दिवाळीत फटाके फोडण्यासाठी सगळेच आतुर असतात. मात्र, या फटाक्यांमुळे होणाऱ्या धुराचा- प्रदूषणाचा अनेकांना त्रास होतो. दमा, धाप लागणे, सायनस फुफ्फुसाचे आजार, ॲलर्जी आहे त्यांनी विशेषतः स्वतःची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे याकाळात काय काळजी घेतली तर त्रास कमी होईल हे पहायला हवे.
१.योग्य आहार आणि व्यायाम
अँटिऑक्सिडंट्स आहारातून मिळायला हवे. त्यामुळे तसे पदार्थ खा. श्वसनाचे व्यायाम, प्राणायाम नियमित करा. आहारात ब्रोकोली, कोबी, सरसो (मोहरी), यांचा समावेश करा. याशिवाय हिरव्या भाज्यांचा देखील आहारात समावेश करा. हे भाज्या उकडवून किंवा रसाच्या स्वरूपात घ्याव्यात.
२. व्हिटॅमिन सी
व्हिटॅमिन सी तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. तसेच शरीर डिटॉक्स करते. ते घेण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे रोज लिंबू-पाणी पिणे. याशिवाय आवळा खाणे. तुम्ही ते चटणी, कँडी, मुरब्बा किंवा लोणच्याच्या स्वरूपात घेऊ शकता.
३. हळद आणि मिरी
काही औषधी वनस्पती आणि मसाल्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. यामध्ये तुळस, ग्रीन टी, दालचिनी आणि आले, हळद त्यात थोडी काळी मिरी घालून रोज सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते.