Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > आंघोळ केल्यावरही फ्रेश वाटत नाही, थकल्यासारखं -डल वाटतं? ७ चुका टाळा, हो जा फ्रेश

आंघोळ केल्यावरही फ्रेश वाटत नाही, थकल्यासारखं -डल वाटतं? ७ चुका टाळा, हो जा फ्रेश

आंघोळ करताना काही नियम पाळले तर तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 11:48 AM2022-01-12T11:48:53+5:302022-01-12T11:52:43+5:30

आंघोळ करताना काही नियम पाळले तर तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल

If you want to feel fresh after bathing, avoid 7 mistakes | आंघोळ केल्यावरही फ्रेश वाटत नाही, थकल्यासारखं -डल वाटतं? ७ चुका टाळा, हो जा फ्रेश

आंघोळ केल्यावरही फ्रेश वाटत नाही, थकल्यासारखं -डल वाटतं? ७ चुका टाळा, हो जा फ्रेश

Highlightsआंघोळ ही शरीर स्वच्छ होण्यासाठी असली तरी काही नियम लक्षात ठेवायला हवेतआंघोळ करताना चुकीच्या गोष्टी केल्यास आरोग्यासाठी तोट्याचे

रोज सकाळी उठल्यावर काही गोष्टी आपण नित्यनेमाने करतो. यामध्ये दात घासण्यापासून ते आंघोळ करण्यापर्यंतच्या अनेक गोष्टींचा समावेश असतो. ऑफीसला किंवा कामाला बाहेर पडण्याआधी आपण स्वच्छ आंघोळ करुन बाहेर पडतो. आंघोळ झाली की आपल्याला फ्रेश वाटते, थकवा निघून जाण्यास मदत होते. नव्या दिवसाला उत्साहाने सामोरे जायला आपण सज्ज होतो. काहींची आंघोळ ही अगदी झटपट होणारी म्हणजेच कावळ्याची आंघोळ असते. तर काही जण बराच वेळ पाण्यात डुंबत बसतात. असे असले तरी आंघोळ करताना आपण अनेकदा काही चुका करतो, ज्या आपल्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतात. त्यामुळे आंघोळ करताना टाळायला हव्यात अशा चुका कोणत्या आणि आंघोळीदरम्यान काय काळजी घ्यायला हवी याविषयी समजून घेऊया. 

१. खाल्ल्यानंतर आंघोळ करणे

अनेकदा आपल्याला सकाळी उठल्यावर खूप भूक लागते. सगळ्यांचे आवरता आवरता बराच वेळ झालेला असतो. अशावेळी आपण आधी नाश्ता करतो आणि मग आंघोळीला जातो. पण असे करणे आरोग्यासाठी योग्य नाही. याचे कारण म्हणजे आपण अन्न खातो तेव्हा आपला जठराग्नी त्या खाल्लेल्या अन्नावर प्रक्रिया करायला सुरूवात करतो. खाल्ल्यानंतर शरीरातील ऊर्जा वाढलेली असते. पण त्यानंतर आपण लगेच आंघोळ केली म्हणजे अंगावर पाणी घेतले तर आपली पचन क्षमता क्षीण होते आणि त्याचा संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे कोणत्याही खाण्यानंतर आंघोळ करणे योग्य नाही. खाणे आणि आंघोळ यांमध्ये किमान २ तासांची गॅप असायला हवी. तुम्ही कितीही घाईत असलात तरी आधी आंघोळ आणि मग नाश्ता करायला हवा. 

२. खूप जास्त गरम पाणी वापरणे 

थंडीच्या दिवसांत अंगाला गरम पाण्याने चांगले वाटत असल्याने आपण सगळेच गरम पाण्याचा जास्तीत जास्त वापर करतो. पण त्यामुळे त्वचा कोरडी पडणे, केस गळणे, केस रुक्ष होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. गरम पाण्याने रक्तदाब वाढण्याचीही शक्यता असते. ज्यांना उच्च रक्तदाब, हृदयाशी निगडीत तक्रारी किंवा हायपर टेन्शन यांसारख्या तक्रारी उद्भवतात त्यांनी जास्त गरम पाण्याने आंघोळ करणे टाळायला हवे. सामान्य तापमानाचे पाणी आंघोळीसाठी वापरणे केव्हाही चांगले. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. पण थंडीच्या दिवसांत थोडे कोमट आणि उन्हाळ्यात थोडे गार पाणी वापरायला हरकत नाही. सामान्य तापमानाच्या पाण्याने आंघोळ केल्यावर तुमची ऊर्जा वाढण्यास मदत होईलच पण तुमची प्रतिकारशक्तीही वाढेल. व्यायाम केल्यानंतर सामान्य तापमानाच्या पाण्याने आंघोळ केल्यास तुमच्या स्नायूंचे दुखणे कमी होते. 

३. खूप वेळ पाण्यात बसून राहणे किंवा बराच वेळ शॉवर घेत राहणे 

जास्त वेळ पाण्यात बसून राहिल्याने किंवा बराच वेळ शॉवर घेतल्याने त्वचा कोरडी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे १० मिनिटे आंघोळीला खूप होतात. पण जास्त वेळ पाण्यात राहिल्यास त्वचेच्या तक्रारी उद्भवण्यास सुरुवात होते. तसेच जास्त वेळ पाण्याशी संपर्क आल्यास केसांचा पोत बिघडायला सुरुवात होते. त्यामुळे खूप पाणी अंगावर घेणे योग्य नाही. 

४. दररोज किंवा एक दिवसाआड केस धुणे 

प्रदूषण, घाम यांसारख्या तक्रारींमुळे दररोज केस धुणारे लोक असतात. मात्र अशाप्रकारे दररोज केस धुण्याने केस आणि केसांच्या खालची त्वचा दोन्ही खराब होते. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा शाम्पू करणे केस चांगले राहण्याच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते. तसेच जास्त रसायने असलेल्या शाम्पूपेक्षा नैसर्गिक घटक असलेला शाम्पू निवडणे कधीही फायद्याचे ठरते. 

५. पावलांकडे दुर्लक्ष करणे 

आपली पावले हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग असतात. दिवसभर आपण ज्यांच्या जीवावर फिरत असतो त्या पावलांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे आंघोळीला गेल्यानंतर पावलांची स्वच्छता करणे महत्त्वाचे असते. बाजारात पाय घासण्यासाठी ब्रश किंवा दगड मिळतात. त्यांचा वापर करुन पावले नियमितपणे स्वच्छ करायला हवीत. त्यानंतर संपूर्ण पावलाला वरच्या आणि खालच्या बाजूने मसाज करणेही आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या पावलांच्या नसा मोकळ्या होतील आणि तुम्हाला उत्साहवर्धक वाटेल. 

६. व्यायाम झाल्यावर लगेच आंघोळ करणे 

व्यायाम करुन झाला की आपल्याला घाम आलेला असतो. त्यामुळे आपण लगेचच आंघोळीला जातो. पण असे करणे योग्य नाही, कारण व्यायामामुळे आपल्या हृदयाची गती वाढलेली असते. ती नियमित होईपर्यंत १५ ते २० मिनीटे जातात, त्यामुळे त्यानंतरच आंघोळ करायला हवी. जे लोक थोडे अशक्त असतात. अशांना आंघोळ केल्यावर एकप्रकारचा थकवा येऊ शकतो. अशांनी आंघोळीनंतर १० ते १५ मिनिटे शांत बसून मगच रोजच्या कामांना सुरुवात करायला हवी. 

७. संपूर्ण अंगाला साबण लावणे 

आपल्याला ज्याठिकाणी घाम येतो त्याचठिकाणी साबण लावणे आवश्यक असते. म्हणजे मानेला, काखेत, खालच्या भागाला आणि पावलांना. पण आपण सगळ्या अंगाला साबण लावतो त्यामुळे त्वचा कोरडी होते. पण शरीराचा इतर भाग टॉवेलने घासून पुसला तरी पुरेसा असतो. त्यामुळे त्यावर काही घाण असेल तर ती निघून जाण्यास मदत होऊ शकते. पण साबण लावल्याने त्यातील केमिकलमुळे त्वचा तडतड होते.  
 

 

Web Title: If you want to feel fresh after bathing, avoid 7 mistakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.