Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > How To Whiten Teeth : दात पिवळे दिसतात; तुळशीची पानं 'इतके' दिवस चावून खा, दात राहतील पांढरेशुभ्रे

How To Whiten Teeth : दात पिवळे दिसतात; तुळशीची पानं 'इतके' दिवस चावून खा, दात राहतील पांढरेशुभ्रे

How To Whiten Your Teeth : आपण सिगारेट, खूप चहा- कॉफी किंवा सोडा आणि तंबाखू चघळणे यांसारख्या वाईट सवयी टाळल्या पाहिजेत. दात पांढरेशुभ्र दिसण्यासाठी दातांचे आरोग्यही उत्तम राखले पाहिजे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 11:59 AM2022-06-30T11:59:04+5:302022-06-30T12:58:59+5:30

How To Whiten Your Teeth : आपण सिगारेट, खूप चहा- कॉफी किंवा सोडा आणि तंबाखू चघळणे यांसारख्या वाईट सवयी टाळल्या पाहिजेत. दात पांढरेशुभ्र दिसण्यासाठी दातांचे आरोग्यही उत्तम राखले पाहिजे.

How To Whiten Your Teeth : According to research published in gijhsr use basil leaves to whiten your teeth naturally | How To Whiten Teeth : दात पिवळे दिसतात; तुळशीची पानं 'इतके' दिवस चावून खा, दात राहतील पांढरेशुभ्रे

How To Whiten Teeth : दात पिवळे दिसतात; तुळशीची पानं 'इतके' दिवस चावून खा, दात राहतील पांढरेशुभ्रे

दात पिवळे पडणे किंवा तोंडाला दुर्गंधी येणे ही एक गंभीर समस्या आहे. यामुळे काही वेळा चारचौघात लाजीरवाणे वाटू शकते. खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पांढरे दात पिवळे होऊ शकतात. जर  वेळीच लक्ष दिले नाही तर तुम्हाला दात आणि हिरड्यांच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागू शकते.(According to research published in gijhsr - Galore International Journal of Health Sciences and Research : use basil leaves to whiten your teeth naturally)

पिवळे  दात पांढरे करण्याचे  नैसर्गिकरित्या  अनेक मार्ग आहेत, परंतु आपण सिगारेट, खूप कॉफी किंवा सोडा आणि तंबाखू चघळणे यांसारख्या वाईट सवयी टाळल्या पाहिजेत. (How To Whiten Your Teeth) याशिवाय जंक फूडचे सेवन कमी करा. त्याऐवजी सफरचंद, गाजर, स्ट्रॉबेरी आणि सेलेरी आणि फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा. 

आजपासूनच तुळशीची हिरवी पाने चघळायला सुरुवात करा. तुळशीच्या पानांमुळे तुमचे पिवळे दात पांढरे आणि मजबूत होऊ शकतात. इतकंच नाही तर त्याच्या हिरव्या पानांची पावडर किंवा पेस्ट श्वासाची दुर्गंधी आणि इतर हिरड्यांच्या आजारांपासूनही वाचवू शकते.

दातदुखीवर उपयोगी तुळशीची पानं

तुळशीमध्ये मोठ्या प्रमाणात युजेनॉल (1-हायड्रॉक्सी-2-मेथॉक्सी-4 एलिलबेंझिन) असते. यामुळे शरीरात जळजळ होण्यास कारणीभूत घटकांना रोखण्याचे काम होते. तुळशीच्या पानांमध्ये 71% युजेनॉल आणि 20% मिथाइल युजेनॉल असते. जर तुम्हाला दातदुखीचा त्रास होत असेल तर त्याची पाने चावावी.

 डायबिटीस कंट्रोल अन् वाढलेला पोटाचा घेर कमी करतील ६ फळं; कायम निरोगी, मेंटेन राहाल

तुळशीची पाने तोंडाच्या संसर्गावर प्रभावी आहेत. संशोधकांचा असा विश्वास आहे की तुळशीची पाने चघळल्याने तोंडाच्या स्वच्छतेला प्रोत्साहन मिळते. या वनस्पतीमध्ये कार्व्हाक्रोल आणि टेरपीन सारखे जीवाणूनाशक गुणधर्म आहेत.
तुळशीच्या पानांची पावडर उन्हात वाळवून दात घासण्यासाठी वापरता येते.

मोहरीच्या तेलात मिसळून त्याची पेस्ट बनवून टूथपेस्ट म्हणूनही वापरता येते. हॅलिटोसिस रोखण्यासाठीही तुळशी अत्यंत गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचे दाहक-विरोधी गुणधर्म हिरड्यांना आलेली सूज आणि पीरियडॉन्टायटिससाठी चांगले करतात. या परिस्थितींमध्ये हिरड्यांना मसाज करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.

सतत नाक गळतं, पावसाळा सुरू होताच सर्दीचा त्रास वाढलाय? ५ उपाय, सर्दी, खोकला राहील लांब

तुळशीच्या पानांचा वापर करून तुम्ही नैसर्गिकरित्या दात पांढरे करू शकता. तुळशीची काही पाने उन्हात वाळवा. कोरडी पाने बारीक करून पावडर बनवा आणि टूथपेस्टमध्ये पावडर घाला, दिवसातून दोन किंवा तीन वेळा दात घासा.  तुळशीचे नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म सात दिवसांत तुमचे दात पांढरे करतील.

Web Title: How To Whiten Your Teeth : According to research published in gijhsr use basil leaves to whiten your teeth naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.