Join us   

हळद लावा-दात पिवळे नाही होणार उलट पांढरेशुभ्र होऊन चमकतील, घ्या हळीदीचे ३ सोपे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2023 4:03 PM

How To Whiten Teeth Naturally With Turmeric : दातांवर पिवळा-पांढरा थर झटकन कमी करण्याचा सोपा उपाय

चमकदार सफेद दातांचे हास्य कोणाला नाही आवडत. मात्र, दातांवर पिवळा थर दिसू लागला की आपल्यालाही लाज वाटते. यामुळे आत्मविश्वासही कमी होते. दातांमुळे आपले व्यक्तीमत्व अधिक आकर्षक आणि उठावदार दिसते. पण दातांवरील पिवळा थर जर, दिवसातून दोन वेळा ब्रश करूनही निघत नसेल, तर हळदीचा सोपा उपाय करून पाहा.

हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे दातांमध्ये अडकलेले बॅक्टेरिया काढून टाकतात. यामुळे आपले दात निरोगी राहतात. जर आपल्याला डेण्टिस्टकडे न जाता घरातच दातांवरील पिवळा थर काढायचा असेल तर, हळदीचे ३ सोपे उपाय नक्कीच करून पाहा(How To Whiten Teeth Naturally With Turmeric).

खोबरेल तेल

हळदीचा वापर फक्त जेवण करण्यासाठी होत नसून, दातांवरील पिवळट थर काढण्यासाठीही होतो. आपण हळद आणि खोबरेल तेलाचा वापर करू शकता. यासाठी एका वाटीत चमचाभर खोबरेल तेलात चिमुटभर हळद मिक्स करा. नंतर तयार पेस्ट दातांवर लावा, व ब्रशने दात घासून काढा. यामुळे दातांवरील पिवळट थर निघून जाईल, शिवाय श्वासाची दुर्गंधी दूर होईल.

वॉटर हिटर रॉडवर पांढरा थर जमा झालाय? वेळीच साफ करा, अन्यथा वाढेल वीज बिल, पाहा रॉड स्वच्छ करण्याची २ सोप्या ट्रिक्स

बेकिंग सोडा

आपण बेकिंग सोड्याच्या वापराने दातांवरील पिवळट डाग काढू शकता. बेकिंग सोड्यातील घटक दातांवरील बॅक्टेरिया नष्ट करतील. यासाठी एका वाटीत खोबरेल तेल, बेकिंग सोडा आणि चिमुटभर हळद घालून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट दातांवर लावून घासा. सतत १५ दिवस हा उपाय केल्याने नक्कीच दातांवरील पिवळा थर हळूहळू निघून जाईल.

साफसफाई, शॉपिंग, फराळ या कामांमुळे चेहरा डल दिसतोय? ४ घरगुती उपाय, ऐन दिवाळीत चेहरा करेल ग्लो

पुदिना

पुदिन्याच्या रसात हळद मिसळून दात घासल्यानेही, दातांवरील पिवळा थर हळूहळू निघून जाईल. शिवाय हिरड्याही मजबूत होतील.

टॅग्स : स्वच्छता टिप्सहेल्थ टिप्स