नखे आपल्या सौंदर्याचा भाग आहे. आपल्या बोटांना अधिक सुंदर बनवण्याचे काम नखे करते. (Signs of poor health in your nails) त्यातही मुलींना लांब नखं फार आवडतात. त्यावर वेगवेगळ्या रंगाच्या नेलपेन्ट लावून त्या नखांच्या सौंदर्यात आणखी भर घालतात.(Health problems reflected in nails) बरेचदा नखे कमकुवत असताना ती वारंवार तुटतात देखील. पण असं म्हटलं तर की, या नखांवरुन आपल्याला आपले आरोग्य समजेल तर...
आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे गेल्यावर सगळ्यात आधी आपले नखे तपासताना पाहिले असेलच. ज्यामुळे आपल्याला आरोग्याविषयी माहिती मिळते. (Nail changes and health issues) नखांचे आरोग्य आपल्या शरीरातील निरोगी पेशी किती वेगाने निर्माण होत आहे याविषयी सांगतात. (Nail health and disease symptoms) जर आपली नखे वाढतच नाही, कमकुवत आहेत किंवा लगेच त्यांची वाढ होत असेल तर आरोग्य कसे असेल जाणून घेऊया. (Signs of poor health in your nails)
आपली नखे कापल्यानंतर पटकन वाढत असतील तर शरीरातील आवश्यक अवयवांचे जैविक वय हळूहळू वाढते. यामध्ये हृदय, मूत्रपिंड, यकृत, त्वचा, फुफ्फुसांच्या अवयवांच्या पेशी लवकर वृद्ध होत नाही. अशावेळी आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक गरजेचे आहे. नखांच्या भोवती असणारी त्वचा पिवळी पडली असेल तर थायरॉईडचे लक्षण असू शकते. या आजारात नखे खडबडीत, कोरडी होवून त्वचेला तडा जातो. तसेच बोट सतत सुजणं, नखे वक्री असणं किंवा नखांच्या वरची त्वचा जाड होणे यांसारखी लक्षणे पाहायला मिळतात.
आपले जसजसे वय वाढते तसतसे आपल्या शरीरातील रक्ताभिसरण मंदावते. याचा अर्थ असा की, नखांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले पोषक घटक शरीराच्या टोकांवर कमी प्रमाणात असतात. ज्यामुले नखांची वाढ मंदावते. तसेच यात हार्मोनल पातळी, पौगंडावस्था आणि गर्भधारणा या काळात नखांची वाढ लगेच होत असते.
नखांवरुन कळतील आजार
आपल्या नखांवरुन आपले फक्त वय नाही तर अनेक आजार समजण्यास मदत होते. वृद्ध लोकांच्या नखांवर सुरकुत्या येणे हे सामान्य लक्षण आहे. कारण त्यांच्या वयानुसार शरीरात नवीन पेशी कमी वेगाने तयार होत असतात. जर या रेषा तरुण वयातील व्यक्तीमध्ये दिसल्या तर हे आजाराचे लक्षण समजावे. थायरॉईड, मधुमेह, गालगुंड ही लक्षणे दिसू शकतात. जर शरीरात झिंक, व्हिटॅमिन ए, कॅल्शियन आणि लोहाची कमतरता असेल तर त्याची लक्षणे नखांवर दिसून येतात. त्यासाठी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.