दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री लवकर झोप लागत नाही ही समस्या खूपच कॉमन आहे. हिवाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात रात्री झोप लागायला अधिक वेळ लागतो असं जाणवतं. (Insomnia Tips) मोबाईल वापरण्यात तासनतास निघून जातात त्यामुळे झोपेकडे दुर्लक्ष होतं. लाईफस्टाईल संबंधित आजार ब्लड प्रेशर, हार्ट आणि डायबिटीस सारखे आजार झोप न येण्याचे कारण ठरतात. अशा स्थितीत तब्येत चांगली ठेवण्यासाठी रात्री शांत झोप येणं गरजेचं आहे. (Tips to Beat Insomnia and Get You Sleeping Again)
रात्री झोप व्यवस्थित का येत नाही?
टिप्स अॅण्ड ट्रिक वेबसाईटवरील रिपोर्टनुसार रात्री झोप न येण्यामागे अनेक शारीरिक, मानसिक कारणं असू शकतात त्यापैकीच एक म्हणजे रेस्टलेस लेग्स सिंड्रोम हा आजार आहे. या आजारात पायाचा खालचा भाग सतत हलवण्याचं मन होतं. जेव्हा लोक निवांत असतात तेव्हा ही तक्रार जाणवते.
कोण म्हणतं व्हेज अन्नात प्रोटीन नसतं? भरभरून प्रोटीन्स देतात ५ आयुर्वेदीक पदार्थ, आजपासूनच खा
मज्जातंतूंच्या पेशींमध्ये काही गडबड झाल्यामुळे हा रोग होतो. डॉक्टर ओजेड सांगतात की व्यवस्थित झोप येत नसेल तर उशाखाली सुगंधित साबण ठेवा यामुळे लवकर झोप येण्यास मदत होईल. डॉ ओजेड यांच्यामते रात्री झोपताना उशाखाली लेवेंडर साबण ठेवा. ज्याचा सुगंध लेवेंडरच्या फुलाप्रमाणे आहे त्यामुळे झोप येण्यात अधिक मदत होते.
उन्हाळ्यात पांढऱ्या पाण्याचा त्रास होतोय, खाज येते? त्रासदायक इन्फेक्शन टाळायचं तर.....
लेग्स सिंड्रोम असल्यास तुम्ही लेव्हेंडर साबण पायांच्याजवळ बेडशीटच्या खाली ठेवू शकता. यामुळे लवकर झोप येण्यास मदत होईल. लॅव्हेंडर साबणामुळे झोप येते की नाही यावर कोणतेही शास्त्रीय संशोधन झालेले नसले तरीही अनेकांना याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.
१) रात्री लवकर झोप येण्यासाठी चहा, कॉफी, एनर्जी ड्रिंक्स आणि कोलासारख्या गोष्टींपासून दूर राहा, विशेषतः संध्याकाळी. कॅफिन तुमच्या झोपेमध्ये व्यत्यय आणू शकते आणि तुम्ही नीट झोपू शकत नाही. म्हणूनच झोपण्यापूर्वी गरम दूध किंवा हर्बल चहा पिणे चांगले.
२) रात्री झोपताना कोमट पाण्यानं आंघोळ करा, शांत संगीत ऐका किंवा तुमचे मन आणि शरीराला आराम देणारे व्यायाम करा. तुमचे डॉक्टर तुम्हाला अशा सीडीज ऐकण्याचा सल्ला देऊ शकतात, ज्यामुळे तुमचा थकवा दूर होईल आणि तुम्हाला आराम वाटेल.
३) जर तुम्हाला झोप येत नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. उठून असे काहीतरी काम करा ज्यामुळे तुम्हाला बरं वाटेल आणि तुम्हाला पुन्हा झोप येईल. जर तुमच्या झोपेच्या कमतरतेमुळे तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असेल तर तुम्हाला डॉक्टरांना भेटण्याची गरज आहे.