हाडं आणि शरीराच्या चांगल्या कार्यासाठी शरीराला इतर पोषक घटकांप्रमाणेच प्रोटीन्सची आवश्यकता असते. प्रोटीन्सची कमतरता भासल्यास स्नायू दुखणं, शरीरातील अतिरिक्त फॅट वाढणं किंवा वजन कमी होणं, मसल्सचा अभाव, अशक्तपणा, थकवा येणं असे त्रास उद्भवू शकतात. मांसाहारी अन्नातून भरपूर प्रोटीन मिळतं, शाकाहारी पदार्थांमध्ये प्रोटीन्सची कमतरता असते असा अनेकांचा समज असतो. (How To Use Leftover Dal to Boost Your Protein Intake)
असं नसून रोजच्या आहारातले काही शाकाहारी पदार्थ खाऊन तुम्ही प्रोटीन्सची कमतरता भरून काढू शकता. जसं की डाळी प्रत्येकाच्याच घरी असतात. डाळींचा आहारात समावेश केल्यास पोषक तत्वांची कमतरता भरून निघण्यास मदत होईल. शिल्लक राहिलेल्या वरणाचा वापर करून तुम्ही उत्तम पदार्थ बनवू शकता. (Ref) डाळीत प्रोटीन्सबरोबरच व्हिटामीन्स आणि फायबर्स असतात. मूग डाळ खाल्ल्यानं शरीर बळकट राहते.
डाळीचे सूप
उरलेल्या डाळीत भाज्या, मसाले आणि पाणी घालून सूप तयार करू शकता. ज्यामुळे शरीर हायड्रेट राहील आणि शरीराला फायबर्स मिळण्यासही मदत होईल.
डाळीचा पराठा
उरलेली डाळ गव्हाच्या पिठात घालून घट्ट कणिक मळून तुम्ही पराठा बनवू शकता. हा हेल्दी प्रोटीन रिच पराठा खाल्ल्यानं तुम्हाला बराचवेळ भूक लागणार नाही.
डाळ चिला
वाटलेल्या डाळीत ओट्स बेसन मिसळून मिश्रण तयार करा आणि तव्यावर डोसा बनवून घ्या. हा प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. जर तुम्हाला किंवा घरातील लहान मुलांना डाळ खाण्याचा कंटाळा येत असेल तर हा उत्तम पर्याय आहे,
डाळ पुलाव
डाळीसोबत तांदूळ आणि भाज्या मिसळून तुम्ही डाळ पुलाव बनवू शकता. डाळ पुलाव खाल्ल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतील. हा एक हलका आहार आहे. या पुलावचे सेवन केल्यानं एनर्जी मिळेल, शरीरही निरोगी राहील.
डाळ खिचडी
उरलेल्या डाळीत शिजवलेले तांदूळ घालून तुम्ही डाळ खिचडी बनवू शकता. डाळ खिचडी हा पौष्टीक हलका आहार असून पचायलाही हलका आहे. डाळ खिचडीचा आहारात समावेश करून तुम्ही पोषक तत्वांची कमतरता भरून काढू शकता.