Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > वजन वाढले? पोट साफ होत नाही? हाडे ठिसूळ? - १ चमचा सब्जा उपाय

वजन वाढले? पोट साफ होत नाही? हाडे ठिसूळ? - १ चमचा सब्जा उपाय

How to use sabja seeds for weight loss, dietitians on health benefits of this magic ingredient रोज सकाळी सब्जा कोमट पाण्यात मिसळून प्या, आरोग्याला अनेक मिळतील फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2023 04:29 PM2023-07-02T16:29:24+5:302023-07-02T19:08:38+5:30

How to use sabja seeds for weight loss, dietitians on health benefits of this magic ingredient रोज सकाळी सब्जा कोमट पाण्यात मिसळून प्या, आरोग्याला अनेक मिळतील फायदे

How to use sabja seeds for weight loss, dietitians on health benefits of this magic ingredient | वजन वाढले? पोट साफ होत नाही? हाडे ठिसूळ? - १ चमचा सब्जा उपाय

वजन वाढले? पोट साफ होत नाही? हाडे ठिसूळ? - १ चमचा सब्जा उपाय

आजकाल अनेक लोकांची अशी तक्रार असते की, वजन तर झपाट्याने वाढते पण कमी होण्याचं नावचं घेत नाही. वजन वाढीची समस्या सध्या देशभरात पाहायला मिळते. लठ्ठपणामुळे अनेक गंभीर आजार उद्भवतात. त्यामुळे तज्ज्ञ देखील वेळीच वजन कमी करण्याचा सल्ला देतात. प्रत्येकाचे शरीर वेगळे आहे. काहींचे वजन जिम करून तर, काहींचे योगभ्यास करून कमी होते. पण आहारावर देखील लक्ष द्यायला हवे. ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांच्यासाठी सब्जा बिया खूप फायदेशीर ठरू शकते(How to use sabja seeds for weight loss, dietitians on health benefits of this magic ingredient).

यासंदर्भात, ग्रेटर नोएडा येथील जीआयएमएस हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणारे आहारतज्ज्ञ डॉ आयुषी यादव सांगतात, ''नियमित सब्जा बिया खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत मिळते, याशिवाय अनेक प्रकारच्या शारीरिक समस्याही दूर करणे सोपे होते.''

सब्जाच्या बियांमधील पौष्टीक घटक

प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, मॅग्नेशियम, अँटी-ऑक्सिडंट्स, लोह, फॅटी ऍसिड, पोटॅशियम, फॉलिक ऍसिड, कार्बोहायड्रेट्स यांसारखे महत्त्वाचे पोषक घटक सब्जा बियांमध्ये आढळतात, ज्याचा आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो.

रोज नियमित २ खजूर खाण्याचे १० फायदे, तूप घालून खा किंवा तसेच-खजूर आहारात हवेतच

वजन होईल कमी

वाढणारे वजन कमी करण्यासाठी आपण सब्जा बियांचा वापर करू शकता. यासाठी रात्री सब्जा पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी गरम पाण्यात भिजलेला सब्जा, त्यात लिंबाचा रस मिसळून प्या. यामुळे पोट भरलेले वाटते. यासह पचनसंस्था निरोगी राहते.

बद्धकोष्ठतेपासून सुटका

सब्जा सीड्स आपल्या पोटाच्या निगडीत समस्या सोडवण्यास मदत करू शकतात. यासाठी दररोज सकाळी कोमट पाण्यासोबत बियांचे सेवन करा, यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, पोटात जळजळ यासारख्या समस्यांपासून सुटका मिळू शकते.

सतत होणारे मूड स्विंग्ज टाळा, खा ५ गोष्टी- सतत मूड जा-ये करणार नाही- वाटेल एनर्जेटिक

हाडे मजबूत होतील

आजकाल लोकांचे कमी वयात हाडं दुखतात - कमजोर होतात. यामागे आहारात कॅल्शियमची कमतरता व हाडांची कमजोरी कारणीभूत ठरते. यावर उपाय म्हणून आपण सब्जा बियांचे नियमित सेवन करू शकता. यामुळे शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण होऊन हाडे मजबूत होण्यास मदत होईल.

Web Title: How to use sabja seeds for weight loss, dietitians on health benefits of this magic ingredient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.