साखरेला व्हाईट पॉईजन असंही म्हटलं जातं. (White Poisons) कारण साखर खायला जितकी चांगली तिककीच ती आजारांचे कारण ठरते. हार्वर्ड हेल्थच्या रिपोर्टनुसार जास्त साखर खाल्ल्याने वजन वाढणं, डिप्रेशन, हार्ट डीसिज, त्वचा खराब होणं, डायबिटीस, कॅन्सर, त्वचेत लूजनेस येणं, स्मृती कमी होणं, लिव्हर डिसीज, कॅव्हिटी अशा गंभीर समस्या उद्भवू शकतात. (Icmr Told How Much Eat In A Day Know Severe Side Effects To Consume Sugar Like Diabetes Cancer And Obesity)
साखरेच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम लक्षात घेतात राष्ट्रीय पोषण संस्थान आणि भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (ICMR) नं सॉफ्ट ड्रिंक, ज्यूस, कुकीज, आईस्क्रीम, सेरियल्स आणि अन्य पॅकेज्ड फूड्समध्ये साखरेचं प्रमाण कमी करण्याचा सल्ला दिला आहे.
शिळं नको म्हणून उरलेली चपाती फेकता? शिळी चपाती खाण्याचे ५ फायदे; ताजं सोडून शिळं आधी खाल
सध्या बाजारात मिळणाऱ्या कोला, ज्यूस, बिस्किट, यांवर 100 ग्राम साखरेचं प्रमाण 86 ग्रामपर्यंत असते. आयसीएमआरने शिफारस केली आहे की गोड पदार्थांमध्ये 5 टक्के एनर्जी एडेड शुगरमधून मिळते. 10 टक्के टोटल शुगर या पदार्थांमध्ये 10 टक्के एडेड शुगर आणि 30 टक्के टोटल शुगर असते.
आयसीएमआरने 13 वर्षांच्या अंतरानंतर खाण्याापिण्याबाबत दिशा निर्देशांवर संशोधन केल आहे. जास्त साखरयुक्त पदार्थ डायबिटीस, लठ्ठपणा आणि कॅन्सरचं कारण ठरत आहेत. हार्वर्ड हेल्थच्या रिपोर्टनुसार साखरेचे अतिसेवन डायबिटीस, हृदय रोग आणि कॅन्सरसारखे आजार वाढवू शकते. ज्यामुळे ब्लड प्रेशर वाढते. वजन वाढण्याचा धोकाही वाढतो.
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या रिपोर्टनुसार महिलांनी प्रतिदिवशी 100 कॅलरीजपेक्षा जास्त तर पुरूषांनी 150 कॅलरीजपेक्षा जास्त साखर खाऊ नये. जॉन इब्राईम आणि जॅकलिन फर्नडींस हे दोन बॉलवूड कलाकार साखरेला हातसुद्धा लावत नाहीत. जॉन आपल्या फिटनेससाठी ओळखले जातात. त्यांनी जवळपास 27 वर्ष साखरेला हात लावलेला नाही.
वजन वाढवण्यासाठी साखरेचं सेवन करणं उत्तम मानलं जातं. ज्या लोकांचे वजन खूपच कमी आहे त्यांच्यासाठी साखर हा उत्तम पर्याय आहे. यात भरपूर कॅलरीज असतात. ज्यामुळे वजन वाढते. जर तुम्हाला वारंवार भूक लागत असेर तर साखरेचं सेवन करा. साखरेत भरपूर कॅलरीज असतात ज्यामुळे भूक मिटते. जर तुमच्याकडे खायला काहीच नसेल आणि तुम्हाला भूक लागली असेल तर योग्य प्रमाणात साखरेचं सेवन केल्याने भरपूर फायदे मिळतील.