साधारणतः खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयमुळे व व्यायामाचा अभावामुळे लठ्ठपणाची समस्या उद्भवते. सध्या ही समस्या कॉमन झाली असून, अनेक जण फिटनेसच्या बाबतीत सतर्क झाले आहेत. याशिवाय वजन वाढण्याची इतरही करणे असू शकतात. काही औषधांचा दुष्परिणाम, पुरेशी झोप न घेणे आणि तणाव या गोष्टींमुळेही वजन वाढू शकते.
तणावामुळे आपले मानसिक स्वास्थ बिघडते, पण याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो का? अतिस्ट्रेस घेतल्याने खरंच वजन वाढतं का? यासंदर्भात, पब्लिक हेल्थ तज्ज्ञ, आहारतज्ज्ञ स्वाती बथवाल यांनी स्ट्रेस आणि वजनाचे काय कनेक्शन आहे, याबद्दल सविस्तर सांगितले आहे(How Too Much Stress Can Cause Weight Gain).
स्ट्रेसमुळे खरंच वाढतं का वजन?
तणावात आपले वजन वाढेल की कमी होईल, हे पूर्णपणे तणावावर अवलंबून असते. कारण अनेक जण स्ट्रेस आल्यावर खाणे पिणे सोडून देतात. तर, काही जण स्ट्रेस इटिंग करतात. ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता निर्माण होते. आपण या काळात किती प्रमाणावर खात आहोत याचं गणित आपल्याला माहित नसते. यासह जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये खाणे पिणे सोडून देतो, तेव्हा आपले चयापचय मंदावते आणि एकदम खाल्ल्यास वजन वाढते.
तरुणांचे हृदय कमकुवत होतंय? तज्ज्ञ सांगतात ६ कारणं, बघा तुमचं हार्ट धडधाकट आहे का...
हार्मोन्सची पातळी बिघडते
आपल्या शरीरात कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हार्मोन असतो. ज्याचा थेट परिणाम आपल्या भूकेवर होतो. कार्टिसोल हार्मोन्सच्या पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे, शरीरावरील सूज वाढते आणि लोकांचे शरीर जाड दिसायला लागते. तणावाच्या काळात काहीही खाल्ल्याने लोकांना आराम मिळतो. तणावाच्या काळात आपण किती खात आहोत हे त्यांना स्वतःलाही माहीत नसते.
खाल्ल्याने तणाव कसे कमी होते?
काही लोकांना ताणतणावात विविध पदार्थ खायला आवडते. ज्यामुळे त्यांच्या शरीरात हॅपी हार्मोन्सची निर्मिती होते. ट्रिप्टोफॅन हे हॅपी हार्मोन आहे. जे केळी, चेरी, चॉकलेट आणि इतर अनेक गोष्टींमध्ये आढळते. त्यामुळे अनेक लोकं तणावात गोड अथवा इतर पदार्थ खाताना दिसतात.
३० मिनिटांत करा ४ सोपे व्यायाम, परफेक्ट फिगरचं स्वप्न होईल पूर्ण- कॅलरी बर्न झटपट
शरीरात चरबी जमा होऊ शकते
तणावामुळे शरीरातील प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी होते, ज्यामुळे इस्ट्रोजेनची पातळी वाढते. एस्ट्रोजेनमुळे शरीरात चरबीची पातळी वाढू शकते. एकंदरच जास्त तणाव हा आपल्या शरीरासाठी नुकसनादायक ठरतो व वजनही वाढू शकते.