Join us   

सारखे करपट ढेकर येतात- पोट नेहमीच फुगलेलं वाटतं? करून बघा तज्ज्ञांनी सांगितलेला १ उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2023 8:20 AM

Home Remedies for Indigestion: अशा पद्धतीचा अपचनाचा त्रास वारंवार होत असेल तर हा एक सोपा उपाय करून बघा. काही दिवसांतच हा त्रास कमी होईल.

ठळक मुद्दे हा उपाय काही आठवडे निमयितपणे केल्यास पचनासंबंधीच्या अनेक तक्रारी कमी होतील, असं डॉक्टर सांगत आहेत.

काही जणांना वारंवार अपचनाचा त्रास होत असतो. खाण्यात थोडा जरी बदल झाला तरी तो त्यांना अजिबातच सहन होत नाही. कधी कधी खूपच करपट ढेकर (Bad burps) येतात तर कधी थोडंसं खाल्लं तरी पोट फुगल्यासारखं, गच्च झाल्यासारखं वाटतं. काही जणांना सतत गॅसेस होण्याचा त्रास होतो (gases problem). तर काही जणांचं पोट लगेचच दुखायला लागतं. असा पचनासंबंधीचा त्रास (Indigestion) वारंवार झाला की मग काही खाण्याची वासना होत नाही. त्याचाच परिणाम मग तब्येतीवरही होऊ लागतो. 

असा त्रास तुम्हालाही होत असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून बघा. हा उपाय dr.sharmarobin या इन्स्टाग्राम पेजवर तज्ज्ञ डॉक्टरांनी सुचवला आहे.

कपड्यावर तेलाचा डाग लागला? २ सोपे उपाय, कपडा खराब न होता डाग चटकन निघून जातील

हा उपाय करण्यासाठी आपल्या स्वयंपाक घरात अगदी सहजपणे उपलब्ध असणाऱ्या ३ गोष्टींचा वापर करायचा आहे. हा उपाय काही आठवडे निमयितपणे केल्यास पचनासंबंधीच्या अनेक तक्रारी कमी होतील, असं डॉक्टर सांगत आहेत.

 

अपचनाचा त्रास होत असल्यास उपाय साहित्य अगदी कणभर हिंग त्याच्या चारपट काळं मीठ काळ्यामीठाच्या चारपट गूळ

 

कृती हिंग, काळे मीठ आणि गूळ हे सगळे साहित्य एका वाटीत एकत्र करून घ्या. हिंग अगदी बाजरीचा दाणा जेवढा असतो, तेवढ्याच प्रमाणात घ्यावा, असंही डॉक्टरांनी सुचवलं आहे.

लहानपणीच मुलांची हाडं ठणकतात? हाडांची ताकद टिकून राहण्यासाठी करा फक्त ४ गोष्टी 

या तिन्ही पदार्थांचं मिश्रण दिवसातून एकदाच कधीही, तुमच्या सोयीनुसार घ्या.

काही दिवसांतच पचनाच्या समस्या कमी होतील. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडीघरगुती उपाय