Join us   

डेंग्यू झाला तर उत्तम औषधोपचारासह करा ३ योगासनं, लवकर सुधारेल तब्येत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2022 4:16 PM

Dengue Benefits of Yoga डेंग्यू हा व्हायरल आजारात विश्रांती, पोेषक आहार आणि सौम्य व्यायाम यामुळे लवकर तब्येत सुधारते.

डेंग्यू हा फ्लूसारखा आजार आहे, जो एडिस डासामुळे पसरतो. डेंग्यू झालेल्या व्यक्तीला खूप ताप, उलट्या, तीव्र डोकेदुखी, स्नायू - सांधेदुखी आणि भूक न लागणे अशी लक्षणे असू शकतात. डेंग्यू झाल्यानंतर झपाट्याने प्लेटलेट्स कमी होणे कधीकधी प्राणघातक ठरू शकते. वेळेत आणि उत्तम उपचार म्हणूनच आवश्यक ठरतात. पौष्टिक आहार आणि विश्रांतीसोबतच काही योगासनही या काळात केली तर ते फायदेशीर ठरु शकते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, "डेंग्यू संसर्गामुळे बहुतांश वेळा सौम्य आजारपण येतं. याची लक्षणं फ्लूसारखी असतात. काही वेळा मात्र यातून गुंतागुंत तयार होऊन मृत्यूही होऊ शकतो. त्याला सीव्हिअर डेंग्यू असं म्हणतात. यात गंभीर रक्तस्त्राव, अवयव निकामी होणे किंवा प्लेटलेट्स कमी होणे असे असंख्य प्रकार उघडकीस येतात. गंभीर डेंग्यूवर योग्य उपचार न घेतल्यास मृत्यूचा धोका जास्त असतो, त्यामुळे आहार आणि विविध योगासने केल्याने याचा धोका कमी होण्यास मदत होईल. 

प्राणायाम

शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्राणायाम आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम उपयुक्त ठरू शकतात. तणाव दूर करण्याचा हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. भ्रामरी प्राणायाम केल्यानं आराम मिळतो आणि चांगली झोप येण्यास मदत देखील होते. याशिवाय कपालभाती आणि अनुलोम-विलोम यासारखे श्वासाचे प्राणायामही रक्तदाब नियंत्रणासह मन शांत राहण्यासाठी उपयोगी ठरतात.

वज्रासन

वज्रासन केल्यानं योग मन शांत आणि स्थिर ठेवण्यास मदत करतं तसेच पचन व्यवस्थित ठेवण्यास आणि शरीराला आराम देण्यास देखील उपयुक्त आहे. गुडघेदुखी पासून मुक्ती, मांडीचे स्नायू मजबूत करण्यासाठी आणि पाठदुखी कमी करण्यासाठी याचे फायदे आहेत. डेंग्यूपासून बरे होण्यासाठी या योगासनातून विशेष फायदे मिळू शकतात.

पश्चिमोत्तनासन

पश्चिमोत्तनासन योगाचा सराव करण्याची सवय उच्च रक्तदाब आणि मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांना बरेच फायदे देते. शरीर आणि मन शांत करण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी त्याचे फायदे देखील दिसून आले आहेत. रक्ताभिसरण वाढवण्यास मदत करतं. यामुळे मेंदूला आराम मिळतो. निद्रानाश, नैराश्य आणि चिंता यासारख्या समस्या कमी होतात.

टॅग्स : डेंग्यूयोगासने प्रकार व फायदे