व्हिटामीन बी-१२(Vitamin B-12 ) खूप कमी पदार्थांमधून मिळते. म्हणून शरीरात याची कमतरता भासू शकते. अधिकाधिक लोकांमध्ये व्हिटामीन बी-१२ ची आणि व्हिटामीन डी ची कमतरता भासते. हे व्हिटामीन आवश्यक आहे. कमतरतेमुळे शरीराला पोषण मिळत नाही आणि मसल्स कमी होऊ लागतात. (Foods For Vitamin B-12 Deficiency)
व्हिटामीन बी-१२ ची कमतरता अनेक आजारांचे कारण असू शकतात. यामुळे थकवा, कमकुवतपणा, काविळ, नसांमध्ये सुन्नपणा, जीभेला सूज येऊ शकते. यासाठी व्हिटामीन बी-१२ च्या टेस्ट नक्की करून घ्या. याला कोबालामिन असंही म्हणतात. बी-१२ पातळी कमी होऊ नये म्हणून तुम्ही काही ड्रिंक्सचे सेवन करू शकता. (Include These Drinks In Your Diet Schedule To Beat Vitamin B-12 Deficiency And Increase Muscle)
फुल फॅट मिल्क
एससीबीआयवर छापलेल्या रिपोर्टनुसार दूधात नैसर्गिक व्हिटामीन बी-१२ असते हा प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. या दोन्हीतील पोषक तत्व मसल्स वाढवण्यास मदत करतात. हे दूध प्यायल्याने कमजोरी दूर होते आणि कॅल्शियम मिळते. हाडं मजबूत राहतात.
बदामाचे दूध
लॅक्टोज इन्टॉलरेंससाठी बदामाचे दूध फायदेशीर मानले जाते. हे एक प्रोटीन, हेल्दी फॅट, मॅग्नेशियम आणि व्हिटामीन बी-१२ चा चांगला स्त्रोत आहे. बदामाचे दूध प्यायल्याने थकवा, कमकुवतपणा दूर होण्यास मदत होते.
डॉ. श्रीराम नेने सांगतात नाश्त्याला ‘हे’ पदार्थ अजिबात खाऊ नका, तब्येत कायमची बिघडेल
संत्र्याचा रस
संत्र्याचा रस प्यायला खूपच चांगला लागतो पण फोर्टिफाईड संत्र्याचा रस प्यायल्याने शरीरातील व्हिटामीन बी-१२ ची कमतरता दूर होण्यास मदत होते. यामुळे कोबालामिन डेफिशियंसीची लक्षणं कमी होतात आणि शरीराला व्हिटामीन बी मिळते.
सोया मिल्क
व्हिटामीन बी-१२ ने परिपूर्ण असलेल्या ड्रिंक्समध्ये सोया मिल्कचे नावही येते. यात फोर्टिफाईड कोबालामिन असते. ज्यामुळे नसांना ताकद मिळते आणि शरीरावर मांस चढू लागतं. याव्यतिरिक्त हे ड्रिंक प्यायल्याने पोटातील व्हिटामीन्सचे अवशोषण वाढण्यास मदत होते.
दंडांची चरबी वाढली-स्लिव्हजलेस घालणं टाळता? भाग्यश्री सांगतेय ४ व्यायाम १ महिन्यात दंड बारीक
व्हिटामीन बी-१२ वाढवणारे ड्रिंक
बीटाचा ज्यूस, गाजराचा ज्यूस, डाळिंबाचा ज्यूस, सफरचंदांचा रस, चुकंदर का जूस, व्हिटग्रास ज्यूस