Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > डोळ्यासमोरच्या स्क्रीनने डोळे कायमचे अधू होण्यापूर्वी करा ५ उपाय, डोळे आणि नजर दोन्ही सांभाळा...

डोळ्यासमोरच्या स्क्रीनने डोळे कायमचे अधू होण्यापूर्वी करा ५ उपाय, डोळे आणि नजर दोन्ही सांभाळा...

Easy Eye Care Tips For People With Long Computer Hours : सतत डोळ्यासमोर मोबाइल नाही लॅपटॉप, डोळे लाल होतात-सुजतात-पाणी गळतं, यासाठी हे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2023 06:34 PM2023-06-12T18:34:16+5:302023-06-12T19:21:26+5:30

Easy Eye Care Tips For People With Long Computer Hours : सतत डोळ्यासमोर मोबाइल नाही लॅपटॉप, डोळे लाल होतात-सुजतात-पाणी गळतं, यासाठी हे उपाय

How To Take Proper Care Of Eyes While Working On Screen? | डोळ्यासमोरच्या स्क्रीनने डोळे कायमचे अधू होण्यापूर्वी करा ५ उपाय, डोळे आणि नजर दोन्ही सांभाळा...

डोळ्यासमोरच्या स्क्रीनने डोळे कायमचे अधू होण्यापूर्वी करा ५ उपाय, डोळे आणि नजर दोन्ही सांभाळा...

आपल्यापैकी अनेकांना तासंतास लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर स्क्रीनसमोर बसून काम करावे लागते. दिवसभरातील बहुतांश वेळ हा लॅपटॉप, मोबाईल स्क्रीनवर जात असल्याने याचा डोळ्यांवर ताण येतो. लॅपटॉप स्क्रीन आपल्या डोळ्यांप्रमाणे डिझायन केलेल्या नसल्यामुळे त्याच्या सततच्या वापरामुळे डोळ्यांचा थकवा, कोरडेपणा आणि डोकेदुखीची समस्या सारखी जाणवते. सध्याच्या परिस्थितीत, कामाचा भाग म्हणून आपल्याला दिवसातून काही तास लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि ते झालं की मोबाईल अशा प्रकारचे गॅझेट्स वापरण्यावरच जातो. 

सतत स्क्रिनचा वापर केल्यामुळे डोळ्यांचे व्हायचे ते नुकसान (side effects of screen on eyes) होतेच. डोळे जळजळणे, डोळ्यांत काहीतरी खुपल्यासारखे वाटणे, डोळ्यांतून पाणी येणे, असा वेगवेगळा त्रास त्यातून होतो. सतत स्क्रिनसमोर असल्याने (screen time) डोळ्यांचा नंबरही सारखा वाढत जातो. हा सगळा त्रास कमी करण्यासाठी (How to reduce Eye fatigue due to screen?) काही उपाय केले किंवा स्क्रिन बघताना काही नियम पाळले, तरी नक्कीच फायदा होऊ शकतो(How To Take Proper Care Of Eyes While Working On Screen?).

दिवसभर लॅपटॉप, कॉम्प्युटर समोर बसून डोळ्यांवर ताण येतो, यासाठी नेमकं काय करावं ?  

१. डोळे वारंवार मिचकवा :- डोळे मिचकावल्याने डोळ्यांचा एक छोटासा व्यायाम केल्यासारखे होते आणि यामुळे डोळ्यांचे आरोग्य राखण्यास मदत होते. डिजिटल स्क्रीन वापरताना आपण कमी वेळा डोळे मिचकावतो, ज्यामुळे डोळे कोरडे होतात आणि डोळ्यांवर ताण येतो. अशावेळी डोळे सतत मिचकावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा.

२. थोडावेळ ब्रेक घ्या :- दिवसभर लॅपटॉप, कॉम्प्युटर समोर बसून राहण्यापेक्षा दर २० मिनिटांनी एक छोटा ब्रेक घ्यावा. वारंवार ब्रेक घेतल्याने डोळ्यांचा ताण कमी होण्यास मदत होते. आपण दर २० मिनिटांनी ब्रेक घ्या, स्क्रीनपासून लांब राहत काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करा, यामुळे डोळ्यांवर अतिरिक्त ताण येणार नाही. 

३. स्क्रीन सेटिंग्ज बदला :- तुमच्या लॅपटॉप, कॉम्प्युटर स्क्रीनवरची फॉन्ट साईज आणि डिस्प्ले सेटिंग्ज नीट करून घ्यावी. जेणेकरून तुमचे डोळे स्क्रीनवरील मजकूर सहज वाचू शकतील. कॉन्ट्रास्ट आणि ब्राइटनेस लेव्हल आपल्या डोळ्यांना आरामदायी वाटेल अशीच ठेवा.

मुलांच्या हातातला मोबाइल कसा काढणार? ८ टिप्स - मोबाइलशिवाय मुले जेवत झोपत नाही ही तक्रार संपेल..

तुमची मुलंही सतत युट्यूब पाहतात? मुलांच्या विकासासाठी ते घातक, कारण...

४. लॅपटॉप स्क्रीन डोळ्यांपासून योग्य अंतरावर ठेवा :- लॅपटॉप स्क्रीन आपल्या डोळ्यांपासून योग्य अंतरावर ठेवा. नेहमी तुमची लॅपटॉप स्क्रीन तुमच्या डोळ्यांपासून किमान २० ते २८ इंच अंतरावर ठेवणे डोळ्यांच्या रोग्याच्या दृष्टीने योग्य मानले जाते. 

५. स्क्रीन टायमिंग कमी करा :- डोळ्यांचा ताण कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे एकूण स्क्रीन टायमिंग कमी करणे. स्क्रीन टाईम कमी करा आणि आपला वेळ इतर गोष्टींमध्ये घालवा, आपल्या डोळ्यांना विश्रांती देण्यासाठी तुम्ही स्क्रीन न पाहता व्यस्त कामातून छोटे - छोटे ब्रेक घेतले पाहिजे.  स्क्रीन समोरून थोड्या थोड्या वेळाने उठा, फिरा आणि थोडा वेळा चाला.

Web Title: How To Take Proper Care Of Eyes While Working On Screen?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.