Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सतत गॅसेसमुळे पोट फुगल्यासारखं वाटतं, काही खायची इच्छाच होत नाही? ४ उपाय- गॅसेसचा त्रास कमी

सतत गॅसेसमुळे पोट फुगल्यासारखं वाटतं, काही खायची इच्छाच होत नाही? ४ उपाय- गॅसेसचा त्रास कमी

Instant Home Remedies For Gastric Problem : वारंवार गॅस झाल्यास पोटाच्या मोठ्या आजारात याचं रुपांतर होऊ शकतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 11:59 AM2023-08-17T11:59:49+5:302023-08-17T14:30:41+5:30

Instant Home Remedies For Gastric Problem : वारंवार गॅस झाल्यास पोटाच्या मोठ्या आजारात याचं रुपांतर होऊ शकतं.

Instant Home Remedies For Gastric Problem : Quick Relief from Gastric Pain and Gas | सतत गॅसेसमुळे पोट फुगल्यासारखं वाटतं, काही खायची इच्छाच होत नाही? ४ उपाय- गॅसेसचा त्रास कमी

सतत गॅसेसमुळे पोट फुगल्यासारखं वाटतं, काही खायची इच्छाच होत नाही? ४ उपाय- गॅसेसचा त्रास कमी

आजकाल लोकांच्या खाण्यापिण्यात असे बरेच पदार्थ येत असतात जे तब्येतीला नुकसान पोहोचवतात. भारतात तेलकट पदार्थ खाणाऱ्यांची कमी नाही.  यामुळेच डायजेशनशी संबंधित समस्या उद्भवतात. एकदा गॅस झाला की दिवसभर पोट फुगल्यासारखं वाटतं आणि कशातही मन लागत नाही. (Instant Home Remedies For Gastric Problem) तुम्हालाही अशाच समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात.  गॅस झाला तर जेवणही व्यवस्थित जात नाही. वारंवार गॅस  झाल्यास पोटाच्या मोठ्या आजारात याचं रुपांतर होऊ शकतं. (How to control gastric problems) यावर काही सोपे उपाय परिणामकारक ठरू शकतात. (Quick Relief from Gastric Pain and Gas)

कोमट पाणी प्या

जर तुम्हाला सतत गॅसचा त्रास होत असेल तर कोमट पाणी पिण्याची सवय ठेवा. यामुळे पोटात तयार होणारा गॅस कमी होईल आणि  गॅस तयार होणं रोखता येईल. याशिवाय गरम पाण्यामुळे पचनक्रिया वेगाने सुरू राहते. यामुळे पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो. 

वज्रासन करा

गॅसचा त्रास टाळण्यासाठी वज्रासन हे उत्तम व्यायाम आहे. वज्रासनाच्या मुद्रेत जवळपास १५ ते २० मिनिचं बसल्याने डायजेस्टीव्ह सिस्टिम मजबूत राहते. 

अन्न चावताना तोंड बंद ठेवा

हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते तुम्ही जेवताना जास्त तोंड उघडत असाल तर पोटात जास्त हवा भरली जाते. म्हणून तोंड बंद ठेवून ठेवा. असं केल्यानं पोटात हवा जाणं रोखता येतं आणि गॅसचा त्रास उद्भवत नाही. 

हॉट वॉटर बॅगचा वापर

जेव्हा पोटात गरजेपेक्षा जास्त गॅस तयार होतो तेव्हा एक हॉट वॉटर बॅग घ्या आणि पोटाजवळ ठेवा.  यामुळेही जर तुम्हाला फरक पडत नसेल तर गरम टॉवेल वापरा. या थेरेपीने गॅस्ट्राइटिसची समस्या दूर होण्यास मदत होईल. 

दुपारच्या जेवणात दही खा

दुपारच्या जेवणात दही भात खाल्ल्यानं पोटाच्या त्रासापासून आराम मिळतो. पण रात्रीच्यावेळी दही खाणं टाळा. गॅस तयार होण्याचा त्रास टाळण्यासाठी रोजच्या आहारात दही असायलाच हवं. दह्यात डायजेशन वाढवणारे बॅक्टेरियाज असतात. ज्यांना वैज्ञानिक भाषेक प्रोबायाोटिक्स असं म्हणतात. याशिवाय रोजचं जेवण झाल्यानंतर  १ चमचा बडीशेप खाल्ली तर तुमचे पोटाचे त्रास कमी होऊ शकतात.

Web Title: Instant Home Remedies For Gastric Problem : Quick Relief from Gastric Pain and Gas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.