'लवकर निजे , लवकर उठे , तया ज्ञान, संपत्ती ,आरोग्य लाभे' ही म्हण आपण ऐकलीच असेल. सकाळी लवकर उठण्याचे अनेक फायदे आहेत. घरातील वरिष्ठ आपल्याला नेहमी लवकर उठण्याचा सल्ला देतात. सकाळी लवकर उठल्याने शरीराला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. ज्यामुळे दिवस आनंदात जातो.
मात्र, अनेकांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे त्यांना सकाळी उठण्यास अडचण निर्माण होऊ शकते. तर काही वेळेला आळसामुळे सकाळी लवकर उठण्याची इच्छा कमी होते. सकाळी लवकर उठणे हे आपल्या शरीरासाठीच नाही तर, आपल्या मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते. आपल्याला जर सकाळी लवकर उठायचं असेल तर, रात्रीच्या वेळी या ५ चुका करणे टाळा. सकाळी अलार्मविना जागे व्हाल(How to Wake Up Early in the Morning: 5 Tricks That Help).
सकाळी उठण्यासाठी रात्री या चुका करणे टाळा
रात्री चहा - कॉफी पिणे टाळा
चहा - कॉफी पिणे हे आपल्या डेली रुटीनचा भाग बनला आहे. अनेकांना डिनरनंतरही चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. जर आपल्याला चांगली झोप हवी असेल तर, झोपण्याच्या ३ तास पूर्वी कॅफिनयुक्त पेय पिणे टाळा. झोपेच्या वेळीस जर आपण चहा - कॉफी पीत असाल तर, हमखास झोप मोड होऊ शकते.
मोड आलेले काळे चणे खाल्ल्यानंतर ३ गोष्टी खाणं टाळा, आरोग्यासाठी अपायकारक कारण..
झोपण्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर टाळा
रात्री झोपण्यापूर्वी अनेक जण टीव्ही, मोबाईल फोन, लॅपटॉप किंवा इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सवर टाईमपास करून झोपतात. मात्र, ही सवय स्लीप सायकल डिस्टर्ब करू शकते. झोपण्याच्या एक तास आधी कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरणे टाळावे. यामुळे झोप पूर्ण होईल, व सकाळी लवकर जागही येईल.
रूम टेम्प्रेचर मेन्टेन ठेवा
रात्री झोपण्यापूर्वी बेडरूमच्या तापमानावर लक्ष ठेवा. जर आपल्याला एसी रूममध्ये झोपण्याची सवय असेल, तर शरीराच्या तापमानानुसार एसीचे तापमान ठेवा. एसीचे तापमान साधारण २० ते २२ डिग्री इतके ठेवा. जास्त थंड किंवा जास्त गरमीमध्ये झोप लागत नाही. ज्यामुळे वारंवार झोप मोड होऊ शकते.
व्यायाम - डाएट करूनही तिशीनंतर वजन कमी का होत नाही? ५ कारणं, वेळीच बदला नाहीतर..
झोपण्याची वेळ निश्चित करा
सकाळी लवकर उठण्यासाठी रात्री वेळेवर झोपणे आवश्यक आहे. शरीराला ८ तासांची झोप हवी. त्यामुळे झोपेची वेळ निश्चित करा. आणि दररोज त्याच वेळेवर झोपा. जेणेकरून आपल्या शरीराला त्यावेळेस झोपण्याची सवय लागेल.
रात्री हलके अन्न खा
रात्रीच्या वेळीस नेहमी हलके पदार्थ खा. पोटभर अन्न खाणे टाळा. रात्रीचे हलके पदार्थ पोट हलके ठेवते. त्यामुळे सकाळी उठण्यास अडचण निर्माण होत नाही. रात्री प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ल्याने झोप उशिरा येते, त्यामुळे रात्रीच्या वेळेस प्रथिनेयुक्त पदार्थ खाणे टाळावे.