जर तुम्हाला काम करताना सतत झोप येत असेल किंवा दुपारी जेवल्यानंतर खूप झोप येत असेल तर अशा परिस्थितीत झोप टाळण्यासाठी काही आवश्यक पावलं उचलणं सर्वात महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा लोकांना दिवसा झोप येऊ लागते, जर तुम्ही घरी असाल तर ही समस्या नाही. पण जर तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये असाल तर तुमच्या कामात यामुळे अडथळा येऊ शकतो. जर हे वारंवार घडत असेल तर ते तुमच्यासाठी त्रासदायकही ठरू शकतं. काम करताना, दिवसा झोप येण्याच्या समस्येवर मात करण्याचे अनेक मार्ग आहेत.
पॉवर नॅप घ्या
सुमारे १०-२० मिनिटांची एक छोटीशी झोप तुमचं मन ताजतवानं करण्यास मदत करू शकते. त्यामुळे एनर्जी आणि एकाग्रता वाढते. रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करा जेणेकरून रात्रीच्या झोपेत व्यत्यय येणार नाही आणि सकाळी फ्रेश वाटेल.
नॉर्मल जेवण करा
खूप जास्त जेवल्यामुळे उर्जेचा अभाव निर्माण होऊ शकतो. तुमची उर्जा पातळी स्थिर ठेवण्यासाठी नॉर्मल जेवण करा. जास्त कार्बोहायड्रेट आणि जड अन्नपदार्थ खाणं टाळा. ज्यामुळे तुम्हाला सुस्ती येऊ शकते.
हायड्रेटेड राहा
डिहायड्रेशनमुळे थकवा आणि आळस येऊ शकतो. तुमच्या टेबलावर पाण्याची बाटली ठेवा आणि दिवसभर पाणी पित राहा. शरीरात पाण्याची कमतरता तुमच्या मूडवर परिणाम करू शकते. ज्यामुळे थकवा येऊ शकतो.
जेवल्यानंतर लगेच बसून काम करू नका
जेवल्यानंतर लगेच बसून काम करू नका. दिवसा आणि रात्री कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्स पिणं टाळा कारण ते रात्रीच्या झोपेच्या चक्रात व्यत्यय आणू शकतात. हालचाल करा, जास्त वेळ बसल्याने तुम्हाला थकवा आणि सुस्ती जाणवू शकते. शारीरिक हालचालींमुळे रक्ताभिसरण वाढतं.