबूत आणि सांभाळा आरोग्य! कसे? तज्ज्ञ सांगतात...

How To Take Care Of Your Spine Health : पाठीचा कणा मजबूत राहावा यासाठी २ सोपे झटपट करता येतील असे व्यायाम प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2023 05:16 PM2023-01-20T17:16:43+5:302023-01-20T17:33:03+5:30

How To Take Care Of Your Spine Health : पाठीचा कणा मजबूत राहावा यासाठी २ सोपे झटपट करता येतील असे व्यायाम प्रकार

How To Take Care Of Your Spine Health : Keep your spine firm, strong and healthy! How? Experts say... | पाठीचा कणा ठेवा कायम ताठ, मजबूत आणि सांभाळा आरोग्य! कसे? तज्ज्ञ सांगतात...

पाठीचा कणा ठेवा कायम ताठ, मजबूत आणि सांभाळा आरोग्य! कसे? तज्ज्ञ सांगतात...

Highlightsबसून बसून अवघडले असेल तर स्नायू मोकळे होण्यासही या व्यायामाची चांगली मदत होते.  पाठीचा कणा चांगला तर आरोग्य चांगले राहण्यास मदत होते

पाठीचा मणका हा आपल्या शरीरातील एक अतिशय महत्त्वाचा अवयव असतो. मणक्यावर आपल्या संपूर्ण शरीराचा भार पेलला जातो. उठणे, बसणे, झोपणे अशा सगळ्या क्रिया या मणक्याशी निगडीत असतात. त्यामुळे पाठीचा मणका कणखर असायला हवा असे आपण नेहमी म्हणतो. मात्र बरेचदा सतत बैठे काम किंवा गाडी चालवणे, प्रवास यांसारख्या गोष्टींमुळे पाठीच्या मणक्यावर ताण येतो आणि पाठदुखी, कंबरदुखी किंवा मानदुखीसारख्या समस्या निर्माण होतात. अनेकदा उतारवयात स्लीप डीस्क, मणक्याला इजा असे काही ना काही त्रास उद्भवतात. आपल्या मणक्याचे आरोग्य चांगले नसेल तर आपलेही आरोग्य चांगले राहत नाही. त्यामुळे मणक्याची हालचाल चांगली होणं आणि तो ताठ असणं आवश्यक आहे. द योगिनी वर्ल्डच्या माध्यमातून योग अभ्यासक जूही कपूर पाठीचा मणका ठणठणीत ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स शेअर करतात. तसेच पाठीचा कणा मजबूत राहावा यासाठी २ सोपे झटपट करता येतील असे व्यायामही सांगतात (How To Take Care Of Your Spine Health)...

पाठीचा कणा मजबूत ठेवायचा तर..

१. रोज ३० ते ४५ मिनीटे योगा करा. यामध्ये स्ट्रेचिंग, मागे वाकणे, पुढे वाकणे असे मणक्याशी निगडीत कोणतेही व्यायामप्रकार करायला हवेत. 

२. सलग बरेच तास एका जागी बसणे टाळा, मधे ब्रेक घेऊन हालचाल करा. 

३. खूप जास्त मऊ गादीवर झोपणे टाळा.

मणक्यासाठी उपयुक्त २ सोपे व्यायामप्रकार 

१. दोन्ही पायात अंतर घेऊन उभे राहा. कंबरेतून खाली वाकून एक हात जमिनीला टेकवा आणि दुसरा हात सरळ रेषेत वर घ्या. वर घेतलेल्या हाताकडे पाहायचा प्रयत्न करा. असे दोन्ही बाजुने करा. म्हणजे कंबरेला आणि मणक्याला चांगला व्यायाम होईल. 

२. गुडघे आणि हाताचे तळवे जमिनीटवर टेकवून प्राण्यांसारखे बसा. पुन्हा एक हात टेकवून दुसरा हात वर करा आणि वरच्या हाताकडे पाहायचा प्रयत्न करा. यामुळे मानेपासून कंबरेच्या खालच्या भागापर्यंत सगळ्या भागाला अतिशय चांगला व्यायाम होतो. बसून बसून अवघडले असेल तर स्नायू मोकळे होण्यासही या व्यायामाची चांगली मदत होते.  

Web Title: How To Take Care Of Your Spine Health : Keep your spine firm, strong and healthy! How? Experts say...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.