Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हृदय मजबूत ठेवायचं तर आहारात मॅग्नेशियम देणारे पदार्थ हवेतच! पाहा, नक्की काय खाणं योग्य

हृदय मजबूत ठेवायचं तर आहारात मॅग्नेशियम देणारे पदार्थ हवेतच! पाहा, नक्की काय खाणं योग्य

Magnesium Rich Foods आहारात योग्य गोष्टी आणि आहारविहार सांभाळणं हे आपल्याच हातात आहे. त्यासाठी नियोजन मात्र हवं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2022 04:29 PM2022-11-01T16:29:58+5:302022-11-01T18:30:03+5:30

Magnesium Rich Foods आहारात योग्य गोष्टी आणि आहारविहार सांभाळणं हे आपल्याच हातात आहे. त्यासाठी नियोजन मात्र हवं

If you want to keep your heart strong, you must have magnesium in your diet! See what exactly is right to eat | हृदय मजबूत ठेवायचं तर आहारात मॅग्नेशियम देणारे पदार्थ हवेतच! पाहा, नक्की काय खाणं योग्य

हृदय मजबूत ठेवायचं तर आहारात मॅग्नेशियम देणारे पदार्थ हवेतच! पाहा, नक्की काय खाणं योग्य

आजकाल कमी वयातच हृदयाशी निगडीत अनेक आजार उद्भवू लागले आहेत. जीवनशैलीमध्ये बदल, वाढलेलं वजन, शारीरिक हालचालींमध्ये कमी, हृदयविकाराचा झटका, डायबिटीस, ब्लड प्रेशर, वाढते कोलेस्टेरॉल अश्या अनेक प्रकारचे आजार होत आहेत.  हृदय निरोगी ठेवायचे असेल तर मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचा आहारामध्ये समावेश करावा. कशातून मिळेल मॅग्नेशियम? जाणून घ्या..

डार्क चाॅकलेट

डार्क चाॅकलेटमध्ये मॅग्नेशियमसह अनेक पोषक तत्वे आहेत. यासह चाॅकलेटमध्ये आयरन, कॉपर आणि मॅंगनीजचे प्रमाणही जास्त असते. त्यात फ्लेव्हनॉल देखील अधिक प्रमाणावर आढळून येते. त्यामुळे ते  हृदयासाठी फायदेशीर आहे. बऱ्याच संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की फ्लॅव्हनॉल हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे जे शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते आणि हृदयरोगाचा धोका कमी करते.

सुका मेवा

नट्स आपल्या हृदयाच्या उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे मानले जाते. नट्समध्ये अधिक प्रमाणावर ॲण्टी-इंफ्लेमेटरी आढळून येते. त्यामुळे योग्य प्रमाणात सुकामेवा खावा.

बियांचा आहारात समावेश

आपल्या दैनंदिन आहारात मॅग्नेशियम समाविष्ट करण्यासाठी चिया, सूर्यफूल आणि भोपळ्याच्या बिया हे उत्तम स्रोत आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्यानुसार, बियांमध्ये लोह, मोनोसॅच्युरेटेड फॅट आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड जास्त असतात ज्यामुळे हृदय मजबूत होण्यास मदत करते. त्यामुळे या बियांचा आहारात समावेश करा.

केळी

सहज बाजारात उपलब्ध होणारा फळ म्हणजे केळी. केळीमध्ये अधिक प्रमाणात पोटॅशियम आढळून येते. जे हृदयाच्या निगडीत अनेक समस्यांशी दोन हाथ करायला मदत करते.

पाले भाज्या

हिरव्या पालेभाज्यां आहारात असणं आवश्यकच आहे. त्यातही अनेक पोेषण तत्व मिळतील. मेथी, पालक, कांदा पात या हिरव्या भाज्यांमध्ये अनेक पोषक तत्वे आहेत. जे तुमचे ह्रदय निरोगी ठेवण्यास मदत करेल.

Web Title: If you want to keep your heart strong, you must have magnesium in your diet! See what exactly is right to eat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.