Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > झोपेत आपण धाडकन पडल्यासारखे वाटते? हा भास की आजार? नक्की कारण काय..

झोपेत आपण धाडकन पडल्यासारखे वाटते? हा भास की आजार? नक्की कारण काय..

Hypnic jerk: Why you twitch before falling asleep झोपेत अचानक आपण उंचावरून पडत असल्याचं भास होतो, ज्याला हायप्निक जर्क असे म्हणतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2023 01:42 PM2023-03-19T13:42:37+5:302023-03-19T13:44:08+5:30

Hypnic jerk: Why you twitch before falling asleep झोपेत अचानक आपण उंचावरून पडत असल्याचं भास होतो, ज्याला हायप्निक जर्क असे म्हणतात..

Hypnic jerk: Why you twitch before falling asleep | झोपेत आपण धाडकन पडल्यासारखे वाटते? हा भास की आजार? नक्की कारण काय..

झोपेत आपण धाडकन पडल्यासारखे वाटते? हा भास की आजार? नक्की कारण काय..

शरीरासाठी झोप महत्वाची, झोप अपूर्ण झाली की संपूर्ण दिवस आळसात जातो. झोपेत अनेकांना विविध गोष्टी जाणवत असतात. काहींना झोपेच्या मध्येच जाग येते. तर काहींना स्वप्न पडल्यामुळे झोप मोड होते. पण काही जणांना आपण उंचावरून पडत असल्याचा भास होतो. ज्यामुळे आपली झोप उडते. याला हायप्निक जर्क असे म्हणतात. साधारण ७० टक्के लोकांना हा अनुभव येतो असे म्हणतात.

यासंदर्भात, डॉ. सत्यनारायण मैसूर, एचओडी आणि सल्लागार, प्लमोनोलॉजी, लंग ट्रान्स्प्लांट फिजिशियन, मणिपाल हॉस्पिटल, ओल्ड एअरपोर्ट रोड यांनी विस्तारित करून सांगितले आहे. त्यांच्या मते, ''हायप्निक जर्क होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. यामध्ये झोपेचा अभाव (म्हणजेच गेल्या ७२ तासांत पुरेशी झोप न मिळणे), झोपेच्या वेळेपूर्वी जड व्यायाम, संध्याकाळी ४ नंतर कॅफिनचे जास्त सेवन, तणाव आणि चिंता यांचा समावेश होतो''(Hypnic jerk: Why you twitch before falling asleep).

हायप्निक जर्क म्हणजे काय?

हायप्निक जर्क हा कोणताही आजार किंवा मज्जासंस्थेचा विकार नाही. हा फक्त शरीराला किंवा स्नायूंना बसणारा एक हिसका आहे. हा अनुभव जागणं आणि झोपणं यांच्यामध्ये उद्भवते, यालाच हायप्निक जर्क असे म्हणतात. जो फक्त झोप लागल्यानंतर पहिल्या काही तासात जाणवते. यात हार्ट रेट आणि श्वास हळू होऊ लागते तेव्हा या समस्याची जाणीव होते.

‘नायरा’ फेम अभिनेत्री शिवांगी जोशीला किडनी इन्फेक्शनचा त्रास, ऐन तारुण्यात हा आजार होण्याचं कारण..

हायप्निक जर्क हा आजार कितपत घातक आहे?

हायप्निक जर्क हा मोठ्या आजाराचे लक्षण नाही. मात्र, रोजच जाणवत असेल तर, काळजी घेण्याची गरज आहे. कारण, असाच अनुभव पॅरा स्पाइल मायक्लोनिक जर्कमध्ये येतो. यात पाठीच्या कण्याला दुखापत किंवा रोगामध्ये प्रोप्रोस्पाइनल झटके दिसतात.

स्लीप हायजीन हायप्निक जर्कचे झटके थांबवेल

उत्तम झोपेसाठी स्लीप हायजीन महत्वाची. यामुळे हायप्निक जर्कचे झटके येण्याची शक्यता कमी होऊ शकते. ज्यामध्ये झोपेचे वेळापत्रक निश्चित करणे आणि झोपेचे वातावरण योग्य ठेवणे समाविष्ट आहे.

आज भात-उद्या चपाती- असं केल्यानं खरंच वजन कमी होतं? आहारतज्ज्ञ सांगतात, कधी आणि काय खायचं..

पुरेशी झोप घ्या

चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे. ज्यामुळे हायप्निक जर्कचे झटके येण्याची शक्यता कमी होते. प्रत्येक शरीराला ८ तास झोपेची गरज असते, तर मुले आणि किशोरवयीनांना अधिक झोपेची आवश्यकता असू शकते.

कॅफिनचे सेवन मर्यादित करा

कॅफीन शरीराच्या झोपेच्या आणि झोपण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकते, म्हणूनच संध्याकाळी कॅफीनचे सेवन मर्यादित प्रमाणावर करा. ज्यामुळे हायप्निक जर्कचे झटके येणं कमी होईल.

मासिक पाळीत होतात असह्य वेदना? प्या ओव्याचा चहा, पाहा कसा करायचा..

झोपण्याच्या आधी व्यायाम करू नये

संध्याकाळच्या वेळी अधिक व्यायाम केल्याने हायप्निक जर्कचे झटके येऊ शकतात, म्हणूनच सकाळी किंवा दिवसा लवकर व्यायाम करण्याची शिफारस केली जाते. झोपण्यापूर्वी ६ तास आधी व्यायाम करू नये. झोपण्यापूर्वी गरम पाण्याने आंघोळ करून शरीर रिलॅक्स करावे.

बघावं ते नवलंच! लेकीसह आई, सासू, आजीही गर्भवती, पाहा व्हायरल व्हिडिओची गोष्ट

हायप्निक जर्कमागील कारणे

हायप्निक जर्कमागे अनेक कारणे असू शकतात. मात्र याचे मुख्य कारण, सध्याच्या जगात चिंता आणि नैराश्य सांगण्यात येते. याशिवाय मेंदूला आराम न मिळणे, रात्री अपरात्री काम करणे, स्क्रीन टायमिंग वाढणे ही समस्या अधिक वाढीला नेत आहेत.

Web Title: Hypnic jerk: Why you twitch before falling asleep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.