Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दात नेहमी पिवळे-अस्वच्छ दिसतात? १ चिमूटभर हळदीचा भन्नाट वापर, दात होतील पांढरेशुभ्र

दात नेहमी पिवळे-अस्वच्छ दिसतात? १ चिमूटभर हळदीचा भन्नाट वापर, दात होतील पांढरेशुभ्र

How to whiten your teeth naturally : दातांवर असे पदार्थ वारंवार जमा झाल्यानं शरीर कमकुवत होते दातांमधून रक्त बाहेर येणं, हिरड्या कमकुवत होणं, पायरिया, दातांमध्ये वेदना, दुर्गंधी यांसारख्या गंभीर समस्या उद्भवतात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 08:35 AM2023-06-20T08:35:00+5:302023-06-20T15:04:38+5:30

How to whiten your teeth naturally : दातांवर असे पदार्थ वारंवार जमा झाल्यानं शरीर कमकुवत होते दातांमधून रक्त बाहेर येणं, हिरड्या कमकुवत होणं, पायरिया, दातांमध्ये वेदना, दुर्गंधी यांसारख्या गंभीर समस्या उद्भवतात

How to whiten your teeth naturally : How to use turmeric for get rid from yellow teeth | दात नेहमी पिवळे-अस्वच्छ दिसतात? १ चिमूटभर हळदीचा भन्नाट वापर, दात होतील पांढरेशुभ्र

दात नेहमी पिवळे-अस्वच्छ दिसतात? १ चिमूटभर हळदीचा भन्नाट वापर, दात होतील पांढरेशुभ्र

तुमचे दात नेहमीच सौंदर्यात भर घालतात. पांढऱ्या दातांमुळे आत्मविश्वासही वाढतो. अनेकदा खाण्यापिण्याच्या चुकांमुळे दातांचा पिवळेपणा वाढतो. पिवळे दात दिसायला खूपच किळसवाणे, अस्वच्छ वाटतात.  या पिवळेपणाला वैद्यकिय परीभाषेत टार्टर किंवा प्लेक असं म्हणतात. (How to use turmeric for get rid from yellow teeth)

दातांवर असे पदार्थ वारंवार जमा झाल्यानं शरीर कमकुवत होते दातांमधून रक्त बाहेर येणं, हिरड्या कमकुवत होणं, पायरिया, दातांमध्ये वेदना, दुर्गंधी यांसारख्या गंभीर समस्या उद्भवतात. (Dental Care Tips) पिवळ्या दातांना स्वच्छ करणं एक कठीण ठरतं. हिरड्यांना सूज येणं, रक्त येणं यासारख्या समस्या वाढतात. स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या हळदीचा वापर करून तुम्ही दात चमकवू शकता. (How to whiten your teeth naturally)

हळदीत एंटीइंफ्लेमेटरी आणि एंटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. यामुळे दात आणि हिरड्या चांगल्या राहतात. २०१२ मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार हळदीतील करक्यूमिन हिरड्यांची सूज आणि आजार रोखतात. हा एक पारंपारीक माऊथवॉश असून यामुळे बॅक्टेरिया, प्लेक आणि सूज कमी होते. २०१३ च्या एका अभ्यासानुसार हळदीत दातांच्या दुखण्यापासून आराम देणारे घटक असतात. याचा वापर पीरियोडोंटायटिस ट्रिटमेंटसाठी केला जाऊ शकतो. ओरल कॅन्सर रोखण्यासही हळद गुणकारी ठरते. याचा उपयोग त्वचेवरही होतो.

रोज गळून गळून केस पातळ झाले? शेवग्याच्या पानांचा जादूई फॉर्म्यूला; केस होतील दाट- काळेभोर

एक चमचा हळद घेऊन त्यात दोन-तीन थेंब पुदिन्याचा रस मिसळा. तुमच्या टूथब्रशचे ब्रिस्टल्स ओले करा आणि पावडरमध्ये बुडवा आणि  नेहमीप्रमाणे दात घासा. हळद पावडर हिरड्या आणि दातांवर पसरवा ताबडतोब स्वच्छ धुण्याऐवजी, पावडर किमान पाच मिनिटे दातांवर राहू द्या. यानंतर आपले तोंड पाण्याने चांगले धुवा नंतर नियमित टूथपेस्ट, टूथ पावडर किंवा इतर टूथ-क्लीनिंग एजंटने पुन्हा दात घासून घ्या.

घरीच हळदीची टुथपेस्ट कशी बनवायची

घरात हळदीची टुथपेस्ट बनवण्यासाठी १/४ चमचा हळदीत १/८ चमचे नारळाचं तेल घाला. नारळाचं तेल आणि हळद दातांना आणि हिरड्यांना  चिकटण्यापासून रोखते. नारळाच्या तेलाचे अनेक आरोग्य फायदे आहेत. यात तुम्ही १/४ चमचे बेकींग सोडा मिसळू शकता. याशिवाय १ थेंब पुदिन्याचा अर्क घालू शकता.

Web Title: How to whiten your teeth naturally : How to use turmeric for get rid from yellow teeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.