Join us   

१ चमचा तुपात कालवून खा ३ गोष्टी; दृष्टी होईल तेज - डोळ्यांचे विकार राहतील दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2024 7:29 PM

How Using Ghee For Eyes Can Help Brighten Your Day! : तेज दृष्टीसाठी तुपाचा नेमका वापर कसा करावा?

भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून तुपाचा वापर होत आला आहे (Ghee). तुपाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यातून शरीराला कॅलरी, फॅट, सॅच्युरेटेड फॅट, व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के मिळतात (Eye Health). जे हृदय, पोट, त्वचा आणि केस यासह संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर ठरते (Eye Care Tips). हाडं मजबूत ते डोळ्यांसाठीही तूप फायदेशीर ठरते.

आयुर्वेद जर्नल ऑफ हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, डोळ्यांभोवती थोडेसे तूप लावल्याने कोरडेपणा आणि दीर्घकाळ स्क्रीन टाइममुळे होणारा ताण कमी होतो. तुपाचे खाल्ल्याने डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर फॅटी ऍसिडस् मिळू शकतात. ज्याचा फायदा संपूर्ण आरोग्य आणि डोळ्यांना होतो(How Using Ghee For Eyes Can Help Brighten Your Day!).

डोळ्यांसाठी तूप कसे मदतगार ठरते

देशी गायीच्या तूपात अँटीऑक्सिडंट्स, अँटीबॅक्टेरियल आणि जीवनसत्त्वे असतात. ज्यामुळे शरीराचे संक्रमणापासून बचाव होते. जर आपल्याला डोळ्यांची दृष्टी वाढवायची असेल तर, एक चमचा गाईच्या तूपात एक चतुर्थांश चमचा काळीमिरी मिसळा आणि सकाळी किंवा रात्री झोपेच्या वेळी रिकाम्या पोटी खा. यामुळे डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण होईल.

वजन वाढतं म्हणून चपाती बंद केली? कणकेत घाला ३ गोष्टी; वजन वाढणारच नाही; उलट..

तूप आणि बदाम

बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे दृष्टी सुधारण्यास मदत करतात. रात्री झोपण्यापूर्वी तुपात भिजवलेले ५-६ बदाम खावेत. यामुळे डोळ्यांची कमजोरी दूर होईल. शिवाय दृष्टी सुधारेल.

भरपूर चालूनही वजन घटेना? 'या' पद्धतीने - 'या' वेळी चाला, वेट लॉस होणारच; फक्त चालताना..

तूप आणि गाजराचा रस

गाजरात व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळते, जे दृष्टी सुधारण्यास मदत करते. आपण गाजराच्या रसात एक चमचा तूप मिसळून पिऊ शकता. यामुळे डोळ्यांचे स्नायू मजबूत होतात आणि दृष्टी साफ होते.

टॅग्स : डोळ्यांची निगाहेल्थ टिप्स