Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > शिळं खायला नको म्हणून उरलेल्या चपात्या टाकून देता? तज्ज्ञ सांगतात, ५ कारणं- खाल्ली चपाती तरी..

शिळं खायला नको म्हणून उरलेल्या चपात्या टाकून देता? तज्ज्ञ सांगतात, ५ कारणं- खाल्ली चपाती तरी..

Stale Chapati  Basi Roti To Remove Extra Weight : जर तुम्हाला शिळी चपाती खायला आवडत नसेल तर तुम्ही याचे फायदे समजून  घ्यायला हवेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 01:15 PM2024-09-04T13:15:02+5:302024-09-06T15:48:45+5:30

Stale Chapati  Basi Roti To Remove Extra Weight : जर तुम्हाला शिळी चपाती खायला आवडत नसेल तर तुम्ही याचे फायदे समजून  घ्यायला हवेत.

Include Stale Chapati Basi Roti To Remove Extra Weight And Iron Deficiency | शिळं खायला नको म्हणून उरलेल्या चपात्या टाकून देता? तज्ज्ञ सांगतात, ५ कारणं- खाल्ली चपाती तरी..

शिळं खायला नको म्हणून उरलेल्या चपात्या टाकून देता? तज्ज्ञ सांगतात, ५ कारणं- खाल्ली चपाती तरी..

भारतात सर्वाधिक घरांमध्ये चपात्या बनवल्या जातात. सकाळी नाश्त्याला बऱ्याचजणांना चपाती खायला आवडते. रात्रीच्या चपात्या उरल्या तर त्या सकाळपर्यंत शिळ्या झालेल्या असतात. ( Stale Chapati  Basi Roti Benefits) अनेक लोक शिळं अन्न खाणं टाळतात. (Health Tips)   जर तुम्हाला शिळी चपाती खायला आवडत नसेल तर तुम्ही याचे फायदे समजून  घ्यायला हवेत. हेल्थ एक्सपर्ट रेखा यांनी शिळी चपाती खाण्याच्या फायद्यांबद्दल सांगितले आहे. (Include Stale Chapati  Basi Roti To Remove Extra Weight And Iron Deficiency)

जेव्हा चपाती शिळी असते तेव्हा हलकी फर्मेंटेशन प्रक्रियेतून जावं लागतं यामुळे चपातीत न्युट्रिएंट्सचे प्रमाण वाढते. फर्मेंडेट फूड्स प्रोबायोटिक्ससाठी ओळखले जातात.  ज्यामुळे गट हेल्थ निरोगी राहण्यास मदत होते ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते, मेंदूचा चांगला विकास होतो.  चपाती एक पॉवर हाऊस आहे जे शरीराच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असते. यात कार्बोहायड्रेट्स जास्त असतात ज्यामुळे एनर्जी लेव्हल चांगली टिकून राहते. याशिवाय ब्लड शुगल लेव्हल वाढण्यापासून रोखता येते. 


शिळ्या चपातीत आयर्न,  जिंक यांसारखे मिनरल्स असतात.  शिळी चपाती खाल्ल्यानं  शरीराला अनेक फायदे मिळतात.

शिळ्या चपातीत फायबर्स असतात ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. शिळी चपाती खाल्ल्यानं बराचवेळ पोट भरल्यासारखं वाटत आणि खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होतं. गॅसची समस्या उद्भवत नाही. शिळी चपाती खाल्ल्याने वजन कमी होण्यासही मदत होते आणि खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होतं. 

केस गळून गळून शेपटीसारखे झालेत? 'हे' घरगुती आयुर्वेदीत तेल लावा, १ महिन्यात केस लांब होतील

शिळ्या चपातीत व्हिटामीन्स, मिनरल्स असतात. ज्यामुळे दातं आणि हाडं मजबूत राहण्यास मदत होते. शिळी चपाती खाण्याआधी गरम करायला विसरू नका. यामुळे चपातीची चव अधिक वाढेल. तुम्ही शिळी चपाती आपल्या आवडत्या भाजीसोबतही खाऊ शकता. डाळ, भाजी, दही, लोणचं या पदार्थांसोबत शिळी चपाती खाल्ल्यास अधिक रूचकर लागेल.

Web Title: Include Stale Chapati Basi Roti To Remove Extra Weight And Iron Deficiency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.