लवकर निजे, लवकर उठे, त्यासी आरोग्य धनसंपदा लाभे (Waking Up). ही म्हण महाराष्ट्रात खूप प्रचलित आहे. सकाळी उठल्याने आरोग्याला अनेक फायदे लाभतात (Health Tips). सकाळी उठल्याने आरोग्य सुदृढ राहते. हे आपल्याला अनेकदा वडीलधाऱ्या लोकांनी सांगितलंच असेल. सकाळी लवकर उठल्यानं आपल्याला दिवसभर फ्रेश वाटतं. शिवाय सकाळच्या फ्रेश हवेमुळे आपल्याला सकारात्मक उर्जा मिळते. पण अनेकांना सकाळी अंथरुणातून उठण्याचा त्रास होतो. बरेच जण सकाळी लवकर उठतात, पण ही सवय नियमित फॉलो करायला काहींना जमत नाही.
जर आपल्याला आरोग्यासोबत मेंटल हेल्थचीही काळजी घ्यायची असेल तर, सकाळी ५ वाजता उठण्याची सवय लावा. प्रयत्न करा की आपण रोज सकाळी ५ वाजता उठाल. यामुळे नक्कीच आपलं आयुष्य बदलेल(How waking up at 5 AM every day can transform your life).
सकाळी ५ वाजता उठण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्या?
झोपण्यापूर्वी कॅफिन पेय पिणे टाळा
झोपण्यापूर्वी चहा किंवा कॅफिन पेय प्यायल्याने झोपेचं चक्र बिघडतं. चहा आणि कॉफीमध्ये आढळणारे कॅफिनमुळे झोप लागत नाही. जर झोपेचं चक्र बिघडू नये असं वाटत असेल तर, सायंकाळी म्हणजेच झोपेच्या ३-४ तास आधी कॅफिन पेय पिणे टाळा.
रोज सकाळचा त्रास, पोट साफच होत नाही? चहामध्ये रोज घाला ८ पैकी १ गोष्ट; सकाळी पोट साफ
रात्री हलके पदार्थ खा
रात्रीचे डिनर नेहमी हलके पदार्थ करून करावे. याशिवाय रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान २-३ तास आधी करावे. यामुळे अन्न पचायला वेळ मिळतो. अन्न खाल्ल्यानंतर लगेच झोपणे टाळावे. असे केल्याने चांगली झोप लागेल. आणि आपण सकाळी लवकर उठू शकाल.
सायंकाळच्या दिनचर्येकडे द्या लक्ष
सायंकाळची दिनचर्य रात्री चांगली झोप घेण्यामध्ये आणि सकाळी लवकर उठण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. झोपण्यापूर्वी काही वेळाने पुस्तक वाचा. तसेच झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा टीव्ही पाहणं टाळा. स्क्रीनमधून निघणारा प्रकाश झोपेसाठी आवश्यक हार्मोन मेलाटोनिन दाबण्याचे काम करतो. त्यामुळे सायंकाळच्या दिनचर्येत चांगल्या सवयी अंगीकारा. यामुळे रात्री लवकर झोपण्यास आणि लवकर उठण्यास मदत होईल.
जेवणानंतर फक्त १ गोष्ट करा; वजन, बॅड कोलेस्टेरॉल आणि ब्लड प्रेशर राहील नियंत्रणात; दिसाल फिट
झोपण्याची जागा सुधारणे
झोपण्यासाठीही चांगले वातावरण आवश्यक आहे. बेडरूम किंवा जिथे आपण झोप घेणार आहोत, तिथे मंद प्रकाश हवे. खिडक्यांना हलक्या रंगाचे पडदे लावा. यामुळे बाहेरील प्रकाश घरात येणार नाही. याशिवाय खोलीत आरामदायी गादी आणि उशांचा वापर करा.