Join us   

ICMR सांगते उन्हाळ्यात उसाचा रस पिणे टाळा; येऊ शकतो हृदयविकाराचा झटका- मधुमेह आणि..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2024 12:15 PM

ICMR Guidelines: Experts caution against drinking sugarcane juice due to high sugar content : उसाचा रस पिण्याचे फायदे माहित असतील, आता नुकसानही वाचा..

उन्हाळ्यात साहजिक आपण सगळ्यांनीच उसाचा रस प्यायला असेल (ICMR). उसाचा रस प्यायल्याने शरीर थंड राहते. शिवाय आरोग्यालाही फायदे मिळतात. पण याचे अतिसेवन करण्याचेही काही साईड इफेक्ट्स आहेत (Sugarcane Juice). भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदाने अलीकडेच, नवीन आहार मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

ज्यात उसाचा रस पिणे टाळण्यास सांगितले आहे (Sugar Content). त्याऐवजी जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पण मग उसाचा रस पिण्याचे तोटे किती? उसाचा रस कमी का प्यावा? उसाच्या रसाऐवजी पाणी जास्त प्रमाणात प्यावे का? पाहूयात(ICMR Guidelines: Experts caution against drinking sugarcane juice due to high sugar content).

उसाचा रस कमी का प्यावा?

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदाने उसाचा रस कमी प्रमाणात पिण्याचा सल्ला दिला आहे. याचे कारण म्हणजे  उसाच्या रसात साखरेचे प्रमाण जास्त असते, जे आरोग्यासाठी हानिकारक असते. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

किती पाणी प्यायल्यानं शरीरातलं बॅड कोलेस्टेरॉल कमी होतं? तज्ज्ञ सांगतात; हृदय निरोगी ठेवायचं तर..

शरीरातील साखरेचे प्रमाण वाढेल

ICMRनुसार, १०० मिली उसाच्या रसात १३ - १५ ग्रॅम साखर असते. उन्हाळ्यात साखरेचे कमी प्रमाणात सेवन करावे. त्यामुळे उन्हाळ्यात उसाचा रस कमी प्रमाणात प्यावा किंवा पिणे टाळावे.

रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होऊ शकते

जर आपण  गोड पदार्थ आणि गोड पेये जास्त प्रमाणात पीत असाल तर, रक्तातील इन्शुलिनमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते. अतिरिक्त इन्शुलिनमुळे शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होऊ लागते. ज्यामुळे रक्ताभिसरणात अडथळे येऊ शकतात.

गुडघ्यापर्यंत दाट केस हवेत? कांद्याच्या तेलाचा 'असा' करा वापर; काळेभोर केसांचं सिक्रेट

त्वचा निर्जीव होऊ शकते

जेव्हा आपण अधिक प्रमाणात साखरेचं सेवन करतो, तेव्हा रक्तात एक विशेष प्रकारचे प्रोटीन तयार होते. हे प्रोटीन AGEs नावाचे हानिकारक घटक तयार करते. हे घटक त्वचेची लवचिकता कमी करतात आणि कोलेजनचे नुकसान करतात, ज्यामुळे त्वचा निर्जीव आणि सैल होते. ज्यामुळे त्वचेवर सुरकुत्याही दिसू लागतात.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य