सफेद पांढरेशुभ्र दात कुणाला नकोत? पण त्यावर पिवळा थर जमा (Teeth Cleaning Tips) होण्यास सुरुवात झाली तर, ब्रशने घासूनही दातांचा पिवळेपणा काही निघत नाही. दातांचा पिवळेपणा नाही निघाल्यास, तोंडातून बऱ्याचदा दुर्गंधीही येऊ लागते (Oral Health). दात हळूहळू पिवळे होऊ लागले की, खळखळून हास्यावरही रोख लागल्यासारखे होते. यासह आत्मविश्वासही कमी होतो. हसल्यावर किंवा कुणाशी बोलल्यावर आपल्या दातांची खिल्ली उडणार तर नाही ना? याचा विचार जास्त करतो.
दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी आपण बरेच उपाय करून पाहतो. विविध टूथपेस्टचा वापर करून दात घासतो. पण यामुळे दात स्वच्छ होतीलच असे नाही. दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी नक्की कोणते उपाय उपयुक्त ठरतील? कोणत्या घरगुती उपायांमुळे प्लाक, टार्टर आणि दातांवरचा पिवळा थर दूर होईल? पाहा(I brush my teeth regularly, so why are they still yellow?).
दातातून पिवळा थर काढण्यासाठी तुरटीचा वापर
- तुरटीचा वापर अनेक गोष्टींसाठी होतो. याच्या वापराने आपण अनेक गोष्टी स्वच्छ करू शकता. दातातून पिवळा थर काढण्यासाठीही आपण तुरटीचा वापर करू शकता. पण याचा वापर नेमका कसा करावा?
डायबिटिस असूनही हे सेलिब्रिटी आहेत सुपरफिट, कपील देव ते समंथा पाहा त्यांचं शुगर कंट्रोल सिक्रेट
- तुरटीमध्ये प्रतिजैविक गुणधर्म असतात जे तोंडात बॅक्टेरिया जमा होण्यापासून रोखतात. त्यामुळे दातदुखी आणि श्वासाची दुर्गंधी दूर होते.
- दातांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण तुरटीची पेस्ट तयार करू शकता. यासाठी सर्वात आधी तवा गरम करण्यासाठी ठेवा. त्यात तुरटीचा तुकडा घाला. त्यात तुरटी वितळेल, आणि मग घट्ट होऊन दाणेदार होईल. नंतर ग्राइंडरमध्ये घालून बारीक पावडर तयार करा.
- यानंतर त्यात लवंग आणि २ चमचे बेकिंग सोडा घालून वाटून पावडर तयार करा.
हाय बीपीचा त्रास? रात्री झोपण्यापूर्वी तळव्यांना ‘या’ तेलानं करा मसाज-झोपही लागेल गाढ
- ही टूथपेस्ट वापरण्यासाठी आधी पाण्याने धुवून दात ओले करा, टूथब्रशवर तुरटीची पावडर घ्या. आता हलक्या हातांनी दातांच्या बाहेरील आणि आतील बाजूस ब्रश करा. शेवटी पाण्याने गुळण्या करून तोंड स्वच्छ करा.
- तुरटीतील गुणधर्म आणि बेकिंग सोड्यामुळे दात स्वच्छ होतील.