Join us   

तब्येत कायम चांगली ठेवायची तर नियमित करा फक्त ३ गोष्टी; राहाल ठणठणीत, तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2023 9:50 AM

Do 3 Things To Improve Your Health : शरीर सुदृढ राहावे यासाठी उत्तम पद्धतीने पोषण होण्याची आवश्यकता असते.

आपलं आरोग्य उत्तम ठेवायचं तर जीवनशैली संतुलीत असणं गरजेचं असतं. आपल्याला सतत काही ना काही त्रास होत असतील तर आपली प्रतिकारशक्ती कमी पडते हे लक्षात घ्यायला हवं. यासाठी आपला आहार, झोप, व्यायाम या गोष्टी वेळच्या वेळी आणि योग्य असायला हव्यात. शरीराने योग्य पद्धतीने दिर्घकाळ काम करावे आणि सुदृढ राहावे यासाठी त्याचे उत्तम पद्धतीने पोषण होण्याची आवश्यकता असते. आता चांगली तब्येत आणि निरोगी आयुष्य जगायचं असेल तर नेमकं काय करायला हवं असा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडेल. तर निरोगी आयुष्य जगण्यासाठी ३ महत्त्वाच्या गोष्टी आपण नियमितपणे आवर्जून फॉलो करायला हव्यात. प्रसिद्ध डायटीशियन विनिती वासवानी या ३ गोष्टी कोणत्या ते सांगतात (Do 3 Things To Improve Your Health)...

१. भरपूर पाणी प्या

आपल्या शरीराचा ७० टक्के भाग हा पाण्याने भरलेला असतो. आपण खाल्लेले अन्न पचण्यासाठी, त्याचे रक्तात रुपांतर होण्यासाठी आणि शरीराच्या सर्व क्रिया सुरळीत चालण्यासाठी शरीराला पाण्याची आवश्यकता असते. आपण पुरेशा प्रमाणात पाणी प्यायले नाही तर शरीरातील विविध प्रकारच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे प्रत्येकाने दिवसातून किमान ८ ते १० ग्लास पाणी आवर्जून प्यायला हवे. 

२. व्यायामासाठी वेळ काढायलाच हवा

आपल्याला ज्या गोष्टी प्रायोरीटीने करायच्या असतात त्यासाठी आपण काहीही झालं तरी वेळ काढतोच. पण व्यायामाचा विषय आला की मग मात्र आपण काही ना काही कारणं देतो. त्यामुळे काहीही झालं तरी दिवसातून किमान अर्धा तास वेळी व्यायामासाठी आवर्जून काढायला हवा. यामध्ये चालणे, योगा, स्विमिंग, डान्स, सायकलिंग, धावणे अशा कोणत्याही स्वरुपाचा व्यायाम तुम्ही करु शकता. 

३. घरात बनवलेलेच खा

आपण घेत असलेल्या अन्नापैकी ८० टक्के अन्न हे घरात बनवलेले असायला हवे. २० टक्के अन्न आपण बाहेरचे खाऊ शकतो. शरीराची डीटॉक्सिफिकेशनची वेगळी सिस्टीम असल्याने २० टक्के जंक फूड आपले शरीर मॅनेज करु शकते. या ३ गोष्टी फॉलो केल्या तर तुमचे आरोग्य उत्तम राहण्यास तर मदत होईलच पण तुम्हाला जास्तीत जास्त एनर्जेटीक वाटण्यास याची चांगली मदत होईल. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल