Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > ५ मिनिटं अजून म्हणत गजर झाल्यावरही झोपून राहता? ३ टिप्स, पहाटे उठणं होईल एकदम सोपं

५ मिनिटं अजून म्हणत गजर झाल्यावरही झोपून राहता? ३ टिप्स, पहाटे उठणं होईल एकदम सोपं

How to Wake Up Early in the Morning: 3 Tricks That Help : सकाळी लवकर उठणं मोठं अवघड काम, अलार्म लावूनही सकाळी लवकर न उठण्याची समस्या असेल तर हा घ्या सोपा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2023 03:38 PM2023-12-27T15:38:40+5:302023-12-27T15:40:55+5:30

How to Wake Up Early in the Morning: 3 Tricks That Help : सकाळी लवकर उठणं मोठं अवघड काम, अलार्म लावूनही सकाळी लवकर न उठण्याची समस्या असेल तर हा घ्या सोपा उपाय

How to Wake Up Early in the Morning: 3 Tricks That Help | ५ मिनिटं अजून म्हणत गजर झाल्यावरही झोपून राहता? ३ टिप्स, पहाटे उठणं होईल एकदम सोपं

५ मिनिटं अजून म्हणत गजर झाल्यावरही झोपून राहता? ३ टिप्स, पहाटे उठणं होईल एकदम सोपं

लवकर निजे , लवकर उठे , तया ज्ञान, संपत्ती ,आरोग्य लाभे, ही साधी सोपी म्हण आपण ऐकलीच असेल. आपले वडीलधारे लोकं लवकर उठण्याचे फायदे सांगतात. सकाळी लवकर उठल्याने आरोग्य उत्तम राहते. शिवाय दिवसभरातील कामं झटपट पूर्ण होतात. मुख्य म्हणजे दिवसभर एनर्जेटिक वाटते. पण सध्या हिवाळ्याचे दिवस सुरु आहेत. या दिवसात लवकर उठण्याचं मन नाही करत. शिवाय थंड वातावरणात अधिक वेळ झोपण्याची इच्छा होते.

आपण बऱ्याचदा अलार्म बंद करून, ५ मिनिटं करत आपण १ तासांची झोप घेतो. पण हीच सवय कायम राहते. लवकर उठण्याची सवय आपली मोडते. उशिरा उठल्यावर शरीरात तणाव आणि सुस्तीची भावना राहते. जर शरीराला लवकर उठण्याची सवय लावायची असेल तर, ४ टिप्स फॉलो करून पाहा. या टिप्समुळे अलार्मशिवाय आपल्याला सकाळी जाग येईल. शिवाय फिट आणि फ्रेश दिसाल(How to Wake Up Early in the Morning: 3 Tricks That Help).

सकाळचा सूर्यप्रकाश फायदेशीर

जे लोकं उशिरा उठतात त्यांना सकाळचा सूर्यप्रकाश मिळत नाही. पण सकाळचा सूर्यप्रकाश शरीरासाठी आवश्यक असते. याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मुख्य म्हणजे सूर्यप्रकाशामुळे आपल्या झोपेचे-जागणे चक्र नियमित करण्यात, यासह समतोल सर्कॅडियन लय राखण्यास मदत करते. त्यामुळे सकाळी उठून निदान ३० मिनिटे सूर्यप्रकाशात जाऊन व्यायाम किंवा मेडीटेशन करा. नियमित एक आठवडा असे केल्याने आपल्याला सकाळी उठण्याची सवय नक्कीच लागेल.

सलमान खानचं डाएट सिक्रेट, पन्नाशीनंतरही फिट रहायचं म्हणून त्यानं स्वीकारला अनोखा फिटनेस फॉर्म्युला

विकेंडला मनासारखी झोप घ्या

इंटरनॅशनल जर्नल ऑफ क्रोनोबायोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, 'विकेंडला मनासारखी झोप घेतल्याने पुढील आठवडा हा फ्रेश जातो. कारण आठवडाभराचा थकवा विकेंडला झोपेद्वारे निघून जातो. जर सकाळी सवयीमुळे जाग आलीच तर, उठून नक्कीच व्यायाम करा.'

युरिक ऍसिड वाढले असेल तर डाळी खाणे पूर्ण बंद करावे का? डॉक्टर सांगतात..

८ तासांची झोप महत्वाची

जर आपल्याला सकाळी ७ वाजता उठायचं असेल तर, त्याच्या ८ तास आधी झोपा. यामुळे आपली ८ तासांची झोप पूर्ण होईल. शिवाय अलार्म न लावता आपल्याला सकाळी जाग येईल. नियमित हे रुटीन फॉलो केल्याने आपल्या शरीराला त्याची सवय लागेल. मेंदू स्वतः आपल्याला सकाळी जागं करेल.

Web Title: How to Wake Up Early in the Morning: 3 Tricks That Help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.