Join us   

How to Wash Dishes Easily :  भांडी धुण्याचा साबण ऐनवेळी संपला तर..? साबणाऐवजी ४ वस्तू वापरा, भांडी होतील चकचकीत स्वच्छ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 1:23 PM

How to Wash Dishes Easily Quick Cleaning Hacks and Tricks : भांडी धुण्यापूर्वी, आपण नेहमी घाण असलेली भांडी वेगळी करावी. असे केल्याने तुम्हाला नंतर भांडी धुणे सोपे होईल.  

भांडी धुणेnsil (how to wash dishes easily) हे खूप कंटाळवाणं काम आहे आणि आपल्यापैकी बहुतेकांना भांडी धुवायलाही आवडत नाही. अशा स्थितीत भांडी  धुण्याचा साबण संपला असेल तर कामं करायला खूप जिवावर येतं.  (Alternatives of dishwashing soap) पण आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण तुमच्याकडे साबण नसला तरी तुम्ही घरात असलेली काही गोष्टींनी भांडी सहज धुवू शकता. (Quick Cleaning Hacks and Tricks) भांडी धुण्यापूर्वी, आपण नेहमी उष्टी, खरकटं असलेली भांडी वेगळी करावी. असे केल्याने तुम्हाला नंतर भांडी धुणे सोपे होईल. तसेच, डिशमध्ये राहिलेले कोणतेही अन्न आधीपासून वेगळे करा जेणेकरुन तुम्ही भांडी पटकन आणि एकाच वॉशने धुवू शकता. (Easy Cleaning Hacks)

१) बेकिंग सोडा

घरातील बहुतांश वस्तू स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो. कारण बेकिंग सोडामध्ये सौम्य क्लिनिंग  गुणधर्म असतात. एवढेच नाही तर बेकिंग सोडाच्या वापराने वासही दूर होतो. जर साबण किंवा लिक्विड डिटर्जंट संपलं असेल तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण भांडी धुण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकता. एका कपमध्ये फक्त बेकिंग सोडा आणि थोडेसे पाणी मिसळा आणि नंतर भांडी धुवा. बेकिंग सोड्याने घाणेरडी भांडी तर स्वच्छ होतीलच पण वासही दूर होईल.

रोजच्या नाश्त्याला खाल्ले जाणारे पोहे कसे तयार होतात? वाचा पोहे फ्रेश ठेवण्याची ट्रिक

२) लिंबाचा रस

लिंबू एक अशी वस्तू आहे जी प्रत्येक घरात सहज मिळेल. जेवणाची चव वाढवण्यापासून ते घर साफ करण्यापर्यंत अनेक प्रकारे लिंबाचा वापर केला जाऊ शकतो.  तुम्ही भांडी धुण्यासाठी लिंबाचा रस वापरू शकता. व्हिनेगरप्रमाणे लिंबाच्या रसामध्ये देखील सौम्य ऍसिड असते. ज्याचा वापर करून भांडी सहज स्वच्छ होतील. भांडी धुण्यासाठी अर्धा कप लिंबाचा रस वापरा. पण, लिंबाचा रस गाळून घ्या म्हणजे त्याचा लगदा भांड्यांना चिकटणार नाही.

३) व्हिनेगर

 व्हाईट व्हिनेगरमध्ये अॅसिड असते जे कोणत्याही प्रकारची घाण साफ करण्यास मदत करते. जर तुम्हाला डिशेस सहज आणि एकाच वॉशमध्ये स्वच्छ करायचे असतील तर तुम्ही यासाठी डिस्टिल्ड व्हाईट व्हिनेगर वापरू शकता. फक्त अर्धा कप पांढरा व्हिनेगर घ्या आणि त्यासह भांडी धुवा.

४) वॉशिंग सोडा

वॉशिंग सोडा हा एक चांगला क्लिनिंग एजंट मानला जातो, ज्यामुळे तो घराच्या साफसफाईमध्ये देखील वापरला जाऊ शकतो. अशा स्थितीत जर तुमचा साबण संपला असेल तर तुम्ही वॉशिंग सोडा देखील वापरू शकता. घाणेरडी भांडी वॉशिंग सोड्याने सहज स्वच्छ केली जातात. फक्त एक कप वॉशिंग सोडा थोडे पाण्यात मिसळा आणि भांडी धुण्यासाठी वापरा.

डिर्टंजेंट पावडर कशी तयार करायची?

घरी भांडी धुण्यासाठी तुम्ही डिटर्जंट पावडर बनवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त काही गोष्टींची आवश्यकता असेल आणि नंतर तुम्ही ते भांडी धुण्यासाठी वापरू शकता.

साहित्य

1 कप बोरॅक्स, 1 कप वॉशिंग सोडा, 1/2 कप चूर्ण सायट्रिक ऍसिड, 1/2 कप काळं मीठ, प्लास्टिक स्टोरेज कंटेनर

कृती

एक वाडगा घ्या आणि त्यात 1 कप बोरॅक्स, 1 कप धुण्याचा सोडा, 1/2 कप चूर्ण सायट्रिक ऍसिड आणि 1/2 कप काळं मीठ घाला. या सर्व गोष्टी नीट मिसळा आणि नंतर हवाबंद प्लास्टिकच्या डब्यात ठेवा. आता तुम्ही हे घरगुती डिटर्जंट भांडी धुण्यासाठी वापरू शकता.  

टॅग्स : स्वच्छता टिप्सकिचन टिप्स