Teeth Problem Home Remedies : सगळ्यांनाच माहीत आहे की, घरातील म्हाताऱ्या लोकांचे दात खूप वर्ष मजबूत राहत होते. पण आजकाल खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, दातांची योग्य काळजी न घेणे, केमिकल्सचा अधिक वापर यामुळे दात कमी वयातच कमजोर होतात. दातांना कीड लागणे, हिरड्यांवर सूज किंवा हिरड्यांमधून रक्त येणे अशा समस्या होऊ लागतात. ज्यामुळे डेंटिस्टकडे जाऊन हजारो रूपये खर्च करण्याची वेळ येते.
दातांच्या वेगवेगळ्या समस्या झाल्यावर किती खर्च येतो याचा अंदाज तुम्हाला कधी ना कधी आला असेल. कॅप बसवायची असेल, सिमेंट भरायचं असेल किंवा दाढ काढायची असेल तर या पैसा तर भरमसाठ जातोच, सोबतच असह्य वेदनाही सहन कराव्या लागतात. अशात जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, दातांच्या वेगवेगळ्या समस्या तुम्ही घरच्या घरी दूर करू शकता तर कसं वाटेल? अर्थात हे कुणालाही आवडेल.
तर दातांच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला एक सोपा आणि नॅचरल उपाय सांगणार आहोत. जो करून दातांची कीड, हिरड्यांवरील सूज, हिरड्यांमधून रक्त येणं, पायरीया अशा समस्या दूर करू शकता. महत्वाची बाब म्हणजे हा घरगुती उपाय केवळ दोन ते तीन वेळा करूनही तुम्हाला भरपूर आराम मिळू शकेल. चला तर जाणून घेऊ काय आहे हा उपाय.
डॉ. रॉबिन शर्मा यांनी दातांच्या वेगवेगळ्या समस्या दूर करणारा उपाय एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितला आहे. हा उपाय करण्यासाठी त्यांनी फिटकरी 50 ग्रॅम, 50 ग्रॅम सैंधव मीठ आणि 10 50 ग्रॅम लवंग घेण्यास सांगितली. या गोष्टी मिक्स करून याचं पावडर तयार करा. यातील थोडं पावडर घेऊन त्यात थोडं मोहरीचं तेल टाकून रात्री झोपण्याआधी ब्रश करायचं आहे.
व्हिडीओ बघण्यासाठी इथे क्लिक करा.
हा तुरटी, लवंग, सैंधव मीठ आणि मोहरीच्या उपाय करून दात हलत असतील, दातांना झिणझिण्या बसत असेल, कीड लागली असेल अशा इतरही समस्या दूर होतात. महत्वाची बाब म्हणजे यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची सुद्धा गरज पडणार नाही.