Join us

ICMR सांगते पाणी पिण्याची योग्य पद्धत; चुकीच्या पद्धतीने प्यायले तर हाडं होतील ठिसूळ आणि..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2024 10:16 IST

ICMR on drinking water standards : पाणी व्यतिरिक्त दूध आणि कोणते पेय प्यावे? कोणते टाळावे? हाता पायांची बोटं वाकडी होऊ नये म्हणून..

पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात (Drinking Water). पण चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्याने शरीराचे नुकसान होऊ शकते. यामुळे बहुतांश वेळा हाता पायांची बोटं वाकडी होऊ शकतात (Health Tips). शिवाय हाडं देखील कमकुवत होतात. त्यामुळे आहारात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीयुक्त पदार्थांचा समावेश करायला हवा. शिवाय पाणी पिण्याची चुकीची पद्धत टाळून, योग्य पद्धत जाणून घ्यायला हवी.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)ने भारतीयांसाठी निरोगी आहाराशी संबंधित १७ मार्गदर्शक तत्त्वे शेअर केले होते. त्यात शरीराला हायड्रेट करण्यासाठी सर्वोत्तम पेयांचाही उल्लेख आहे. याशिवाय पाणी आणि दूध पिण्याची योग्य पद्धतही शेअर करण्यात आली आहे(ICMR on drinking water standards).

पाणी पिण्याची योग्य पद्धत

ICMR नुसार, निरोगी व्यक्तीने दिवसाला सुमारे ८ लिटर द्रवपदार्थ घेतले पाहिजे. पण जास्त वेळ फ्लोराइडयुक्त पाणी प्यायल्याने हाडांचे विकार होऊ शकतात. यासाठी पाणी किमान १०-१५ मिनिटे उकळून प्यावे. यासह २० लिटर पाण्याला डिसइन्फेक्ट करण्यासाठी, पाणी उकळत ठेवताना त्यात ०.५ ग्राम क्लोरीनची गोळी घाला.

किचनमधले कंटेनर - तेलाचे डबे मेणचट झालेत? ३ ट्रिक्स - न घासता, न रगडता डबे होतील स्वच्छ

दूध पिण्याची योग्य पद्धत

ICMR नुसार, लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी दूध प्यायला हवे. त्यात कॅल्शियम असते. त्यातील मॅक्रो आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये सहज पचतात, आणि शरीराच्या वाढीसाठी मदत करतात. परंतु, आजार टाळण्यासाठी फक्त पाश्चराइज्ड किंवा उकळलेले दूध प्यावे.

उसाचा रस मर्यादित प्रमाणात प्या

उष्णता टाळण्यासाठी लोक उसाचा रस हमखास पितात. परंतु, अधिक प्रमाणात उसाचा रस पिऊ नये. त्यात जास्त प्रमाणात साखर असते. जी शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे उसाचा रस नेहमी मर्यादित प्रमाणात प्या. पॅकबंद रस पिणे टाळा. त्यापेक्षा फळे खा.

चहा - कॉफीचे प्रमाण कमी करा

चहा आणि कॉफीचे सेवन कमी करावे. त्यात कॅफिन असते जे जास्त प्रमाणात खराब कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स आणि हृदयविकाराचा धोका वाढवते. त्यातील टॅनिन शरीराला लोह मिळण्यापासून रोखू शकते. मात्र, याच्या संतुलित सेवनामुळे रक्तवाहिन्या शिथिल होऊन रक्ताभिसरण वाढू शकते. यासाठी चहा-कॉफीमध्ये दूध मिसळू नये.

शीतपेय टाळा

उष्णतेवर मात करण्यासाठी सॉफ्ट ड्रिंक्स टाळा. शीतपेयांमध्ये फॉस्फोरिक ऍसिड असते. ज्यामुळे हाडं कमकुवत होऊ शकतात. शिवाय उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोकाही वाढतो.

वजन वाढत नाही? लोक हडकुळे म्हणून टोमणे मरतात? सोयाबीन 'या' पद्धतीने खा-वाढेल ताकद

उन्हाळ्यात १२ प्रकारचे पेय प्या

पाणी

दूध

नारळ पाणी

ताक

लिंबू पाण्यात चिया सीड्स घालून प्या

संत्र्याचा रस

कलिंगडाचा रस

आंब्याचा रस

अननसाचा रस

डाळिंबाचा रस

सफरचंदाचा रस 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य