कॅल्शियम हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असणारा घटक आहे. हाडं बळकट होण्यासाठी तसेच शरीराला मिळणारे व्हिटॅमिन डी शोषून घेण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. मात्र आपण अन्नातून पुरेसे कॅल्शियम मिळत नसेल तर आपल्याला हाडांशी निगडीत विविध तक्रारी उद्भवू शकतात. म्हणूनच आपल्या आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा अवश्य समावेश असायला हवा. वय वाढतं तशी हाडं ठिसूळ होतात आणि ती दुखण्याची समस्या उद्भवते. हाडांसाठी कॅल्शियम हा अतिशय उपयुक्त घटक असून आहारातून शरीराला जास्तीत जास्त कॅल्शियम मिळणे आवश्यक असते. तसेच शरीरात व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए आणि मॅग्नेशियम योग्य प्रमाणात असेल तर हा कॅल्शियम हाडात शोषला जाण्यास मदत होते (If you are Suffering from Calcium Deficiency add these foods to your Diet).
विशेष म्हणजे आपण खात असलेल्या कोणत्या पदार्थातून आपल्या शरीराला किती प्रमाणात कॅल्शियम मिळते याविषयी आपल्याला पुरेशी माहिती नसते. एका तरुण व्यक्तीला हाडं बळकट ठेवण्यासाठी दिवसाला १००० मिलीग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता असते. हाडांचे आरोग्य चांगले नसेल तर मुडदूस, ऑस्टीओपोरॅसिस तसेच हाडे मोडण्याच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. अनेकदा शरीराला पुरेसे कॅल्शियम मिळावे म्हणून आपण आहारात दुधाचा समावेश करतो. पण फक्त दूध घेऊन उपयोग नसतो तर त्यासाठी आहारात कॅल्शियम असलेल्या इतर घटकांचाही योग्य प्रमाणात समावेश करायला हवा. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. डिंपल जडेजा यासाठीच काही महत्त्वाच्या टिप्स देतात. त्यांनी सांगितलेल्या पदार्थांचा आहारात नियमितपणे समावेश केल्यास कॅल्शियम वाढण्यास मदत होते. हे पदार्थ कोणते ते पाहूया...
१. औषधी वनस्पती: तुळस, थाईम, ओवा, ऋषी, मिंट आणि ओरेगॅनो
२. बिया : बडीशेप, तीळ, चिया सीडस
३. भाजी: साग आणि भेंडी सोबत दररोज १ सर्व्हिंग ब्रोकोली
४. शेंगा : काळ्या सोयाबीन, पिंटो बीन्स, लाल किडनी बीन्स, काळ्या डोळ्यांचे वाटाणे, चणे आणि हिरवे वाटाणे
५. खाद्यपदार्थ : संपूर्ण गव्हाचा ब्रेड, राई ब्रेड, टेम्पेह
६. दुग्धजन्य पदार्थ : दूध, दही, ताक, कॉटेज चीज, ताजे बेकरी चीज, मोझरेला, तूप