Join us

गॅस-ॲसिडिटीच्या त्रासाने वैतागलात? रात्री जेवल्यानंतर 'एवढे ' करा, पित्ताचा त्रास होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2025 16:28 IST

Post-Dinner Digestion Tips: Healthy Stomach After Dinner: Preventing Gas and Bloating After Meals: Acidity Relief Post-Dinner: Best Foods for Healthy Digestion After Dinner: Natural Remedies for Post-Dinner Acidity: Managing Stomach Gas After Eating: How to Avoid Heartburn After Dinner: पचन व्यवस्थित झाले नाही तर गॅस, ॲसिडिटी, पोट फुगणे आणि बद्धकोष्ठतेच्या समस्या उद्भवतात.

निरोगी आयुष्य हा आपल्या जीवनाचा मंत्र आहे. बदलेल्या जीवनशैलीमुळे वेळेवर जेवण, झोप होत नसल्यामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी वाढत आहे. (Post-Dinner Digestion Tips) यामध्ये सगळ्यात जास्त तक्रारी या पचनसंस्थेशी आहेत. (Healthy Stomach After Dinner) वेळवर खाणं-पिणं न होणे, पुरेशी झोप न घेणे, सतत चहा-कॉफी प्यायल्याने आपल्याला पचनसंस्थेवर परिणाम होतो.  ज्यामुळे गॅस आणि  ॲसिडिटीच्या समस्येला सामोरे जावे लागते. (Preventing Gas and Bloating After Meals) दिवसभराच्या खाण्या-पिण्याच्या वेळेत रात्रीचे जेवण हे सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते. आपले शरीर रात्रीच्या वेळी जास्त विश्रांती घेते.(Acidity Relief Post-Dinner) त्यामुळे पचन व्यवस्थित झाले नाही तर गॅस, ॲसिडिटी, पोट फुगणे आणि बद्धकोष्ठतेच्या समस्या उद्भवतात. त्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली तर आपली पचनक्रिया मजबूत होईल. (How to Avoid Heartburn After Dinner)

रोज थंड पाण्याने आंघोळ केली तर...? शरीराला मिळतात ६ जबरदस्त फायदे

रात्री जेवल्यानंतर हे करा 

1. रात्री जेवल्यानंतर १० ते १५ मिनिटे शतपावली करा. यामुळे आपली पचनसंस्था सक्रिय होते. ज्यामुळे अन्न लवकर पचण्यास मदत होते. तसेच चयापचय गतिमान होऊन गॅस आणि पोट फुगण्याची समस्या दूर होण्यास मदत होते. जेवल्यानंतर जलद चालण्याऐवजी हळू चालणे चांगले राहिल. 

2. अनेकांना लगेच जेवल्यानंतर झोपण्याची सवय असते. ज्यामुळे आपल्या पचनक्रियेत अडथळे निर्माण होतात. ॲसिड रिफ्लेक्स आणि पोटफुगीसारख्या समस्या उद्भव शकतात. कमीत कमी ३०-४५ मिनिटे बसा किंवा हलके फिरा. ज्यामुळे अन्न व्यवस्थित जिरण्यास मदत होईल. 

3. वज्रासन हे पचनासाठी सर्वात फायदेशीर योगासन आहे. रात्रीच्या जेवणानंतर ५ ते १० मिनिटे वज्रासन केल्याने पोटाचे स्नायू सक्रिय होतात. ज्यामुळे अन्नाचे योग्य पचन होण्यास मदत होते आणि गॅसची समस्या कमी होते. 

गळ्यावरची चरबी वाढल्याने चेहरा बेढब दिसतो? रोज करा ही ५ कामं, डबल चिनपासून सुटका

4. जेवल्यानंतर कोमट पाणी प्या. ज्यामुळे चयापचय गतिमान होते आणि अन्न लवकर पचण्यास मदत होते. 

5. बडीशेपमध्ये नैसर्गिक पाचक     एंजाइम असतात. जे गॅस, अपचन आणि आम्लता कमी करण्यास मदत करतात. रात्रीच्या जेवणानंतर अर्धा चमचा बडीशेप चावल्याने पोट हलके वाटते. 

6. जेवताना जास्त पाणी प्याल्याने पोटातील पाचक एंजाइम कमकुवत होते. ज्यामुळे आपली पचनसंस्था मंदावते. त्यासाठी जेवून झाल्यानंतर एक छोटा ग्लास कोमट पाणी प्या. 

7. बडीशेप, वेलची किंवा सुपारीचे पाने माऊथफ्रेशनर म्हणून खा. यामुळे तोंडात लाळेचा स्त्राव वाढतो, ज्यामुळे पाचक एंजाइम सक्रिय होतात आणि तोंड स्वच्छ होते. 

सतत चिडचिड-थकवा,चक्कर येते? प्रचंड केसगळती? पाण्यात मिसळा २ पदार्थ, अशक्तपणा कमी, येईल ताकद

8. जेवताना आणि जेवल्यानंतर लगेच मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉपचा जास्त वापर करु नका. यामुळे लक्ष विचलित होते, त्यामुळे आपली पचनसंस्था मंदावते. अशावेळी विश्रांती घ्या, शतपावली करा ज्यामुळे आराम मिळेल. 

9. जेवणानंतर ३० ते ४० मिनिटांनी हर्बल टी प्या. यामुळे गॅस, पोटफुगी आणि अपचनाच्या समस्या दूर होतील. तसेच पचनशक्ती मजबूत होईल.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना