Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दातांवर पिवळा थर, हिरड्या काळ्या झाल्या? ४ उपाय, मोत्यांसारखे पांढरेशुभ्र चमकतील दात

दातांवर पिवळा थर, हिरड्या काळ्या झाल्या? ४ उपाय, मोत्यांसारखे पांढरेशुभ्र चमकतील दात

How to Whiten Your Teeth Naturally : अनेकदा खाण्यापिण्याच्या चुकांमुळे दातांवर पिवळा थर जमा होतो याला टार्टर किंवा प्लेक असं म्हणतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 03:36 PM2023-06-12T15:36:21+5:302023-06-12T18:04:46+5:30

How to Whiten Your Teeth Naturally : अनेकदा खाण्यापिण्याच्या चुकांमुळे दातांवर पिवळा थर जमा होतो याला टार्टर किंवा प्लेक असं म्हणतात.

How to Whiten Your Teeth Naturally : How to whiten your teeth naturally using home remedies | दातांवर पिवळा थर, हिरड्या काळ्या झाल्या? ४ उपाय, मोत्यांसारखे पांढरेशुभ्र चमकतील दात

दातांवर पिवळा थर, हिरड्या काळ्या झाल्या? ४ उपाय, मोत्यांसारखे पांढरेशुभ्र चमकतील दात

फक्त खाण्यासाठीच नाही तर सौंदर्यात भर घालण्यातही दात महत्वाची भूमिका असते. दातांची सुंदर रचना आणि पांढरेशुभ्र दात आत्मविश्वास वाढवतात. पांढरे आणि मोत्यांसारखे चमकणारे दात प्रत्येकालाच आवडतात. अनेकदा खाण्यापिण्याच्या चुकांमुळे दातांवर पिवळा थर जमा होतो याला टार्टर किंवा प्लेक असं म्हणतात. (Simple Ways to Naturally Whiten Your Teeth at Home)

टार्टर हा खाण्यापिण्याच्या पदार्थांमुळे दातांवर तयार झालेला एक पिवळा थर असतो. जो हळूहळू दातांवर चिकटतो आणि हिरड्यांनाही कमकुवत बनवतो. यामुळे तुमचे दात पिवळे होतात आणि तोंडाचा वासही येतो. रोज ब्रश केल्यानंतर आणि महागड्या टुथपेस्टचा वापर केल्यानंतर अनेकांचे दात पिवळेच दिसतात. तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल तर दिवसातून दोनवेळा ब्रश करण्यासह तुम्ही काही घरगुती उपाय अवलंबू शकता. (How to whiten your teeth naturally)

दात चमकवण्यासाठी बेकींग सोड्याचा वापर

बेकिंग सोडा दातांवरचे डाग घालवण्यासाठी फायदेशीर ठरतो. यातील हायड्रोजन पेरोक्साईड एक नॅच्यूरल ब्लिचिंग एंजट आहे जे बॅक्टेरीयांना मारण्यास मदत करते एक मोठा चमचा बेकींग सोडा आणि दोन चमचे हायड्रोजन पेरोक्साईड घ्या आणि दोन्ही व्यवस्थित एकत्र करून या पेस्टनं दात स्वच्छ करा.

ऑईल पुलिंग

ऑईल पुलिंग हा दातांची स्वच्छ करण्यासाठी एक पारंपारीक उपाय आहे. ऑईल पुलिंग केल्यानं तोंडातील तेल चारही बाजूंना फिरत आणि तोंडाला दुर्गंधी येण्याची समस्याही कमी होते. ऑईल पुलिंगसाठी तुम्ही सुर्यफुलाचं तेल,  तिळाचं तेल किंवा नारळाचं तेल वापरू शकता. यासाठी एक चमचा तेल घ्या आणि तोंडात १५ ते २० मिनिटांसाठी ठेवा.

संत्री केळी किंवा लिंबाच्या सालीनं दात स्वच्छ करा

फळांची सालं दात स्वच्छ करण्यासाठी उत्तम ऑप्श्न आहेत.  केळी, संत्री, लिंबाच्या सालीनं हळूहळू आपल्या दातांवर घासा. जवळपास २ मिनिटं रगडल्यानंतर तोंड स्वच्छ धुवा. फळांच्या सालीत सायट्रिक एसिड असते. ज्यामुळे दात पांढरेशुभ्र दिसण्यास मदत होते.

फळं भाज्या

फळं भाज्यांच्या सेवनानं दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत  होते. अननस, स्ट्रोबेरी या पदार्थांच्या सेवनानं दात चांगले होण्यास मदत होते. रिसर्च गेटच्या एका अभ्यासानुसार अननसामधील ब्रोमेलॅन नावाचे एंजाइम दातांचा पिवळेपणा दूर करते. दात सतत पिवळे होत असतील आणि घरगुती उपायांनी दात पांढरे करणं कठीण वाटत असल्यास डेंटिस्टची मदत घ्या आणि योग्य ट्रिटमेंट घेऊन दातांची काळजी घ्या.

Web Title: How to Whiten Your Teeth Naturally : How to whiten your teeth naturally using home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.