Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > थंडीच्या दिवसांत सकाळी जागच येत नाही? ५ गोष्टी करा, अलार्म न लावता जाग येईल-फ्रेश वाटेल

थंडीच्या दिवसांत सकाळी जागच येत नाही? ५ गोष्टी करा, अलार्म न लावता जाग येईल-फ्रेश वाटेल

How to Wake up Early in the Morning Without an Alarm : लवकर झोपायला गेल्यास शरीराला  विश्रांती घेण्यास जास्तवेळ मिळते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 04:57 PM2023-11-03T16:57:11+5:302023-11-04T13:27:50+5:30

How to Wake up Early in the Morning Without an Alarm : लवकर झोपायला गेल्यास शरीराला  विश्रांती घेण्यास जास्तवेळ मिळते.

How to Wake up Early in the Morning Without an Alarm : How to wake up without an alarm | थंडीच्या दिवसांत सकाळी जागच येत नाही? ५ गोष्टी करा, अलार्म न लावता जाग येईल-फ्रेश वाटेल

थंडीच्या दिवसांत सकाळी जागच येत नाही? ५ गोष्टी करा, अलार्म न लावता जाग येईल-फ्रेश वाटेल

सकाळी लवकर उठायला होत नाही अशी अनेकांची तक्रार असते. जेव्हा हिवाळ्याचे दिवस सुरू होतात तेव्हा ही तक्रार जास्त जाणवते. हिवाळ्यात लवकर उठणं एखाद्या टास्कप्रमाणेच असतेच. अनेकजण हिवाळ्याच्या दिवसांत लवकर उठण्याचा प्रयत्न करतात पण काही केल्या जमत नाही आणि उशीरा उठल्यामुळे त्यांची कामंही लांबतात. (How to wake up without an alarm)

लवकर उठल्यानंतर पूर्ण दिवस आळस येतो, फ्रेश वाटत  नाही अशी तक्रार जाणवते. यामुळे आरोग्यावर चुकीचा परिणाम होतो. लवकर उठल्याने दिवसाची सुरूवात चांगली होते. दिवसभरात बरीच कामं करता येतात हे तुम्ही आजपर्यंत अनेकांकडून ऐकंल असेल. (Tips to Wake Up Early in Morning Without Alarm)

लवकर झोपायला गेल्यास शरीराला  विश्रांती घेण्यास जास्तवेळ मिळते. ज्यामुळे तुम्हाला ताजेतवाने झाल्याप्रमाणे वाटते. यामुळे लाईफस्टाईल हेल्दी राहण्यास  मदत होते. जेव्हा तुम्ही लवकर उठता तेव्हा व्यायाम करायला, वाचायला, पौष्टीक अन्नपदार्थ खायला जास्त वेळ मिळतो. लवकर  जाग येण्यासाठी काही सोप्या टिप्स फायदेशीर ठरू शकतात.  या टिप्सचा अवलंब करून तुम्ही अलार्म न लावता लवकर उठाल.

1) सकाळी खोलीत प्रकाश येईल अशी व्यवस्था ठेवा

तीव्र सुर्यप्रकाश डोळ्यांवर आल्यामुळे तुमची झोप उडू शकते. याशिवाय दिवसाची सुरूवात सुर्याच्या किरणांच्या संपर्कात आल्याने होईल, यासाठी पडदे उघडे राहूद्या.  जर तुम्ही अंधारमय, निरस सकाळ फेस करत असाल तर १५ ते ३० मिनिटं लाईट थेरेपीसाठी एक लाईट बॉक्स खरेदी करा. 

पोट, दंडांची चरबी लटकतेय? रात्रीच्या जेवणात खा ५ पदार्थ, झरझर घटेल पोटाची चरबी-फिट दिसा

2) एक मॉर्निंग रुटीन तयार  करा

जर तुम्हाला लवकर उठायचे असले तर सकाळी उठण्याचं कोणतंही ठोस कारण तुमच्याकडे असायला हवे. कारण नसेल तर  कितीही प्रयत्न करा तुम्हाला लवकर जाग येणार नाही.  तुम्ही एक रूटीन बनवलं तर तुम्हाला लवकर उठणं सोपं होईल.

3) रात्री नेहमी हलका आहार घ्या.

ब्रेकफास्ट आणि  दुपारचं जेवण हेवी आणि रात्रीचं जेवण हलकं असावे.  हलका आहार  घेतल्यास जेवण लवकर पचण्यास मदत होते.  ज्यामुळे चांगली झोप येते आणि एसिडिटी, अपचन यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत. रात्रीच्या जेवणात सूप, उकडलेल्या भाज्या, सॅलेड, खिचडी असावी. रात्रीचे जेवण पचण्यास  चांगली झोप घेण्याची आवश्यकता असते. 

पोटभर भात खा-कणभरही वजन वाढणार नाही; तांदूळ 'या' ३ पद्धतीने शिजवा, पोट राहील स्लिम

4) स्क्रिन टाईम कमी करा

मेंदू स्टेबल ठेवण्यासाठी झोपण्याच्या २ तास आधीपासून मोबाईल स्वत:पासून दूर ठेवा. मोबाईल, लॅपटॉप कोणतेच गॅजेट्स तुम्ही वापरले नाही तर मेंदू रिलॅक्स राहील आणि आपोआप झोप येईल. 

५) सकाळी उठण्याची आणि रात्री झोपण्याची वेळ फिक्स ठेवा

कधीही झोपण्याची आणि उठण्याची वेळ फिक्स ठेवा. कारण जर तुम्ही अनियमित वेळा ठेवल्या तर शरीराला त्या रूटीनची सवय होईल आणि लवकर जाग येईल. 

Web Title: How to Wake up Early in the Morning Without an Alarm : How to wake up without an alarm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.