Join us   

कोणीतरी आठवण काढते म्हणून उचकी लागते हे कितपत खरं? उचकी लागली आणि थांबतच नसेल तर काय करायचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2022 4:47 PM

Hiccups Problem and Solution उचकी लागणे ही नैसर्गिक गोष्ट आहे. मात्र सतत आणि खूप वेळ उचकी लागणं हे काही बरं लक्षण नव्हे..

"मला लागली कोणाची उचकी".. पिंजरा चित्रपटातील हे गाणं आपण ऐकलंच असेल. उचकी लागल्यावर आपले घरचे कोणीतरी आठवण काढत असेल, असे म्हणतात. पण खरंच कोणी आठवण काढली की उचकी लागते का? या वाक्यामध्ये किती तथ्य आहे. आज आपण हे शोधून काढणार आहोत. खरंतर उचकी येण्यामागे वैज्ञानिक कारणं आहेत. उचकी ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. त्यामुळे कोणी आठवण काढतच असेलच असं नाही.

उचकी का लागते?

उचकी लागण्याचे अनेक कारणे आहेत. उचकी ही स्नायूंची अनैच्छिक क्रिया आहे जी आपल्या घशाच्या केनलमध्ये असते. जेव्हा डायाफ्रामचे स्नायू अचानक आकुंचन वावतात, तेव्हा आपल्याला उचकी यायला लागते.

यावेळी फुप्फुसातील हवा बाहेर येते आणि अशावेळी होणारा आवाज म्हणजे उचकी. उचकी ही काही वेळेसाठी येते, मात्र ही थांबत नसेल आणि खूप वेळ येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक.

उचकी येण्यामागची कारणे

भरभर जेवणे

मसालेदार अन्न खाणे

एक्साइडिट झाल्यावर उचकी येणे

तनाव असेल तरी उचकी येते

उचकी घालवण्याचे खास ट्रिक्स

थंड पाणी प्यायल्यावर उचकी जाण्यास मदत होईल.

जीभ बाहेर काढा आणि थोडा वेळ तसेच राहा. यामुळे घशामधील मांसेपेशी ओढल्या जाईल आणि तुम्हाला बरं वाटेल.

खाली बसा आणि गुडघ्याला छातीजवळ आणा आणि दोन मिनिटं या स्थित बसा.

उचकी लागली तर साखर खा

लिंबू आणि मधाचं चाटण खा

मीठाचं पाणी प्या

तीन काळेमीरे आणि खडी साखर चावून खा आणि त्यावर पाणी प्या

उलटे आकडे मोजा

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य