Join us   

कॉन्स्टीपेशनसाठी सतत त्रिफळा चूर्ण घेताय? डॉक्टर सांगतात, आयुर्वेदीक औषधं घेताना लक्षात ठेवा ३ गोष्टी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2023 5:04 PM

Important tips about taking Triphala every day and 3 rules while consuming ayurvedic medicines : आयुर्वेदीक औषधेही बराच काळ घेत राहिल्यास होऊ शकते शरीराची हानी...

पोट साफ न होणे ही अतिशय सामान्य तक्रार आहे. यासाठी बाजारात विविध प्रकारची लॅक्सिटीव्ह औषधे उपलब्ध असतात. पण या औषधांची सवय लागू नये किंवा त्याचा आरोग्यावर विपरीत परीणाम होऊ नये म्हणून बरेच जण आयुर्वेदीक उपाय करण्याचे ठरवतात. बद्धकोष्ठतेसाठी प्रामुख्याने त्रिफळा चूर्ण हे औषध घेतले जाते. एखादवेळी हे चूर्ण घेणे फायदेशीर असले तरी नियमितपणे पोट साफ होण्यासाठी त्याचा वापर करणे आरोग्यासाठी चांगले नसते. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. वरलक्ष्मी या औषधाचे गुणधर्म आणि ते प्रमाणाबाहेर घेतल्यास होणारे दुष्परीणाम याविषयी प्रामुख्याने माहिती देतात. त्या नेमकं काय सांगतात पाहूया (Important tips about taking Triphala every day and 3 rules while consuming ayurvedic medicines) ...

त्रिफळा नेमके काय काम करते?

त्रिफळा चूर्ण हे आमलाकी, विभितकी आणि हरीतरी या तीन घटकांपासून तयार झालेले असते. ते आतड्यांचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करते. त्रिफळा सप्लिमेंट नसून ते लॅक्झेटीव्ह म्हणजे पोट साफ करणारे औषध नाही. पचनशक्ती वाढवण्यासाठी त्रिफळा फायदेशीर असते पण म्हणून दिर्घकाळ ते घेत राहील्यास त्याचा उपयोग होतोच असे नाही. कारण त्रिफळामध्ये कोरडेपणा जास्त असतो. त्यामुळे एका सातत्याने हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेत राहीलयास ठराविक काळानंतर पोटात कोरडेपणा निर्माण होतो. यामुळे विष्ठा तर कोरडी होतेच पण त्वचा आणि केसही मोठ्या प्रमाणात कोरडे होतात. म्हणूनच आयुर्वेदीक असले तरी त्रिफळा चूर्ण दररोज खाणे योग्य नाही. 

आयुर्वेदीक औषधे घेताना लक्षात ठेवा ३ गोष्टी...

१. आयुर्वेदीक औषध असले तरी कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ४० दिवसांपेक्षा जास्त दिवस अजिबात घेऊ नये. 

२. तुम्ही बरेच दिवस एखादे आयुर्वेदीक औषध घेत असाल आणि त्याचा आवश्यक तो परीणाम दिसत नसेल तर १० दिवसांनी हे औषध बंद करायला हवे. 

३. आयुर्वेदीक औषध घेताना आपली विष्ठा, शरीरातील ताकद आणि त्वचा यांकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला हवे कारण शरीरात काही चढउतार असतील तर या ३ गोष्टींतून लक्षणे दिसून येतात. 

 

टॅग्स : आरोग्यऔषधंलाइफस्टाइलहेल्थ टिप्स