Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रोज कितीवेळा जेवण करणे योग्य? दोन जेवणात किती तासांचं अंतर हवं? कमी खाण्याने आयुष्य वाढते?

रोज कितीवेळा जेवण करणे योग्य? दोन जेवणात किती तासांचं अंतर हवं? कमी खाण्याने आयुष्य वाढते?

Ideal time interval between breakfast, lunch, and dinner : आयुर्वेद तज्ज्ञांनुसार, दिवसातून आपण कितीवेळा जेवण करत आहात, यावर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2024 01:56 PM2024-02-07T13:56:18+5:302024-02-07T14:30:27+5:30

Ideal time interval between breakfast, lunch, and dinner : आयुर्वेद तज्ज्ञांनुसार, दिवसातून आपण कितीवेळा जेवण करत आहात, यावर..

Ideal time interval between breakfast, lunch, and dinner | रोज कितीवेळा जेवण करणे योग्य? दोन जेवणात किती तासांचं अंतर हवं? कमी खाण्याने आयुष्य वाढते?

रोज कितीवेळा जेवण करणे योग्य? दोन जेवणात किती तासांचं अंतर हवं? कमी खाण्याने आयुष्य वाढते?

आपण काय खात आहोत, यावर लक्ष ठेवण्याबरोबर, आपण दिवसातून किती वेळा खात आहोत यावरही लक्ष ठेवायला हवे. आयुर्वेदात पचनशक्ती टिकवून ठेवण्यासाठी, भूक लागल्यावरच खाण्याचा सल्ला दिला जाते. जर आपण दिवसातून ४ ते ५ वेळा जेवत असाल तर, कमी प्रमाणात खायला हवे (Health Tips). उत्तम आरोग्य राखण्यासाठी आपण कधी जेवत आहोत, याकडेही विशेष लक्ष द्यायला हवे.

यासंदर्भात, आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. डिंपल जांगडा सांगतात, 'आपल्या भुकेपेक्षा किती प्रमाणात जास्त किंवा कमी खावे, शिवाय कधी आणि काय खावे हे माहित असणं गरजेचं आहे. नियमित जेवणाची एकच वेळ पाळल्याने आरोग्याला फायदाच होतो'(Ideal time interval between breakfast, lunch, and dinner).

पदार्थात हवेत पौष्टीक घटक

जस जसं वय वाढत जातं, तस तसं आपल्या भुकेवरही परिणाम होतो. आपल्या शरीराला व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची गरज भासते. ती भरून काढण्यासाठी पौष्टीक पदार्थांचे सेवन करायला हवे. आपल्या जेवणाच्या ताटात भाज्या, कडधान्य, ड्रायफ्रुट्स, फळे आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करायलाच हवे.

रोज खा खजूर, आजार राहतील 'कोसों दूर', हिवाळ्यात खजूर खाण्याचे ४ फायदे; तब्येत राहील ठणठणीत

दिवसातून खा ४ वेळा

जेव्हा आपल्या शरीरात उर्जेची कमतरता भासते, तेव्हा वेळेवर भूक लागत नाही. अशावेळी जर आपण खाणं टाळत असाल तर, असे करू नका. यामुळे शरीरात पौष्टीक घटकांची कमतरता भासते. भूक लागल्यावर दिवसातून ४ वेळा हेल्दी पदार्थ खा. शिवाय ८० टक्क्यांनी पोट भरेल इतकेच खा. सूर्यास्तानंतर जड पदार्थ खाणं टाळा. शिवाय झोपण्याच्या किमान २ ते ३ तास आधी जेवण पूर्ण करा.

दिवसातून ३ वेळा खाण्याचे फायदे

संतुलित जीवनशैली जगण्यासाठी आपण दिवसातून ३ वेळाही खाऊ शकता. सकाळी हेल्दी नाश्ता, दुपारचे हेवी लंच आणि रात्री हलके पदार्थ खाल्ल्याने शरीर सुदृढ राहील. शिवाय जेवणाच्यामध्ये गॅपमध्ये काहीही खाणं टाळा. ज्यामुळे खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचेल.

कार्तिक आर्यनने सोडली वर्षभरासाठी साखर, साखर सोडल्याने खरंच ब्लड शुगर आणि वजन कमी होते की..

दिवसातून २ वेळा जेवण केल्याने काय होते?

आयुर्वेदानुसार २ वेळा जेवण करण्याचे अनेक फायदे आहेत. आपण २ जेवणांमध्ये ६ तासांचे अंतर ठेवू शकता. यामुळे खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचते. शिवाय दुसरे अन्न खाण्यापूर्वी आपल्या पोटाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. हे दिवसातून फक्त २ वेळा अन्न ग्रहण करतात, त्यांना योगामध्ये भोगी म्हणतात. याचा अर्थ अन्नाचा आस्वाद घेणारा व्यक्ती.

Web Title: Ideal time interval between breakfast, lunch, and dinner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.