Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > थंड - गरम खाल्ल्यावर दातांना झिणझिण्या येतात? १० रुपयाच्या तुरटीचा करा 'असा' वापर; ठणक कमी

थंड - गरम खाल्ल्यावर दातांना झिणझिण्या येतात? १० रुपयाच्या तुरटीचा करा 'असा' वापर; ठणक कमी

How to use fitkari or alum for oral health and teeth whitening : दातांच्या समस्यांपासून सुटका हवीय? तर तुरटीचे ४ सोपे उपाय करून पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2024 05:29 PM2024-06-27T17:29:19+5:302024-06-27T19:05:05+5:30

How to use fitkari or alum for oral health and teeth whitening : दातांच्या समस्यांपासून सुटका हवीय? तर तुरटीचे ४ सोपे उपाय करून पाहा..

How to use fitkari or alum for oral health and teeth whitening | थंड - गरम खाल्ल्यावर दातांना झिणझिण्या येतात? १० रुपयाच्या तुरटीचा करा 'असा' वापर; ठणक कमी

थंड - गरम खाल्ल्यावर दातांना झिणझिण्या येतात? १० रुपयाच्या तुरटीचा करा 'असा' वापर; ठणक कमी

उत्तम आरोग्यासाठी दात स्वच्छ असणं गरजेचं. आरोग्य तज्ज्ञ देखील दिवसातून दोनदा दात घासण्याचा सल्ला देतात (Teeth Whitening). दात स्वच्छ करण्यासाठी आपण अनेक प्रकारची रासायनिक उत्पादने वापरतो (Oral Health). पण तरीही दातांचा पिवळेपणा निघत नाही. या रासायनिक टूथपेस्टमुळे दात अधिक खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दातांचे उत्पादने वापरूनही जर स्वच्छ होत नसतील तर, काही तुरटीचा वापर करून पाहा. तुरटीच्या वापरानेही दात चमकतील. पण दातांसाठी तुरटीचा नेमका वापर कसा करावा? तुरटीच्या वापराने दात स्वच्छ होतात का? पाहूयात(How to use fitkari or alum for oral health and teeth whitening).

तुरटीचे दातांसाठी फायदे

ऑन्ली माय हेल्थ या वेबसाईटनुसार, 'बऱ्याच लोकांना दातांमध्ये झिणझिण्या येतात. ही समस्या सामान्य जरी असली तरी, या समस्येवर वेळीच लक्ष देणं गरजेचं. यामुळे बऱ्याचदा खाणं देखील अवघड होतं. ही समस्या सोडवण्यासाठी तुरटी फायदेशीर ठरू शकते.

दातांच्या समस्येवर तुरटीचा वापर कसा करावा?

- दातांमध्ये रक्तस्त्राव होत असल्यास, एक ग्लास कोमट पाणी घ्या, त्यात एक ग्रॅम तुरटी आणि चिमुटभर मीठ मिसळा. दिवसातून दोन ते तीन वेळा या पाण्याने गुळण्या करा. यामुळे दातांमधून रक्त येण्याच्या समस्येपासून आराम मिळेल.

- दात किडले असतील तर, तुरटीचा वापर करून पाहा. यासाठी एका बाऊलमध्ये सैंधव मीठ, दालचिनी पावडर आणि तुरटी पावडर घेऊन मिक्स करा. तयार पावडरने दात घासून स्वच्छ करा. या उपायामुळे काही दिवसांत दात किडणे दूर होईल.

- थंड किंवा गरम खाल्ल्यानंतर दातांमधून झिणझिण्या येत असतील तर, कोमट पाण्यात तुरटीची पावडर आणि मीठ घालून मिक्स करा, आणि या पाण्याने गुळण्या करा. यामुळे थंड किंवा गरम पदार्थ खाताना त्रास होणार नाही.

- दातांमध्ये पोकळी निर्माण झाली असेल तर, एका बाऊलमध्ये ५ ग्रॅम हळद पावडरमध्ये तुरटी पावडर मिसळा. तयार पावडर ग्लासभर कोमट पाण्यात मिसळा आणि गुळण्या करा. यामुळे पोकळीची समस्या दूर होईल.

Web Title: How to use fitkari or alum for oral health and teeth whitening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.