Join us   

शरीर सडपातळ-वजन वाढतच नाही? रोज सकाळी हा खास चहा प्या,अशक्तपणा होईल लवकर कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2024 9:26 AM

Include Almond Milk In Your Regular Tea To Beat Malnutrition : बदामाचा चहा प्रोटीन, फायबर्सनी परिपूर्ण असतो. ज्यामुळे भूक शांत होण्यास मदत होते.

भारतात चहा (Tea) प्यायला सर्वांनाच आवडते.  थकवा निघण्यासाठी, झोप उडवण्यासाठी तसंच वेळ घालवण्यासाठी लोक चहा पितात. मर्यादित प्रमाणात चहा प्यायल्याने मेंदूचा थकवा दूर होतो. फोकस वाढवता येतो आणि शरीराला एनर्जी मिळते. चहा पिऊ तुम्ही निरोगीसुद्धा राहू शकता. जर तुमचे वजन खूपच कमी असेल तर चहा पिऊन ते वाढवता येऊ शकते. कसे ते या लेखात  समजून घेऊ. (Include Almond Milk In Your Regular Tea To Beat Malnutrition And Muscle Deficiency)

चहाचे फायदे वाढवण्यासाठी तुम्ही त्यात बदामाचा वापर करू शकता. बदाम कच्चा वापरू नये. चहामध्ये बदामाचं दूध (Almond Milk) मिसळा. बदामाचे दूध वेगन असते. लॅक्टोज इनटॉलरेंस असलेल्या लोकांसाठी हा हेल्दी पर्याय आहे. तुम्ही साध्या दुधाऐवजी बदामाच्या दुधाचा आहारात समावेश करू शकता. चहात बदामाचे काही तुकडे घाला ज्यामुळे तुम्हाला प्रोटीन मिळेल आणि मसल्स वाढतील.

रिसर्चनुसार बदाम एक सुपरफूड आहे जे प्रोटीनपासून हेल्दी फॅटपर्यंत सर्व देते. बदामाच्या दूधात कॅलरजी कमी असतात. युएडीएच्या रिपोर्टनुसार बदामाच्या दुधात प्रोटीन, कार्ब्स, कॅल्शियम, आयर्न, व्हिटामीन डी, व्हिटामीन बी-१२ अमिनो एसिड्स मोठ्या प्रमाणात असतात (Ref).बदामाच्या दुधाने मेटाबॉलिझ्म वाढतो आणि अन्नपचनही व्यवस्थित होते. 

वजन घटवण्यासाठी चपाती का सोडता? पाहा चपाती खाण्याची योग्य पद्धत-वजन भरभर घटेल

बदामाच्या दुधाचा चहा प्यायल्याने वृद्धत्वाच्या लक्षणांना रोखता येते. यात टेकोफेरोल नावाचे फॅट सोल्यूबल व्हिटामीन असते. यातील एंटीऑक्सिडेंट्स फ्री रेडिकल्स ऑक्सिडेटिव्ह डॅमेजपासून वाचवतात. यातील मजबूत एंटी इंफ्लेमेटरी गुणधर्म क्रोनिक आजारांपासून वाचवतात आणि वृद्धत्वाच्या लक्षणांपासून लढण्यास मदत करतात.

वजन कमी करण्यासाठी कॅलरी इन्टेक कमी प्रमाणात घ्यावा.  असे पदार्थ खा ज्यामुळे भूक नियंत्रणात राहते आणि भूक शांत होण्यास मदत होते. बदामाचा चहा प्रोटीन, फायबर्सनी परिपूर्ण असतो. 

दिवसभरात भरपूर चालणं होतं तरी पोट सुटतंय? चालताना १ गोष्ट करा, भराभर घटेल वजन

बदामाचे दूध डायबिटीससाठी उत्तम ठरते. याची कार्बोहायड्रेट लेव्हल कमी होते. प्रोटीन्समध्ये हेल्दी फॅट्स जास्त असतात. ज्यामुळे ब्लड ग्लुकोज आणि इंसुलिन लेव्हल कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. डायबिटीक पेशंट याच्या मदतीने शुगर वाढण्यापासून रोखू शकतात.

बदामाच्या चहाने रक्तातील घातक कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते. यामुळे हार्ट हेल्थमध्ये सुधारणा होते. रक्त आणि रक्तवाहिन्या ब्लॉक होण्यापासून रोखता येतं. हृदयाचे आरोग्य चांगले राहते. हाडांसाठी बदामाचा चहा उत्तम असतो.  हा चहा प्यायल्याने कॅल्शियम, मॅग्नेशियम मिळते ज्या महिलांना मेनोपॉज आलेला असतो त्या महिलांमध्ये ऑस्टिओपोरोसिससारख्या आजारांचा धोका टाळण्यास मदत होते त्यामुळे रोज हा चहा प्यायला हवा. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल