डोकेदुखी ही एक अशी समस्या आहे ज्याचा सामना आपण सर्वांनी कधी ना कधी केला आहे. हे बऱ्याचदा हलक्यात घेतलं जातं, पण ते नंतर त्रासदायक ठरू शकतं. डोकेदुखीची अनेक कारणं असू शकतात. झोपेच्या कमतरतेपासून ते जास्त तणावापर्यंत, सर्वकाही तुम्हाला त्रास देऊ शकतं. डोकेदुखीमुळे अस्वस्थ व्हायला होतं आणि अशा परिस्थितीत पेनकिलर्स घेतले जातात. पण हे चांगलं नाही. तुम्ही यावर काही नैसर्गिक उपाय देखील करू शकता.
डोकेदुखी कमी करण्यासाठी तुळशीचं सेवन फायदेशीर ठरतं. तुळस ही डोकेदुखी तसेच इतर अनेक समस्यांसाठी गुणकारीअसून रामबाण उपाय आहे. तुळशीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि पेन रिलीविंग प्रॉपर्टीज आहेत, ज्यामुळे तुम्हाला खूप आरामदायी वाटतं. डोकेदुखी कमी करण्यासाठी तुळशीचं सेवन कसं करायचं हे जाणून घेऊया...
तुळशीचा चहा
तुळशीमध्ये नॅचरल अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे डोकेदुखी कमी करतात. एवढंच नाही तर तणावामुळे होणाऱ्या डोकेदुखीवरही ते उत्तम आहे. चहा बनवण्यासाठी, एक कप पाण्यात तुळशीची काही ताजी पानं घाला. ते सुमारे ५ मिनिटं उकळवा. आता त्यात मध किंवा लिंबू घाला. ते हळूहळू प्या.
तुळशीचा काढा
तुळशीचा काढा बनवण्यासाठी तुळस, आलं आणि दालचिनीचा वापर केला जातो, ज्यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळतो. आलं मळमळ कमी करण्यास मदत करतं. सर्दी किंवा सायनसच्या समस्यांमुळे होणाऱ्या डोकेदुखीसाठी हे विशेषतः प्रभावी आहे. काढा बनवण्यासाठी, ८-१० तुळशीची पानं, एक छोटा तुकडा आलं आणि अर्धा चमचा दालचिनी पावडर घ्या. ते दीड कप पाण्यात एक कप शिल्लक राहेपर्यंत उकळा. आता ते गाळून गरम गरम प्या.
तुळशीची पानं
जेव्हा तुम्ही तुळशीची पानं चावता तेव्हा ते त्यातील गुणधर्म हे वेदनांपासून आराम देतात. तणाव आणि थकव्यामुळे होणाऱ्या डोकेदुखीवर हे लवकर काम करतं. यासाठी, फक्त ४-५ तुळशीची पानं चावा. तुमच्या मनालाही आराम मिळेल.
तुळशीची पेस्ट बनवा
तुळशीचा नैसर्गिक थंडावा उष्णतेमुळे होणारी डोकेदुखी शांत करतं. जेव्हा तुम्ही डोकेदुखीने थकलेले असता, तुम्हाला काहीही खाण्याची इच्छा होत नाही पण तरीही आराम हवा असतो तेव्हा हे खूप प्रभावी आहे. यासाठी तुळशीची पानं बारीक करून गुळगुळीत पेस्ट बनवा. हे तुमच्या कपाळावर लावा आणि १०-१५ मिनिटं तसेच राहू द्या. शेवटी ते कोमट पाण्याने धुवा.