Join us   

नॉन स्टिक भांड्यांच्या वापराने टेफ्लॉन फ्लू होण्याचा धोका? बघा हा ‘ताप’ नक्की काय असतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2024 2:17 PM

Use Of Non Stick Cookware Can Cause Teflon Flu: नॉन स्टिक भांडी चुकीच्या पद्धतीने वापरणं आरोग्यासाठी किती धोकादायक ठरू शकतं ते पाहा...(how to use non-stick cookware safely?)

ठळक मुद्दे ही भांडी सुरक्षित पद्धतीने कशी वापरायची याविषयीच्या काही गाईडलाईन्स नॅशनल इन्स्टि ट्यूट ऑफ न्यूट्रिशन यांनी जाहीर केल्या आहेत.

नॉन स्टिक भांडी वापरायला आणि स्वच्छ करायला सोपी जातात. शिवाय त्या भांड्यांमध्ये आपण कमीतकमी तेल वापरून स्वयंपाक करू शकतो. या फायद्यांमुळे हल्ली नॉन स्टिक तवा, कढई यांचा वापर जवळपास सर्वच घरांमध्ये वाढला आहे. पण तो वापर जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने केला तर ते मात्र आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकतं. एवढंच नाही तर त्यामुळे टेफ्लॉन फ्लू हा आजारही होऊ शकतो. या आजारालाच पॉलिमर फ्यूम आजार असंही म्हणतात. हा आजार झाल्यामुळे २०२३ या वर्षात अमेरिकेतील जवळपास २५० व्यक्तींना दवाखान्यात ॲडमिट व्हावं लागलं होतं, असंही काही अहवाल सांगतात (how to use non-stick cookware safely?). बघा हा आजार नेमका असतो कसा आणि तो कशामुळे होतो...(use of non stick cookware can cause teflon flu)

 

टेफ्लॉन फ्लू होण्याची कारणं 

प्रत्येक नाॅन स्टिक भांड्यावर टेफ्लॉन नावाचं एक सिंथेटिंक केमिकल लावलेलं असते. ते कार्बन आणि फ्लोरीन यांच्यापासून तयार होतं.

ओठांभोवती पिगमेंटेशन होऊन त्वचा काळवंडली? चेहरा धुतल्यानंतर लावा २ गोष्टी- डाग निघून जातील

याविषयी हेल्थशॉट्स साईटला अधिक माहिती देताना डॉ. रुही पिरझादा सांगतात की जेव्हा आपण नॉन स्टिक भांडी खूप जास्त गरम करतो, किंवा स्क्रॅचेस पडलेली नॉनस्टिक भांडी वापरतो तेव्हा त्यावर असलेलं टेफ्लॉन कोटिंग विघटीत होतं आणि हवेमध्ये काही विषारी केमिकल्स सोडतं. हे केमिकल्स  श्वासावाटे आपल्या शरीरात जातात. जेव्हा असं वारंवार होतं तेव्हा फ्लू सारखी काही लक्षणं दिसून येतात. म्हणूनच ही भांडी सुरक्षित पद्धतीने कशी वापरायची याविषयीच्या काही गाईडलाईन्स नॅशनल इन्स्टि ट्यूट ऑफ न्यूट्रिशन यांनी जाहीर केल्या आहेत. त्या नेमक्या काेणत्या ते पाहा..

 

नॉन स्टिक भांडी वापरताना कोणती काळजी घ्यावी?

१. स्टील, ॲल्युमिनियमच्या कढई आपण जेव्हा स्वयंपाकासाठी घेताे तेव्हा त्यात एखादा पदार्थ टाकण्यापुर्वी आपण त्या तापवून घेतो. असं प्री हीट नॉन स्टिक भांड्यांना करू नये.

२. स्क्रॅचेस पडलेली नॉन स्टिक भांडी वापरू नयेत.

केस शेपटीसारखे पातळ झाले? खाण्यापिण्यामध्ये करा थोडासा बदल- केस गळणं कायमचं बंद होईल

३. गॅसची फ्लेम मोठी करून नॉन स्टिक भांड्यात अन्न शिजवू नये. गॅस नेहमी मंद किंवा मध्यम ठेवावा. 

४. नॉन स्टिक भांड्यासाठी स्टीलचे चमचे वापरू नयेत.

५. गरम असताना स्टीलची भांडी कधीच घासू नयेत.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स