Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Remedies for Acidity: सतत ॲसिडीटी होते, पित्त खवळतं? मग मुळीच खाऊ नका ५ पदार्थ..

Remedies for Acidity: सतत ॲसिडीटी होते, पित्त खवळतं? मग मुळीच खाऊ नका ५ पदार्थ..

Health Tips: वारंवार ॲसिडीटी होत असेल तर खाण्या- पिण्याची काही पथ्ये पाळून आरोग्य सांभाळायलाच हवं....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2022 05:35 PM2022-03-10T17:35:53+5:302022-03-10T17:40:17+5:30

Health Tips: वारंवार ॲसिडीटी होत असेल तर खाण्या- पिण्याची काही पथ्ये पाळून आरोग्य सांभाळायलाच हवं....

If you are suffering from acidity, then must avoid intake of these 5 food items | Remedies for Acidity: सतत ॲसिडीटी होते, पित्त खवळतं? मग मुळीच खाऊ नका ५ पदार्थ..

Remedies for Acidity: सतत ॲसिडीटी होते, पित्त खवळतं? मग मुळीच खाऊ नका ५ पदार्थ..

Highlightsॲसिडिटी होतेय असं वाटत असेल, तर आधी हे ५ पदार्थ खाणं टाळा.

ॲसिडीटीचा त्रास हा हल्ली खूप काॅमन झाला आहे. समोरच्याला हा त्रास जाणवत नसला तरी त्यामुळे काय- काय होतं आणि किती सहन करावं लागतं हे ज्याचं त्यालाच माहिती.. कुणाकुणाला तर सलग दोन- दोन दिवस हा त्रास जाणवतो. कामाचा व्याप मागे असताना ॲसिडिटीमुळे डाेकं धरून बसणं किंवा त्याचे इतर त्रास सहन करणं अजिबातच परवडणारं नाही. त्यामुळेच तर ॲसिडिटी (solution for acidity) होतेय असं वाटत असेल तर आधी हे ५ पदार्थ खाणं टाळा. आहारतज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी ही माहिती इन्स्टाग्रामला (instagram share) शेअर केली आहे. 

 

ॲसिडीटी होत असल्यास खाऊ नका हे पदार्थ...
(avoid intake of these 5 food items)
१. हाय फॅट फूड

अशा प्रकारच्या अन्न पदार्थांमध्ये फॅटी ॲसिड जास्त प्रमाणात असते. त्यामुळे हे पदार्थ पचायला जड असतात. पचनासाठी त्यांना खूप वेळ लागतो. असे पदार्थ आपल्या लोअर एसोफेजल स्फिंक्टरवर कमी दबाव टाकतात. त्यामुळे पोट साफ होत नाही आणि ॲसिडिटी होण्याचा धोका वाढू शकतो. चीज, अंडी, फुल फॅट योगर्ट, डार्क चॉकलेट हे पदार्थ हाय फॅट फूडमध्ये येतात. 

 

२. कॅफीन
कॉफीमध्ये असणारा हा पदार्थ ॲसिडीटी वाढविण्यासाठी मदत करणारा आहे. त्यामुळे ॲसिडीटीचा त्रास असणाऱ्यांनी कॉफीचं सेवन अगदीच मर्यादित प्रमाणात ठेवावं. कॉफीऐवजी ग्रीन टी, लेमन टी घेतल्यास अधिक उत्तम. 

 

३. सोडियम अधिक असणारे पदार्थ
ज्या पदार्थांमध्ये खूप जास्त मीठ असते, असे पदार्थही ॲसिडीटी वाढविण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे खारवलेले पदार्थ, लोणची याचं सेवन कमी असावं. याशिवाय कोणत्याही पदार्थामध्ये वरतून मीठ टाकण्याची सवय असल्यास ती देखील सोडून द्यावी. 

 

४. टोमॅटो 
टोमॅटो आणि टोमॅटोपासून बनविलेल्या पदार्थांमध्ये मॅलिक ॲसिड आणि सायट्रिक असिड मोठ्या प्रमाणावर असते. हे दोन्ही ॲसिड पोटात गॅस्ट्र्रिक ॲसिड तयार करतात. गॅस्ट्रिक ॲसिडची पातळी वाढली तर त्यामुळे नक्कीच ॲसिडीटी वाढते. त्यामुळे टोमॅटो आणि टोमॅटोपासून तयार केलेले पदार्थ खाणं टाळा. 

 

५. लिंबूवर्गीय फळं
संत्री, मोसंबी, किवी यांना लिंबूवर्गीय फळं म्हटलं जातं. ही फळं आणि लिंबू देखील ॲसिडीटी वाढविण्यासाठी कारणीभूत ठरतात. कारण या फळांमध्ये इतर फळांच्या तुलनेत खूप अधिक प्रमाणात ॲसिड असतं.  


 

Web Title: If you are suffering from acidity, then must avoid intake of these 5 food items

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.