इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (NIN) यांनी एकत्रितपणे भारतीय आहाराविषयी मार्गदर्शक तत्त्वांचे अपडेट्स अलीकडेच जाहीर केले होते (Palm Oil). त्यानुसार भारतीयांनी काही बदल आपल्या आहारात देखील केले (Health Tips). या मार्गदर्शक तत्वांमध्ये एक गोष्ट त्यांनी जाहीर केली. ती म्हणजे पाम तेलाचे काही फायदे.
पाम तेल आरोग्यासाठी घातक असल्याचं म्हटलं जातं. किचनमध्ये या तेलाला स्थान मिळतच नाही. पण ICMR म्हणते, या तेलाचा योग्य वापर केल्यास आरोग्याला फायदा मिळू शकतो. शिवाय कोलेस्टेरॉलची पातळी कमी होऊ शकते. पण खरंच पाम तेलाचा आहारात समावेश करावा का?(ICMR recommends using palm oil in its dietary guidelines).
याविषयी केअर हॉस्पिटल्समधील क्लिनिकल आहारतज्ज्ञ जी सुषमा यांनी इंडियन एक्सस्प्रेसला माहिती दिली आहे. ते म्हणतात, 'पाम तेल हे त्यामधील संतृप्त चरबीच्या प्रमाणामुळे घातक मानले जाते. पण या तेलाचे काही फायदे देखील आहेत. पाम तेलाचा आहारात योग्य पद्धतीने वापर केल्यास शरीराला फायदा होऊ शकतो.'
अंगात रक्त कमी झालं हे कसं ओळखाल? हिमोग्लोबीन वाढवणारे ४ पदार्थ; अशक्तपणा होईल दूर
पाम तेलातील पौष्टीक घटक
पाम तेलामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स असतात, जे एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी वाढवू शकतात. पण या व्यतिरिक्त त्यात मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स देखील असतात. शिवाय अ आणि ई जीवनसत्त्वे असतात. ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. यासह त्वचेसाठीही फायदेशीर ठरते.
कोलेस्टेरॉल वाढवू पण शकते आणि..
पाम तेल एलडीएल कोलेस्ट्रॉल वाढवू शकते, मात्र त्याच बरोबरीने एचडीएल म्हणजेच गुड कोलेस्टेरॉल देखील वाढवू शकते. ज्यामुळे रक्तप्रवाहातून एलडीएल म्हणजेच बॅड कोलेस्टेरॉल काढून टाकण्यास मदत होते. परिणामी हृदयाचे आरोग्य सुधारू शकते.
पाम तेलाचे प्रमाण समजून घ्या
इतर तेलांप्रमाणेच आहारात पाम तेलाचा वापर प्रमाणात करायला हवे. जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड फॅटचे सेवन केल्याने, हृदयाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे कमी प्रमाणात याचा आहारात समावेश करा.
बसल्या-बसल्या करा वजन कमी, जेवणानंतर फक्त १५ मिनिटं ‘असं’ बसा, पचनही सुधारेल
पाम तेलाचा वापर कशासाठी करता येईल
तळणे आणि बेकिंग यांसारख्या कमी उष्णता आवश्यक असलेल्या कुकिंग पद्धतींसाठी पाम तेलाचा वापर करता येईल. तळण्यासारख्या उच्च-तापमान आवश्यक असणाऱ्या पद्धतींमध्ये पाम तेल वापरणे टाळा. किंवा यासाठी आपण पाम तेलाचा वापर करीत असाल तर, त्यात ऑलिव्ह ऑईल किंवा कॅनोला तेल मिक्स करून वापरा.