बाळाला जन्मत:च स्पर्श समजू लागतात. ऐकू येतं, दिसतं, हसता येतं, प्रतिसाद देता येतो. बाळ रोज वाढत असतं आणि उत्तम वाढीसाठी दोन अत्यंत साध्या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात. अंघोळ आणि मसाज. या साध्याशा वाटणार्या दोन गोष्टीही बाळाच्या वाढीत एक विशेष योगदान देऊ शकतात. त्यातून बाळ आणि आईबाबा यांच्यातील नात्यात आनंदाची वीण तर घट्ट होतेच पण बाळाच्या वाढीलाही सुंदर आयाम देते. संशोधन सांगते की आईचा, बाबाचा मायेचा स्पर्श, त्यांनी केलेला मसाज यातून बाळाचे विकासाचे टप्पेही अधिक वेगानं पुढे जातात.
विविध अभ्यासात हे सिद्ध झालं आहे की रोज ठराविक वेळी, ठराविक पद्धतीनं बाळाला केला जाणारा स्पर्श, नियमित मालिश यामुळे त्याच्या शारिरीक संवेदनांसोबतच भाविनक आणि सामाजिक जाणीवाही तयार होत जातात. नियमित मालिश केल्यामुळे बाळाची एकाग्रता, सतर्कता वाढते. स्पर्श हेच बाळाचं संवाद साधण्याचं पहिलं माध्यम असतं. हेच माध्यम पुढे त्याच्या आयुष्यातील भावनिक आणि बौद्धिक विकासाचा पाया ठरतं. म्हणून रोजची अंघोळ ही बाळासाठी एक वेगळी शिकण्याची प्रक्रियाच ठरते. आणि त्यासाठी आवश्यक आहे बाळासाठी योग्य प्रॉडक्ट्स वापरणं.
बाळाला गंध कळतात. ऐकू येतं, त्याला दिसतं आणि त्यातून ते शिकतं. वयाच्या तिसऱ्या महिन्यापर्यंत ते विविध आवाजांना प्रतिसाद देऊ लागतं. सहाव्या महिन्यात त्याला विविध स्वरांचं ज्ञान होतं. आवाजातले टोनच नाही तर त्यांची पट्टी, बोलण्याची भाषा हे सारंही समजू लागतं. आणि बाळासोबतचा हा संवाद सतत वाढत ठेवता येतो. म्हणूनच बाळाची अंघोळ म्हणजे रोजचं एक काम नव्हे. जॉन्सन अॅण्ड जॉन्सनचं म्हणणं असं आहे की अंघोळ म्हणजे रोजचा एक सुंदर खेळ. अंघोळ आणि मसाज म्हणजे बाळ आणि आई-बाबांसाठी रोजचा एक आनंददायी खेळ. त्यातून त्यांचं नातं तर पक्कं होतंच, पण काही सुंदर यादगार क्षणही त्यातून सजत जातात.
काही सोप्या-सुंदर गोष्टी
* अंघोळीपूर्वी किंवा नंतर केलेलं मालिश ही खरंतर मायेच्या स्पर्शाची एक भाषाच. त्या स्पर्शानं बाळाला छान वाटतं. त्याचं एक झोपण्याचं रुटीन सुरू होतं आणि बाळाला झोपही चांगली आणि भरपूर लागते.
* अंघोळीदरम्यान साबणाच्या फुग्यांसोबत खेळल्याने बाळाचे हात आणि डोळे यांच्यातील समन्वय वाढतो.
* गाणी लावल्यानं किंवा म्हटल्यानं बाळाच्या मेंदूतील स्मृती साठवणारा भाग सक्रिय होतो.
* अंघोळ घालताना बाळाशी गप्पा मारल्याने त्याला पटकन भाषा अवगत होते. दोन वर्षांचा होईपर्यंत त्यांची शब्दसंपत्ती चांगली वाढलेली दिसते.
* अंघोळीदरम्यान हात मारल्यानंतर किंवा हाताने ते उडवल्यानंतर उसळणाऱ्या पाण्याद्वारे बाळाला क्रिया प्रतिक्रिया यांची जाणीव होते.
* म्हणूनच जॉन्सन बेबी प्रोडक्ट बाळाच्या नाजूक त्वचेसाठी उत्तम आहे. ही उत्पादनं सौम्य असल्याचं क्लिनिकली म्हणजेच शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे या प्रॉडक्टचा वापर केल्यास बाळ दिवसेंदिवस अधिकाधिक आनंदी आणि समाधानी दिसतं.
जॉन्सन बेबी प्रोडक्ट्सचे महत्त्व
नुकत्याच जन्मलेल्या बाळांची अतिशय नाजूक त्वचा लक्षात घेऊनच जॉन्सन बेबी प्रोडक्ट्सची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि ते बाळाच्या त्वचेच्या दृष्टीने अतिशय हळूवार असून बाळांना रोज लावण्यासाठी सर्वोत्तम आहेत असं क्लिनिकली म्हणजेच शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालं आहे. जॉन्सन बेबी ऑईलमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असून ते बाळाची त्वचा छान मॉईश्चराईज ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते. जॉन्सन बेबी ऑईल वापरून बाळाची नियमितपणे केली जाणारी मालिश बाळाच्या सर्वांगिण विकासासाठी उपयुक्त ठरणारी आहे. जॉन्सन बेबी ऑईल हे लाईटवेट, नॉनस्टिकी असून ते लावल्यानंतर बाळा आनंदी, उत्साही राहील याची खात्री आहे.
- मधू आर, विजयभास्कर सी, आनंदन व्ही
इंडियन ॲकेडमी ऑफ पेडियाट्रिक्स गाईडलाईन्स फॉर पेडियाट्रिक स्किन केअर.